हुमनी साठी इलाज असाही
हुमनी साठी इलाज असाही♥प्रगतशील शेतकरी♥
♥(१) वेखंड १ किलो ६ लिटर पाण्यात उकळून ३ लिटर करणे,+५०० ग्रम हिंग २०० लिटर पाण्यात टाकुन हे पाणी ओलावा असतांना ड्रिंचिंग करणे व झाडाच्या बुडाशी टाकणे
♥(२) १ किलो रुईच्या ओल्या काड्या ६ लिटर पाण्यात उकळुन निम्मे होईस्तोवर आटवणे जमीनीवर व बुडाशी टाकणे
♥(३) तंबाखू पावडर जमिनीत पिकाच्याबुडावर ५० ग्रम देणे किंवा अर्क काढुन पाणी ओतणे
♥(४) निवडुंग(साबरकांड) ठेचुन बुडावर टाकणे.
♥(5)रुई/रुचकिण हिरव्या फांदया पानासह 6 किलो 10ते20लिटर पाण्यात निम्मे होईपर्यन्त उकळावे 200 लिटर पाण्यात टाकुन ड्रिचिंग करा किंवा ठिबक मधुन द्यावे
♥(6 )पारंपरिक कृती मागील विज्ञान
आपले वडील आजोबा पहिल्या कोळपणीला रुईची फांदी कोळप्यावर ठेवुन कोळपणी करायला लावत-👉कारण पहिला पाऊस पडला म्हणजे हुमनिचे पतंग निघत कडुनिंबाच्या झाडावर पाला खाउन मिलन होते झाडाखाली पाला पाचोळ्यात किंवा उकिरडया वर हे पतंग अंडी घालतात मग अळया जन्म घेतात आधी शेणखत पाला पाचोला खातात ते नाही मिळाले पिकांच्या मुळया खातात
संकलीत!
Comments
Post a Comment