शेवगा लागवडीचे नियोजन असे कराल Drumstick cultivation practices

शेवगा नियोजन असे कराल♥प्रगतशील शेतकरी

♥शेवग्याची लागवड सर्व प्रकारच्या हलक्‍या, माळरान, डोंगर-उताराच्या जमिनीत करता येते. लागवडीसाठी कोइमतूर-1, कोइमतूर-2, पीकेएम-1, पीकेएम-2 आणि कोकण रुचिरा या जाती निवडाव्यात. लागवड फाटे कलम किंवा बियांपासून करावी. ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यांत शेवग्याची लागवड करावी. लागवड करताना दोन झाडातील अंतर 4 मीटर बाय 4 मीटर किंवा 5 मीटर बाय 5 मीटर ठेवावे. लागवडीसाठी 60 सें.मी. बाय 60 सें.मी. बाय 60 सें.मी. आकाराचे खड्डे खणून त्यामध्ये खड्डा भरताना तळाशी कुजलेला काडी-कचरा, गवत, पाचट यांचा थर द्यावा.
तसेच शेणखत एक घमेले, 500 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट व माती या मिश्रणाने खड्डा भरावा. पिकाला गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. लागवडीनंतर 8 ते 10 महिन्यांनी शेंगउत्पादन सुरू होते.

♥जमीन व हवामान :

सम व दमट हवामानात या पिकाची वाढ चांगली होते. वाळूमिश्रित पोयट्याच्या तसेच डोंगर उतारावरील हलक्या माळरानाच्या भरास जमिनीतही या पिकाचे उत्पन्न येते.

♥सुधारित जाती :

कोकण रुचिरा, पी. के. एम – १ व २ आणि धनराज या शेवग्याच्या सुधारित जाती आहेत. ‘ कोकण रुचिरा’ हि जात विद्यापीठाने निवड पद्धतीने विकसित करून कोकणात लागवडीसाठी प्रसारित केली आहे. या जातीच्या शेंगा गर्द हिरव्या, मध्यम लांब व शिजण्यास उत्तम असतात. या जातीच्या झाडापासून ३० ते ३५ किलो प्रती झाड शेंगांचे उत्पन्न होते. पी. के. एम १ च्या शेंगा ४५ सें. मी. लांब तर  पी. के. एम २  च्या शेंगा  १.५ मीटर लांब असतात.

♥लागवड :

कमी पावसाच्या प्रदेशात जून – जुलै मध्ये तर जास्त पावसाच्या प्रदेशात ऑगस्ट- सप्टेंबर मध्ये लागवड करावी.  लागवड करताना दोन झाडांतील व दोन ओळींमधील अंतर ४ ते ५ मीटर ठेवावे. लागवड १. ते २ मीटर लांबीचे खुंट किंवा बियापासून रोपे तयार करून करता येते.

♥खते :

प्रतिवर्षी प्रत्येक झाडास १० किलो शेणखत, ७५ ग्रॅम नत्र, ५० ग्रॅम स्फुरद व ७५ ग्रॅम पालाश पावसाळ्याच्या सुरुवातीस द्यावे.

♥आंतरमशागत व पाणी :

सुरुवातीच्या काळात झाडास वळण देणे आवश्यक असते. त्यासाठी लागवडीनंतर ३ ते ४ महिन्यांनी एकदा ६ ते ८ महिन्यांनी एकदा अशा दोन छाटण्या कराव्यात. पहिली छाटणी जमिनीपासून एक मीटरवर करावी. दुसर्या छाटणीच्या वेळी आलेल्या फांद्या छाटाव्यात. जरूर त्यावेळी झाडाच्या बुन्ध्याजावालील गावात काढावे. पहिली दोन ते तीन वर्षे पाणी द्यावे.

♥किड व रोग व्यवस्थापन

किड / रोगलक्षणे – नुकसानीचा प्रकार उपाय

खोड व फांद्या पोखरणारी अळीअळी खोड पोखरुन आत शिरते. त्यामुळे झाड कमकुवत होते व प्रादुर्भाव झालेल्या झाडांच्या बुंध्यावर  अळीने बाहेर पडलेला भुसा दिसुन येतो.छिद्रामध्ये डायमेथोएट मध्ये भिजलेला कापसाचा बोळा टाकुन छिद्राचे तोंड बंद करावे.

पाने गुंडाळणारी अळीअळी पाने गुंडाळुन त्यावर उपजिविका करते.थायोमेथॉक्झाम १ ग्रॅम प्रति १० ली. पाण्यात मिसळुन फवारावे.

शेवगा कॅन्करया रोगाच्या प्रादुर्भावामुळे रोपांची जून ते ऑगस्ट या महिन्यात मोठ्या प्रकारावर मर होते.शेवग्याचे बी पेरणीपुर्वी ०.१% कार्बेन्डेन्झिम ०.१%  किंवा १% बोर्डोमिश्रण द्रावण रोपांच्या बुंध्याशी ओतावे तसेच कार्बेन्डेन्झिम (०.१%) रोपांवर फवारावे.

शेवग्यातील मरया रोगाच्या प्रादुर्भावामुळे रोपांची मोठ्या प्रमाणावर मर होते.पेरणीपुर्वी बियाणे कार्बेन्डेन्झिम (१ ग्रॅम) बुरशीनाशकाच्या द्रावणात २४ तास बुडवून नंतर पेरावे. उगवणीनंतरच्या बुरशीनाशकाच्या एकूण तीन फवारण्या दर १० दिवसांच्या अंतराने द्याव्यात.

♥काढणी आणि उत्पन्न :

शेवग्याची काढणी शेंगा कोवळ्या असताना करावी. झाड जसजसे वाढत जाते तसतशी त्याच्या उत्पादनामध्येही वाढ होते. सुमारे २५ ते ४५ किलो / झाड सरासरी उत्पन्न मिळते.

संकलित!
भूषण खैरनार.

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!