दत्त पायधूळ

दत्त पायधूळ

लाथाडते  कुणी | लावे कुणी माथी |
मातीची हि गती | कळे कुणा ||
लोहाचीही  माती | देहाचीही माती |
पंच महाभूती | बांधलेली ||
ऐशा या मातीचा | करुनिया गोळा |
अहंते फुंकला | कैसा कुणी  ॥  
मातीचा महाल | नभी पसरला |
आरशी लिंपला | देखणा पै ||
परी काळवशे | पुनरपी माती  |
जन्म मृत्यू किती | भोगतसे  |
विप्राची या माती | का न कळे कशी
झाली पुण्यराशी | सुकृताने ||
दत्त पायतळी | प्रेमे अंथरली |
पायधूळ झाली | कृपा त्यांची ||

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!