।। शांत पणे वाचा व समजून घ्या ।। Dont worry, be happy
।। शांत पणे वाचा व समजून घ्या ।।
कुठलंही काम तुमच्या जिवापेक्षा मोठं
नाही.
तुमच्या आयुष्यासाठी नोक-या
आहेत, त्यांच्यासाठी तुमचं आयुष्य
नाही.
कृपा करून जमेल, झेपेल
एवढंच काम हातात घ्या.
त्यासाठी आग्रह धरा.
प्रतिष्ठा, पोस्ट वाढत्या पगाराच्या नादाने
किंवा वरीष्ठांची मर्जी संपादन करण्याच्या हव्यासाने न झेपणा-या
जबाबदा-या अंगावर घेऊ नका.
खर्च आटोपशीर ठेवावा.
तुमच्या जीवापेक्षा मौल्यवान काहीही
नाही याचं भान ठेवा.
कुटुंबाला वेळ द्या.
घरच्या तणावपूर्ण वातावरणाचा
परिणाम कामावर होतो आणि घरचं
आनंदी वातावरण कामासाठी
प्रोत्साहन देते.
स्वतःवर स्वतःच मर्यादा घालून घ्या.
ही भयानक स्पर्धा कधीही न संपणारी
आहे.
तुम्ही कुठं थांबायचं हे तुम्ही ठरवा.
कितीही ताण असला, कुठलीही
परिस्थिती ओढवली तरी घरी नीट
समजावून सांगा.
तुमच्या जीवापेक्षा त्यांनाही अधिक
काही नाही याबद्दल खात्री बाळगा.
ज्यांच्या सगळ्या आशा-अपेक्षा
तुमच्यावर आहेत ते आई-वडील,
जीवनभराच्या साथीची अपेक्षा करणारी बायको
आणि ज्यांना तुमचा
हात धरून आपली चिमुकली पावलं
टाकायची आहेत ते चिमणे जीव यांना
तुमची नितांत गरज आहे याची
जाणीव ठेवा.
त्यासाठी तुम्ही दीर्घायुषी स्वस्थ
आणि आनंदी राहणं गरजेचं
आहे.तणाव नियोजनासाठी तुमच्या
आवडी-निवडी जपा, स्वतःसाठी
थोडातरी वेळ काढा.
संगीत, व्यायाम, योगासने, वाचन इ.
चा उपयोग करा.हे सगळं सगळ्यांनाच
माहिती असतं. तरीही आपण
धावतो- ऊर फुटेस्तोवर आणि एक दिवस हातात काहीच उरत नाही.
**3 तत्वे**
"एक म्हणजे क्षुल्लक गोष्टींसाठी ताण निर्माण करू नका."*
"दुसरं म्हणजे आयुष्याच्या अखेरीस सगळ्या गोष्टी क्षुल्लकच असतात "
*" आपली मते इतरांवर लादु नका,
इतरांना गृहीत धरू नका ।
आयुष्यात खूप कॉंप्रमाइज़ केलं.
फक्त एकाच ठिकाणी मानासारखं
जगायला मिळालं ,हसायला मिळालं..
ते म्हणजे आपले मित्र आणि आपला
ग्रूप..आयुष्यात जर मित्रच भेटले नसते
तर कधीच विश्वास बसला नसता की
अनोळखी माणसंसुध्दा रक्ताच्या
नात्यापेक्षा खुप जवळची असतात...!!!
👍
Comments
Post a Comment