काहीतरी अर्थपूर्ण करण्याची स्वप्ने पहावीत...

श्री.संदीपकुमार साळुंखे
IRS ,आयकर आयुक्त,नागपूर.

9 वी ते पदवीच्या शेवटच्या वर्षापर्यंतच्या सर्व मिञ मैञिणींनो..."सैराट" चिञपटाच्या निमित्ताने तुमच्याशी दोन शब्द बोलावेत म्हणून हा whatsapp मेसेज पाठवतो आहे. खरे तर वर्तमानपत्रात लेख लिहणार होतो पण विचार केला की तुम्ही वर्तमानपत्रापेक्षा Whatsapp वरचे मेसेजेस जास्त वाचतात म्हणून whatsapp message करायचे ठरवले. असो. फक्त एक चिञपट म्हणून सैराट उत्कृष्ट आहे, संगीत सुमधुर आहे, नागराज मंजुळे यांचे दिग्दर्शन छान आहे. सर्व कलाकारांचा अभिनयही लाजबाब आहे. पण चिञपटात कोवळ्या, न कळत्या, अडनिळ्या वयातल्या केवळ निसर्गसुलभ आकर्षणाचे केलेले उदात्तीकरण अन् त्या प्रेमीजनांचे निर्णय याने प्रभावित होऊन तुम्हीही आपल्या आयुष्याचे गणित सोडवण्याचा प्रयत्न करु नये असे मनापासून वाटते म्हणून हा लेखनप्रपंच. सांगताना अनेकजण सांगतात की चिञपट पाहून कुणी चांगला वा वाईट होत नाही किंवा आपल्या आयुष्याचे निर्णय घेत नाही वगैरे. पण हे प्रगल्भ व्यक्तींबाबत खरे असते. कोवळ्या वयातल्या मुलामुलींवर चिञपटांचा नक्कीच परिणाम होतो. त्यांना चिञपटाचे नायक नायिका आपले आदर्श वाटत असतात आणि आपणही त्यांच्यासारखेच व्हावे/करावे असे वाटत असते.. वयात येण्याच्या काळात मुलामुलींमध्ये आकर्षण निर्माण होणे हा निसर्गाचा एक साधा नियम/योजना आहे. त्या वयात शरीरात काही विशिष्ट हार्मोन्स तयार होतात त्याचा हा परिणाम असतो. त्यातून निर्माण होणाऱ्या आकर्षणाला "प्रेम" हा शब्द बहाल करुन, सर्व चिञपटउद्योग वर्षानुवर्षे आपला धंदा मांडून बसला आहे (अपवाद सोडून). 12 वी नंतर ज्यांना कुठल्याही व्यावसायिक वा तत्सम चांगल्या कोर्सला/ कॉलेजला प्रवेश मिळत नाही असे लाखो तरुण BA/BSc. ला आणि विशेषतः BA ला प्रवेश घेतात. अगदी छोट्या गावांमध्येही आता कॉलेज उपलब्ध असल्यामुळे 12 वी नंतर कुठेच नंबर नाही लागला म्हणून चला BA ला हा एकमेव निकष असतो. आधीच बारावीला कमी गुण, त्यातून BA करुन आपल्याला ना कुठे नोकरी मिळणार आहे ना व्यवसाय करण्याचे कौशल्य मिळणार आहे हे माहित असल्यामूळे मनात एक सुप्त नैराश्य असते, कॉलेजमध्ये आपल्याला जबरदस्त प्रेरणा देतील, आयुष्याबद्दल काहीतरी उदात्त, ध्येयवादी गोष्टी सांगतील, करीअरचा मार्ग दाखवतील  अशा शिक्षकांची वानवा असते. त्यात शेतीची कशीबशी स्थिती आणि आपल्या मुलामुलीने काहीतरी करावं अशी आईवडीलांची अपेक्षा अशा चक्रव्यूहात ही तरुणाई अडकलेली असते. कॉलेजमध्ये विशेष असं काही करायचं नसतं कारण पदवी कशीतरी पुर्ण करायची आणि मग B. Ed. आणि मग बिनपगारी नोकरी असा पुढचा प्रवास स्पष्टच दिसत असतो. ही आयुष्याच्या भवितव्याविषयीची एक अनामिक पोकळी, थोडी नैराश्याकडे झुकणारी मनस्थिती याचे वर्णन मी माझ्या "धडपडणार्या तरुणाईसाठी" या पुस्तकातल्या "पदवीचा भोज्या" या प्रकरणात केले आहे..