सोयाबीन आढळणा-या प्रमुख किडी व त्यांचे व्यवस्थापन*
सोयाबीन आढळणा-या प्रमुख किडी व
त्यांचे एकात्मिक किड नियंत्रण असे कराल♥प्रगतशील शेतकरी♥
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
♥खोडमाशी*-
ही सोयाबीन पिकावरील महत्वाची कीड असून सर्व भारतात या किडींचा प्रादुर्भाव आढळून येतो.
खोडमाशीची मादी सोयोबीनच्या पानावरील शीरेजवळ अंडी घालते.
अंड्यातून अळी बाहेर येऊन शीरेतून देठात व देठातून खोडात पोखरत जाते पिकांच्या सुरवातीच्या काळात या किडीचा प्रादुर्भाव झाल्यास रोप मरते.
उशिरा प्रादुर्भाव झाल्यास झाडाच्या वाढीवर परिणाम होऊन फुले व शेंगाचे प्रमाण कमी होते.
♥तंबाखुवरील पाने खाणारी अळी
अनुकुल हवामान मिळाल्यास या किडीचा फार मोठ्या प्रमाणावर उद्रेक होऊ शकतो. किडीचा मादी पतंग पानाच्या मागील बाजूस पुंजक्याने अंडी घालतो.
अंड्यातून बाहेर आलेल्या अळ्या सुरवातीला समुहाने एकाच झाडाची पाने कुरतडतात.
नंतर त्या सर्व शेतात पसरतात.
कोवळ्या शेंगा असताना प्रादुर्भाव झाल्यास अळ्या शेंगा कुरतडून आतील दाणे खातात. अशावेळी पिकाचे उत्पादन ७० टक्क्यपेक्षा जास्त घटते.
♥बिहार सुरवंट
ही किड भारतात सर्वत्र आढळते.
सुरवातीस अळ्या एकाच झाडावर पुजक्याने राहतात व पानांचे हरीतद्रव्य खाऊन टाकतात. त्यामुळे पाने जाळीदार होतात.
त्यानंतर अळ्या सर्व शेतात पसरतात व पुर्ण पाने खातात.
किडीच्या अळ्या केसाळ असून प्रथम त्यांचा रंग पिवळा असतो व नंतर तो राखाडी होतो.
♥पाने पोखरणारी अळी
कमी पाऊस व कोरडे हवामान असल्यास या किडीचा प्रादुर्भाव वाढतो.
किडीच्या अळ्या पानाच्या वरील बाजूस नागमोडी आकारात पाने पोखरत जातात व वाढ पुर्ण झाल्यावर तेथेच कोषावस्थेत जातात.
एका पानावर एकापेक्षा जास्त अळ्यांचा हल्ला झाल्यास पान वाकडे तिकडे द्रोणाकार होते व नंतर सुकून गळून पडते.
♥पाने गुंडाळणारी अळी
सतत पाऊस व ढगाळ हवामान राहिल्यास या किडीचा उपद्रव वाढतो.
किडीची अळी चकचकीत हिरव्या रंगाची असते व हात लावताच लांब उडून पडते.
एक किंवा अधिक पाने एकमेकांना जोडून कडा पिवळ्या पडतात व पाने आकसली जातात.
♥मावा
ढगाळ पावसाळी हवामानात या किडीचा प्रादुर्भाव वाढतो.
कीड पानाच्या मागील बाजूस व खोडावर राहून रस शोषते.
या किडीच्या अंगातून साखरे सारखा चिकट द्रव स्त्रवतो.
त्यामुळे झाडावर काळी बुरशी वाढते.
सोयोबीनवरील मावा किडीचा रंग पिवळा किंवा हिरवा असतो.
♥शेंगा पोखरणारी अळी
ही प्रामुख्याने कपाशी, तूर, हरबरा या पिकांवरील कीड असून गेल्या काही वर्षात सोयाबीन पिकावर जास्त प्रमाणात दिसून येऊ लागली आहे कीडीच्या अळ्या सुरवातीच्या काळात पाने खातात.
शेंगा भरण्याच्या काळात शेगा पोखरून आतील दाणे कुरतडतात.
