सेल्स मैनेजर.. Poem on sales manager

Poem on Sales Manager

शांताबाई ला स्मरुन सुचलेली "एरिया सेल्स मैनेजर" वर कविता

सेल्स मैनेजर भाऊ, सेल्स मैनेजर भाऊ
सेल्स मैनेजर भाऊ,अरे सेल्स मैनेजर भाऊ

रुपाची खान,दीसतो छान
जीवाचे रान,मारतो चकरा

डीस्ट्रीब्युटर कडुन रीटेलरकडे मारीतो चकरा,बनवतो बकरा

चकरा बकरा,चकरा बकरा चकरा बकरा,चकरा बकरा,

सेल्स मैनेजर भाऊ, सेल्स मैनेजर भाऊ
सेल्स मैनेजर भाऊ,अरे सेल्स मैनेजर भाऊ

दाखवून देेे जलवा, मार्केटला हलवा,
फुकटचा कालवा,पोरींना बोलवा,
प्रोडक्टला हलवा

बोलवा हालवा, बोलवा हालवा, बोलवा हलवा

सेल्स मैनेजर भाऊ, सेल्स मैनेजर भाऊ
सेल्स मैनेजर भाऊ,अरे सेल्स मैनेजर भाऊ

अटक मटक, गावोगावी भटक एसटी ने भटक,बाइक ने भटक, वेळप्रसंगी काळी पीवळीला लटक

लटक भटक,भटक लटक धुळीने माखलेले,केस तु झटक

लटक भटक, लटक भटक
लटक भटक

सेल्स मैनेजर भाऊ, सेल्स मैनेजर भाऊ
सेल्स मैनेजर भाऊ,अरे सेल्स मैनेजर भाऊ

प्रायमरीची धडपड,
सेकंडरीची गडबड,

टरसरीसाठी करतो खटापटा, टारगेटसाठी असतो आटापिटा

त्याचा आटा पीटा
बघा खटा पटा

कसा आटा पिटा
कसा आटा पिटा

सेल्स मैनेजर भाऊ, सेल्स मैनेजर भाऊ
सेल्स मैनेजर भाऊ,अरे सेल्स मैनेजर भाऊ

क्लोज़िंग साठी फिरतो गरा गरा ,
स्टॉकिस्ट ला तो भेटतो भरा भरा
टारगेटसाठी नुसतं फिरून  मरा
सँलरी ची वाट बघतो भरा भरा

सेल्स मैनेजर भाऊ, सेल्स मैनेजर भाऊ
सेल्स मैनेजर भाऊ,अरे सेल्स मैनेजर भाऊ

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!