कपाशी B.T. खत व्यवस्थापन
कपाशी (B.T.) चे खत व्यवस्थापन♥प्रगतशील शेतकरी♥
♥माती परिक्षणानंतर शिफारस केलेल्या खतांचे नियोजन करावे.
♥एकाच वेळी जास्त नत्र (जसे युरीया! 46 % म्हणजे 100 किलो युरीयामध्ये 46 किलो नत्र किंवा नायट्रोजन किंवा N ई. प्रमाणाबाहेर!) देण्याचे टाळावे कारण त्यामुळे झाडे हिरवीगार होतात व किडिंचा प्रादुर्भाव वाढतो. म्हणूनच नत्राची एकुण मात्रा 3 ते 4 हफ्त्यात विभागुन द्यावी.
♥शिफारस केलेली सर्वसाधारण खत मात्रा (कि.ग्रॅ.)प्रती हेक्टर ...
♥बागायती शेती साठी खत नियोजन
खत मात्रा नत्र स्फुरद पालाश
(कि.ग्रॅ.प्रती हेक्टर) N P K
======================================
एकुण आवश्यक मात्रा 150 75 100
======================================
प्रथम मात्रा 60 50 25
पेरणीच्या वेळेस
दुसरी खत मात्रा 30 25 25
पेरणीनंतर 25 दिवसांनी
तीसरी खत मात्रा 30 00 25
पेरणीनंतर 50 दिवसांनी
चौथी खत मात्रा 30 00 25
पेरणीनंतर 75 दिवसांनी
♥कोरडवाहु शेती साठी खत नियोजन
खत मात्रा नत्र स्फुरद पालाश
(कि.ग्रॅ.प्रती हेक्टर) N P K
=====================================
एकुण आवश्यक मात्रा 120 60 75
=====================================
प्रथम मात्रा 60 40 25
पेरणीच्या वेळेस
दुसरी खत मात्रा 30 20 25
पेरणीनंतर 25 दिवसांनी
तीसरी खत मात्रा 30 00 25
पेरणीनंतर 50 दिवसांनी
♥अधिक उत्पन्न व पिक निरोगी ठेवण्यासाठी बीटी कपाशीला स्फुरद व पालाशयुक्त खत योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.
♥बोंडे चांगले पोसण्यासाठी 90 ते 120 दिवसांनी,
द्रवखाद 20:20:00
किंवा
द्रवपोषक 13:00:45 ई. पाण्यात विरघळणार्या खतांची 10 दिवसाच्या अंतराने फवारणी करावी.
♥झिंक, मॅग्नेशिअम आणि बोराॅनची कमतरता भरुन काढण्यासाठी कापसावर आवश्यकतेनुसार फवारणी करावी.
♥मॅग्नेशिअम ची कमतरता असल्यास
पेरणीपासुन 45 ते 75 दिवसांनी मॅग्नेशिअम सल्फेट ची फवारणी करावी.
♥झिंक ची कमतरता असल्यास
कमतरतेची लक्षणे दिसुन आल्यास 5 ते 6 दिवसांच्या अंतराने
झिंक सल्फेट ची फवारणी त्वरित करावी.
♥बोराॅन ची कमतरता असल्यास
पेरणीपासुन 60 ते 90 दिवसांनी ( 1 ते 1.5 ग्रम प्रति लीटर पाण्यात)
बोराॅनची ची फवारणी दर आठवड्यास करावी.
संकलित!
बागायती शेती साठी खत नियोजन करताना तीसरी खत मात्रा,चौथी खत मात्रा मध्ये स्फुरद खते वापरावी नहीं असे का? मला अवश्य कळवा.
ReplyDelete