♥हिरवे तुडतुडे
या किडीची पिल्ले व पुर्ण वाढ झालेले कीटक पानाच्या मागील बाजूस राहून रस शोषतात.
त्यामुळे पानांच्या कडा पिवळ्या पडतात व पाने आकसली जातात.
♥शेंगा पोखरणारी सुक्ष्म अळी
सांगली कोल्हापूर या भागात तसेच कर्नाटक राज्यात या किडीच्या प्रादुर्भाव आढळून येतो. पिकाच्या दाणे भरण्याच्या काळात किडीची मादी शेंगावर अंडी घालते.
किडीच्या अळ्या शेंगा पोखरून आतील दाणे खातात.
शेंगा वरून निरोगी दिसतात परंतु अळ्या आतील दाणे खाऊन टाकतात.
त्यामुळे किडीचा प्रादुर्भाव ओळखणे अवघड जाते.
♥हिरवा ढेकूण
ही कीड पानाच्या मागील बाजूस राहून पानातील रस शोषते.
सोयोबीन पिकाच्या विषाणूजन्य रोगांच्या प्रसारास ही कीड मदत करते.
♥हुमणी
ही अनेक पिकांवर पडणारी कीड असून किडीच्या अळ्या जमिनीत राहून रोपांची मुळे खातात.
त्यामुळे पिकाच्या सुरवातीच्या काळात रोपे सुकतात व मरतात.
अळीचे कोष सुप्तावस्थेत जमिनीत राहतात.
पावसाळ्याच्या सुरवातीस अनुकूल हवामान झाल्यावर भुंगेरे कोषातून बाहेर पडतात.
हे भुंगेरे कडुनिंब व बाभळीची पाने खातात व शेणखतात अंडी घालतात.
शेणखताद्वारे सर्व शेतात पसरते.
♥याखेरीज महाराष्ट्रात सोयोबीन पिकावर लाल मखमली अळी, उंट अळी, पांढरा भुंगेरा, करदोटा भुंगेरा इत्यादी किडींचा प्रादुर्भाव कमी अधिक प्रमाणात दिसून येतो.
♥पांढरी माशी
ही कीड पानाच्या मागील बाजूस राहून पानातील रस शोषते.
सोयाबीन पिकाच्या विषाणूजन्य रोगांच्या प्रसारास ही कीड मदत करते.
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
♥नियंत्रणासाठी किटकनाशकांचा वापर
१)पेरणी नंतर १० ते १५ दिवसाच्या आसपास पहिली फवरणी निंबोळी अर्काचि करावी.
२)सोबत एकरी चार प्रकाश सापळे,कामगंध सापळे लावावेत.
वातावरण किड रोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेवून नंतरच रासायनिक किड नाशकांचा वापर करावा.
३) खोडमाशीच्या नियंत्रणासाठी १० टक्के दाणेदार फोरेट प्रती हेक्टरी १० किलो या प्रमाणात पेरणीपुर्वी जमिनीत मिसळावे.
थोयोमेथोक्झाम या किटकनाशकाची ३ ग्रँम प्रती किलो या प्रमाणात बीजप्रक्रीया देखील परिणामकारक आढळून आली आहे.
पाने खाणा-या, पाने पोखरणा-या व गुंडाळणा-या अळ्यांच्या नियंत्रणासाठी हेक्टरी क्विनॉलफॉस २५ इ.सी. १.५ लीटर
किंवा
क्लोरोपायरीफॉस २० इ.सी. १.५ लिटर या किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी.
४) रस शोषणा-या किडींच्या नियंत्रणासाठी डायमेथोएट (०.०३ टक्के) या किटक नाशकांची फवारणी करावी.
५) हुमणी किडीच्या नियंत्रणासाठी शेणखतात ते शेतात पसरण्यापुर्वी २ टक्के मॅलेथिऑन भुकटी मिसळावी.
पावसाळ्याच्या सुरुवातीस भुंगेरे बाहेर पडल्यावर कडू निंबाच्या व बाभळीच्या झाडावर किटकनाशकाची फवारणी करून ते नष्ट करावेत.
संकलीत!
Comments
Post a Comment