अशक्य ही शक्य करतील स्वामी ।
अशक्य ही शक्य करतील स्वामी ।
!! तारक मंत्र !!
ह्या दोन शब्दातच त्याचा अर्थ आहे ...
जो आजाराने त्रासलेला आहे, जो चिंतेने ग्रासलेला आहे ...
ह्यांना तारण्यासाठी नेहमी स्वामी काय तरी उपाय करताच ...
स्वामि नी आपल्याला हि अनमोल भेट दिली आहे तारक मंत्र देऊन ...
तारक मंत्रात इतकी प्रचंड शक्ती आहे कि मी ,तुम्ही आणि आपण कोणीच विचारही करू शकत नाही ...
शेवटही ती स्वामींची शक्ती ...अगम्य शक्ती ...
हा मंत्र तुम्ही म्हणायला सुरवात करा आणि
बघा तुमच्या शरीरीरात एक मानसिक बळ येते ते ..
आणि हो जर हा मंत्र तुम्ही हळू हळू म्हटला तर खूपच बळ ,शक्ती अंगात संचारते हा माझा आणि आपल्याच स्वामी भक्तांचा अनुभव आहेच ...
या मंत्रात एक कडवे आहे कि "अतर्क्य अवधूत हे स्मरण गामी ,अशक्य हि शक्य करतील स्वामी ,,,
"फक्त आणि फक्त ह्या वचनावर स्वामींवर विश्वास ठेवा आणि बघा ह्या जगातील कितीही मोठी गोष्ट असून द्या ...
ती तुम्ही सहजच मिळवाल आणि नंतर तुमचे आजूबाजूचे मित्र म्हणा किवा नातेवाईक म्हणतील असे तू काय करतो रे कि तुझी प्रगती एकदम झपाट्याने होते ती ...
तेह्वा मनातल्या मनात स्वतः लाच बोला कि "माझ्या मागे माझे गुरु स्वामी समर्थ आहेत, ह्या जगाचा जो एकच मालक आहे.
ह्या जगात झाडांची पाने सुद्धा जो हलवतो ,सर्वांचे रक्षण करतो ...
असे स्वामी महाराज माझ्या मागे होते ...आहेत ...आणि .स्वामी सद्देव आपल्या पाठीशी असतात पण आपणच त्यांना ओळखू शकत नाही ...
कुठल्या ना कुठल्या मार्गाने स्वामी आपल्याबरोबर नेहमी असतात फक्त आपण हे लक्ष्यात आणले पाहिजे कि स्वामी सदैव माझ्या बरोबर आहेत ...
ते म्हणतात ना "भगवंताला.. माझ्या, आपल्या... स्वामिंना बघायला तशी दृष्टि असावी लागते "...
🌿॥श्री स्वामी समर्थ तारक मंत्र॥🌿
नि:शंक होई रे मना।
निर्भय होई रे मना रे।
प्रचंड स्वामीबळ पाठीशी
नित्य आहे रे मना।
अतर्क्य अवधुत हे स्मरणगामी।
अशक्य ही शक्य करतील स्वामी॥१॥
जिथे स्वामीचरण तिथे न्युन काय।
स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय।
आज्ञेविन काळ ना नेई त्याला।
परलोकीही ना भिती तयाला॥२॥
अशक्य ही शक्य करतील स्वामी ।
उगाची भितोसी भय हे पळु दे।
वसे अंतरी स्वामी शक्ती कळु दे।
जगी जन्ममृत्यु असे खेळ ज्यांचा।
नको घाबरु तु असे बाळ त्यांचा॥३॥
अशक्य ही शक्य करतील स्वामी ।
खरा होई जागा श्रद्धेसहीत।
कसा होशी त्याविण तु स्वामीभक्त।
आठव कितीदा दिली त्यांनीच साथ।
नको डगमगु स्वामी देतील हात॥४॥
अशक्य ही शक्य करतील स्वामी ।
विभुती नमन नाम ध्यानादी तीर्थ।
स्वामीच ह्या पंचप्राणामृतात।
हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती।
न सोडी कदा स्वामी ज्या घेई हाती ॥ ५॥
अशक्य ही शक्य करतील स्वामी ।
श्री स्वामी चरणार विंदार्पणमस्तु
🔯🔯॥श्री स्वामी समर्थ॥🔯🔯
🌹स्वामीगुरूमाऊली🌹 A
श्री स्वामी समर्थ
ReplyDeleteKhup Shakti ahe Tarak mantra madhe.mazya mulasamor me roj bolate,ani to kharokharach bara zala tyachya brain injury madhun.Swami khup Changle ahat tumhi,maza Krish tumacha das honarach.Swami Om...Shree Swami Samartha.
ReplyDeleteSwami Om
Deleteश्री स्वामी समर्थ
ReplyDeleteश्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏
ReplyDeleteश्री स्वामी समर्थ महाराज 💐🙏🌹🙏💐
ReplyDeleteShree swami samarth
ReplyDeleteश्री स्वामी समर्थ
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteपूरा नहीं समझ आता है फिर भी भाव बहुत सहारा देता है। शुक्रिया।
ReplyDelete
ReplyDeleteBeautiful post 🙏. Devotees looking for peaceful chanting can try this:
Swami Samarth Mantra App | स्वामी समर्थ मंत्र अॅप
Very enlightening content on Lord Datta 🙏. A helpful mantra app:
Shri Datta Prabhu Mantra App | श्री दत्त प्रभू मंत्र अॅप
Lovely article on Goddess Laxmi 🌸. For daily Aarti & Mantra:
Laxmi Aarti & Mantra App | लक्ष्मी आरती आणि मंत्र अॅप
Jai Shri Ganesh 🙏. A soothing mantra + chalisa app:
Ganesh Mantra & Chalisa App | गणेश मंत्र आणि चालीसा अॅप
Jai Hanuman! 🔥 Powerful Hanuman Aarti & Chalisa:
Hanuman Aarti & Chalisa App | हनुमान आरती आणि चालीसा अॅप
Spiritually energetic content! Strong Kali mantras:
Maha Kali Mantra App | महाकाली मंत्र अॅप
Har Har Mahadev! 🕉️ Peaceful meditation mantras:
Shiv Mantra App | शिव मंत्र अॅप