उतिसंवर्धन (टिश्यूकल्चर) म्हणजे काय? या पद्धतीने रोपे कशी तयार करतात?
उतिसंवर्धन (टिश्यूकल्चर) म्हणजे काय?♥प्रगतशील शेतकरी♥
♥उतिसंवर्धन (टिश्यूकल्चर) म्हणजे काय? या पद्धतीने रोपे कशी तयार करतात?
♥उति (टिश्यू)संवर्धन (कल्चर) म्हणजे वनस्पतीचा पूर्ण वाढलेला अवयव, नवजात पेशी असलेला भाग.
♥उदा.
शेंडा,
डोळा,
पान,
फूल,
मूळ इ. घेऊन कृत्रिम खाद्यावर, नियंत्रित व निर्जंतुक वातावरणात वाढवणे.
♥टिश्यूकल्चरद्वारे अनेक गोष्टी साधता येतात.
सर्वांत जास्त उपयोग म्हणजे उत्तम झाडाची जलद व अधिक रोपे कमी कालावधीत मिळविता येतात.
♥ज्या वनस्पतीचे टिश्यूकल्चर रोप तयार करावयाचे आहे,
त्या वनस्पतीचा सर्वांत नवीन अवयव/ तुकडा ओळखून जसे की
उसाचा डोळा,
केळीच्या कंदाचा अग्रांकुर,
निलगिरीची नवीन फूट इ.
व तो भाग काही रासायनिक प्रक्रिया करून घेऊन निर्जंतुक करतात व निर्जंतुक वातावरणात बाटलीत आधीच तयार केलेल्या कृत्रिम खाद्यावर टाकतात.
♥या माध्यमात वनस्पती वाढीसाठी लागणारी सर्व अन्नद्रव्ये समाविष्ट असतात. त्याचबरोबर काही संजीवके, संप्रेरके (हार्मोन्स) घातलेली असतात, जेणेकरून मूळ, कंद किंवा फांदीपासून फूट होताना एकापेक्षा जास्त फुटवे होतील, असे अपेक्षित असते.
♥मातृ वनस्पतीपासून छोटासा भाग तोडून कृत्रिम खाद्य व वातावरणात (वातानुकूलित व १६ तासांचा ट्यूबलाईट व आठ तास अंधार) वाढवतात.
♥दर चार ते सहा आठवड्यांनी या वाढीचे माध्यम बदलावे लागते. प्रत्येक वनस्पतीचे टिश्यूकल्चर करणे शक्य आहे;
परंतु सर्वच वनस्पतींचे टिश्यूकल्चर करणे फायदेशीर नसते.
♥टिश्यूकल्चर पद्धतीने रोपे अशा वनस्पतींत करतात, की ज्यांना निसर्गतः अभिवृद्धी करण्यासाठी एकापासून अनेक रोपे तयार होण्यास जास्त कालावधी लागतो.
♥वृक्षांच्या अपुऱ्या उपलब्धतेमुळे व प्रचलित शाकीय पद्धत कार्यक्षम नसल्यास मागणीप्रमाणे मोठ्या प्रमाणावर रोपे तयार होत नसतील, तरच उतिसंवर्धन पद्धत उपयुक्त ठरते.
♥उतिसंवर्धित रोपे प्रयोगशाळेत वर्षभर तयार करण्यात येतात, त्यामुळे गैरहंगामातही रोपांची उपलब्धता होते.
♥रोगमुक्त रोपे तयार करण्यासाठी सूक्ष्म अग्रांकुर पद्धत वापरतात व प्रत्येक गट हा एकाच वयाचा असल्याने पिकांचा काढणीचा कालावधी सारखाच ठेवता येतो.
♥टिश्यूकल्चरद्वारे सर्व वनस्पतींची अभिवृद्धी करणे जरी शक्य असले तरी फक्त ठराविकच वनस्पती या पद्धतीत वापरण्यात येतात.
♥रोपे प्रथम प्रयोगशाळेत व नंतर हरितगृहात प्रस्थापित करावी लागतात.
♥रोपे कृत्रिम खाद्य व वातावरणात तयार झाली असल्याने त्यांची लागवडीआधी व नंतरसुद्धा विशेष काळजी घ्यावी लागते.
♥आनुवंशिकदृष्ट्या सरस मातृवृक्षापासूनच टिश्यूकल्चर पद्धतीने रोपे तयार करणे गरजेचे असते, तरच अपेक्षित उत्पन्न मिळते.
♥ टिश्यूकल्चर यासंदर्भात अधिक माहितीसाठी पुढील क्रमांकावर तज्ज्ञांशी संपर्क साधावा
- ०२४२६-२४३५७८
प्रभारी अधिकारी, जैवतंत्रज्ञान संशोधन केंद्र, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
संकलित!
Comments
Post a Comment