शेतकरी कडुन भाजीपाला घेताना कधीच घासाघीस bargaining करु नये!
शेतकरी कडुन भाजीपाला घेताना कधीच घासाघीस bargaining करु नये!
"बाजार"🍅🍆🌶🌽🍎🍋🍉🍊🍐
माझ्या एका मित्राने विचारले, "डॉक्टर ,बाजारात गेल्यावर तुम्ही कधीच घासाघीस (bargaining त्याने वापरलेला शब्द ) करत नाही ?"
"नाही", मी उत्तर दिलं.. "जे लोक स्वतःच्या जगण्यासाठी व्यवसाय करतात त्यांच्याशी कसली घासाघीस करायची ?"
माझ्याबरोबर कधी मंडईत आलात तर तुम्हांला कळेल. मी भाजी विक्रेत्यापुढे जाऊन उभा राहतो आणि म्हणतो, "मावशी! एक किलो वांगी द्या, किंवा "मामा! दोन किलो टोमॅटो द्या." मी कधीही त्यांना "मावशी! वांगी कशी दिली ?" किंवा "मामा! टोमॅटो काय भावाने दिले ?", असं विचारत नाही. मुळात आपल्याकडे शेतीमालाचे भाव हे बऱ्याचदा उत्पादन किंमती पेक्षाही कमी असतात. उदाहरण द्यायचं तर..एक किलो टोमॅटो पिकवण्यासाठी शेतकऱ्याला दहा रुपये खर्च येत असेल तर बऱ्याचदा तेच टोमॅटो आपल्याला बाजारात दहा रुपये दराने मिळतात. म्हणजे शेतकऱ्याला ती पाच रूपयांनाच विकावी लागतात. व्यापाऱ्याचे पाच रूपये आणि शेतकऱ्याचे पाच रूपये. म्हणजे दर एक किलोमागे शेतकरी पाच रूपये नुकसान सोसत असतो. मागणीपेक्षा पुरवठा जास्त झाला की हे असं होणारच. मागणीपेक्षा उत्पादन कमी झालं की उलटी परिस्थिती निर्माण होते. वस्तूच्या किंमती वाढत जातात. अशावेळी मात्र आपण लगेच दोन्ही हातांनी बोंबलायला लागतो. आपल्याला एवढीही अक्कल नसते की, आपल्यासाठी शेतकरी नेहमीच नुकसान सोसत असतो तर कधीतरी आपण स्वतःसाठी नुकसान सोसायला काय हरकत आहे?
आपलं सरकारही नालायक आहे. ते कोणत्याही पक्षाचं असू दे ; इथं शेतीमालाचे दर वाढू लागले की, सरकार निर्यातबंदी करून त्याचे दर पाडत असतं ! शेतकरी मेला तर मरु दे पण, आयते खाणारे पांढरपेशी वळू फुकटाफुकटी जगले पाहिजेत !
आता कांद्याच्या बाबतीत असं घडलेलं आहे. लोक एवढे हलकट की, अर्धा कांदा घातलेली भजी तीस रुपयांना घेऊन खातील पण, तीस रूपयांना अर्धा किलो कांदा घेणार नाहीत.
माझी बायको पूर्वी बाज़ारात अशी घासाघीस करायची, मग मी तिच्याशी दोन दोन दिवस बोलणंच बंद करे.
"एवढ्या एवढ्या गोष्टीसाठी तुम्ही माझा अपमान करताय.", ती म्हणायची.
"एवढ्या एवढ्या चार पैशांसाठी तू त्या गरीबांचा अपमान करतेस ते ?!", मी म्हणायचो. एखादी वस्तू अतिशय पाडून मागणं हा अपमानच की !
आपण लोक किती हलकट असतो त्याचं एक उदाहरण सांगतो, आम्ही दोस्त दोस्त परवा असंच फिरायला गेलो. पिझ्झा ,बर्गर ,कोल्ड्रिन्क तुडुंब खाल्लं. प्रत्येकी तीनशे बिल झालं. सर्वांनी ते आनंदानं दिलं. पोट हलकं करण्यासाठी आम्ही मग रस्त्याने फिरू लागलो.
एके ठिकाणी एकदम फ्रेश करवंदे दिसली, टपोरी ,काळीभोर. आमचा एक मित्र पुढं झाला आणि त्यानं पहिला प्रश्न विचारला, "करवंदे कशी दिली ?"
"दहा रुपयाला एक द्रोण !", म्हातारी बोलली!
"पाच रुपयांना एक देणार काय ? देत असशील तर पाच घेतो बघ!", आमचा दोस्त बोलला. करपलेला,आंबवलेला मैदा पिझ्झा नावानं दीडशे रुपयांना खायचा आणि एवढं डोंगरात जाऊन वेचून आणलेली करवंदे पाच रुपयांना मागायची हा आपला दरिद्रीपणाच नाही काय ? याला हलकटपणाही म्हणता येईल ! एवढं शिकून सवरून आपण असे हलकटच राहणार असू तर त्या शिक्षणाचा उपयोगच काय ??
Comments
Post a Comment