अशा मनस्थितीत असताना त्यात भर म्हणून शरीरातले बदल अशी अनेक गोष्टींची सरमिसळ होते. एकीकडे आयुष्यातली पोकळी, रितेपण आणि दुसरीकडे प्रेमभावना आणि काहीतरी वेगळं heroic करण्याची खुमखुमी यातुन पळून जाऊन लग्न करण्यासारखे निर्णय घेतले जातात. पळून जाऊन लग्न करण्यालाही हरकत नाही पण धड स्वतःच्या पायावर उभे राहण्याची ताकत नाही, खरं प्रेम आणि विशिष्ट वयातलं निसर्गसुलभ आकर्षण यातला फरक माहित नाही अशा परिस्थितीत असे निर्णय घेणे योग्य आहे का ? यावर तरुणाईने जरुर विचार करावा. मग या भावना दाबून टाकाव्यात कां ? अजिबात नाही. या प्रेमभावनेला तरुण तरुणींनी निकोप मैञीचे रुप द्यावे. सर्वांनी परस्परांना अभ्यासात मदत करावी. पदवीच्या तीन वर्षात नुसत्या पाट्या न टाकता English speaking, संवाद कौशल्ये, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास, skill India अभियानाअंतर्गत शिकवले जाणारे विविध छोटे मोठे व्यावसायिक कौशल्ये यासारख्या अनेक गोष्टी करुन पदवीची तीन वर्षे वाया न जाऊ देता आपल्या आयुष्याला आकार देण्यासाठी त्याचा उपयोग करावा. तरुणींना तर विशेष सांगणे आहे की अनेक क्षेञात त्यांना उंच भरारी घ्यायची संधी आहे..अनेक ठिकाणी महिलांसाठी 30% आरक्षण आहे..सेवाक्षेञात (नर्सिंग, शिक्षण, Day care centres) यासारख्या अनेक क्षेञात अनंत संधी उपलब्ध आहेत त्यांचा फायदा घेऊन काहीतरी अर्थपूर्ण करण्याची स्वप्ने पहावीत..मिञमैञिणिंनो, आपण सर्व ईश्वरपुञ, ईश्वरकन्या आहोत..आपल्यातील प्रत्येकात ईश्वरी अंश आहे..स्वतःला घडवण्याची अनंत ताकत आपल्यात आहे..आपल्यात जे व्हायची क्षमता आहे ते आपण झालेच पाहिजे....याला कुठल्याही कारणाची गरज नाही...फुलाने कां फुलावे ? याला उत्तर काय ? तर फुलाचा जन्मच मुळी फुलण्यासाठी झाला आहे म्हणून...तसे आपणही खूप शिकावे, कौशल्ये प्राप्त करावीत..आपणही फुलावे...फुलण्याच्या कोवळ्या वयात क्षणिक मोहाला बळी पडून शिकण्याच्या वयात संसार थाटावा अन् सारं तारुण्य करपून टाकावं यात मला तरी काही अर्थ वाटत नाही...पुस्तक वाचून मला अनेक sms, पञं येतात..अनेक मध्यमवयीन, वयस्कर माणसांच्या पञात लिहिलेले असते की आम्हाला योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळाले असते तर आम्ही खूप काही करु शकलो असतो...आयुष्य वाया गेल्याची बोचणी यात असते. असा पश्चात्ताप आपल्यालाही भविष्यात होऊ नये म्हणून उठा मिञमैञिणींनो, स्वतःला सावरा, स्वतःचा विकास करा, करीअर घडवा आपल्या प्रेमीलाही शिक्षणासाठी प्रोत्साहन द्या आणि मग नंतर इतर गोष्टी पंचविशीत करा...आपले आयुष्य क्षणिक मोहाच्या ज्वाळांमध्ये भिरकावून देण्याआधी थोडा सारासार विचार कराच...नाहीतर तुमच्या शोकांतिकांवर अजून एक चिञपट 100 कोटी कमवेल, अजून एखाद्या झिंगाटवर तुम्ही बेभान होऊन नाचता नाचता आयुष्याला भोवळ येऊन तुम्ही आयुष्यातून बाद व्हाल...अन् तुमच्या आयुष्याच्या अपयशावर  तिकडे success party चालेल...........

संकलीत!

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!