वाल्याचे झाले वाल्मीकी

||श्री स्वामी समर्थ||

||ब्रम्हांडनायकाच्या अद्भुत लीला||

   || वाल्याचे झाले वाल्मीकी||

"अक्कलकोटच्या जवळच्या गावी दोन भील्लांनी धुमाकुळ घातला होता.
ते वनात टपुन बसायचे आणी येणाऱ्या-जाणाऱ्यांना लुटायचे.
भल्या बोलांनी कोणी आपलं धन दिल तर ठीक नाहीतर त्यांना ठार मारण्या
पर्यंत त्यांची मजल गेली होती.
त्या मुळे लोकांनी त्या वाटे वरून जायचंच बंद केलं होतं.
'श्रीमंत असेल तर स्वामी साठी धन नेणार आणी
गरीब स्वामी कडून धन घेऊन जाणार',असं गृहीत धरुन त्यांनी अक्कलकोटलाच्या रस्तावर
स्वामी भक्तांना लुटायचं ठरवलं.
त्यांच्यावर नजर ठेवायला एक भील्ल वेश पालटून स्वामी कडे जातो.
तिथे एक श्रीमंत व्यक्ती स्वामींना धनाची पिशवी देतो.
स्वामी त्या पिशवीला एका गरीबीनी गांजलेल्या व्यक्तीला देतात.
तो वृद्ध व्यक्ती भील्लांच्या भितीनी स्वामींना रात्रभर मुक्काम करण्याची परवानगी मागतो.
स्वामी स्पष्टपणे नकार देतात.
मग त्याला आपल्या हातातली अंगठी देतात आणी म्हणतात-
"काहीही झालं तरी अंगठी बोटातून काढायची नाही!"
"आम्ही तुझ्या पाठीशी आहो!"
रस्त्यात भील्ल वृद्ध व्यक्तीला रस्त्यात गाठतात आणी त्याची पिशवी हिसकावण्याचा प्रयत्न करतात.
काहीही झालं तरी तो वृद्ध ती पिशवी द्यायला तयार नसतो.
तितक्यात स्वामींची कडक हाक कानावर पडते- "हे काय चाललं आहे?"
भील्ल पाहतात तर काय ते सर्व वनातुन थेट अक्कलकोटला स्वामींच्या वट-वृक्षा
समोर आहे.
स्वामी म्हणतात-"काय रे! वेश बदलून आला तर काय वाटलं आम्ही तुला ओळखू
शकत नाही?"
"तुम्ही जगापासून दुर जाऊ शकतात पण आमच्या पासुन दुर जाऊ शकत नाही."
"अरे लोकांचा घामा-कष्टांनी मेहनितीने कमवलेला पैसा कशाला लुबाडतात?"
"अरे स्व-कष्टांनी पैशे कमवा!"
"तुम्हाला काय वाटतं ,तो परमात्मा तुम्हाला काय असाच सोडून देईल?"
"अरे अश्या वाईट कर्मांचे फळ आज नाही तर उद्या भोगावेच लागेल."
"तुम्ही जगातल्या न्यायव्यवस्थेला फसवू शकतात पण देवाच्या न्याया-पासुन कशे वाचणार?"
दोनी भील्ल स्वामींना शरण येतात, आणी आजपासून आम्ही स्वताला बदलण्याचा प्रयत्न
करू असं वचन देतात.
स्वामी म्हणतात-" आम्ही ज्याच्या पाठीशी असतो त्याचं साक्षात काळ ही काही वाकडं करू शकत नाही!"

!!नित्य माझी मानस पुजा!!
!!अक्कलकोटी होते वारी!!
!!चरण स्वामींचे दर्शन घेता!!
!!स्वर्ग सुखाची पहिली पायरी!!

||अवधुत चिंतन गुरुदेव दत्त||

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!