20 जानेवारी - जेथे नाम तेथे राम । GOD's name & GOD always one

20 जानेवारी - जेथे नाम तेथे राम ।

💥नामाशिवाय जो जो विश्वास । ते ते अविश्वासाचे कारण आहे खास ॥
💥नामाविण मानी सत्य । नाही त्याने जोडला भगवंत ॥
💥नामाविण मानी जग। त्याचा होऊ देऊ नये विटाळ ॥
👉नामाची जेथे मस्ती । तेथे रामाची वस्ती ॥
💥याहून जे जे वाटले सुख । ते तेच दु:खाला कारण ॥
💥देवळे सभामंडपे न येत कामा । ज्याने नाही ठेविले हृदयी रामा ॥
👉राम करून घ्या आपुलासा । तोडा तोडा जन्ममरणाचा फासा ॥
👉राम एक दाता । त्याचेवाचून नाही कोणी देता ॥
👉नामाचे अनुसंधान । प्रपंचात सर्वांचे समाधान ॥
👉जे जे होईल समाधानाचेच कारण । रामास व्हावे अर्पण॥
💥मोह ममता देहाचा अभिमान । हा संसाराचा पसारा जाण । तेथे ठेवू नये मन ॥
👉नाही देहाला कष्ट देऊ । अनुसंधान न द्यावे बिघडू ॥
👉नामात आहे समाधान । हा विश्वास ठेवावा पूर्ण ॥
👉मी मागतसे एक दान । ते द्यावे तुम्ही सर्वांनी ॥
👉नामापरते नका मानू सुख । रामापायी करून घ्यावे आपणास अर्पण॥
👉याहून नको मज काही । एवढी भीक घालावी सर्वांनी ॥
💥व्यवहार लौकिक विषयाची आवड । हेच परमार्थाला मुख्य येई आड॥त्यांना सारावे बाजूस । 👉एक भजावे भगवंतास ॥
👉नाही सत्य मानू जगी काही । रामाचा आसरा घ्यावा हृदयी ॥
💥जोपर्यंत देहाचा संबंध । तोपर्यंत लौकिकाची चाड॥
💥प्रपंचाच्या थोडया सुखासाठी । नाही अंतर देऊ जगजेठी ॥
💥चार वेद सहा शास्त्रे । सर्व केल्या स्मृति पारायण ।तरी पण जोवरी मन नाही झाले स्थिर । तोवर तेथे कोठे समाधान ? ॥
👉सर्व शास्त्रांचे सार । एक भजावा रघुवीर ॥
👉नामी ठेवावे लक्ष पूर्ण । तेणे होईल समाधान ॥
👉नामाची धरावी कास । देहादिक प्रपंचात न व्हावे उदास ।हे सर्व साधे राखता अनुसंधान ॥
आता करण्याचे उरले काही । हे किंचितही न आणावे मनी ॥
👉मनाने व्हावे रामार्पण । सर्व सत्कर्म साधनांचा कळस जाण ॥चित्त ठेवावे रामापाशी । ध्यास असावा त्याचा अहर्निशी॥
👉देहाने नाही करता आले । मन रामापायी गुंतवले । रामाने त्याचे कल्याण केले ॥
👉राम ठेवील त्यात समाधान । हेच खरे भक्तीचे लक्षण जाण ॥गुरूकडून घेतलेले नाम । पावन करील जगास ।हाच ठेवावा विश्वास । राम कृपा करील खास ॥
💥देहाची स्थिती ।कायम न राहे निश्चित ॥ते सांभाळणे आहे जरूर । न विसरता रघुवीर ॥
👉रामा तुझ्याकरिता राहिलो । हा भाव ठेवावा निश्चित ।शक्य तो स्मरावा रघुपति ॥

🎁रामचरणी लावावे मन ।इतुके करावे तुम्ही थोडेफार ।
                                               ..... नाही करू दुसरी यातायात जाण ॥🎁

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!