डोळस बना, अंध भक्त बनू नका...!!! Think with proper reason..

डोळस बना, अंध भक्त बनू नका...!!!
======================

एक मुलगा बापाला प्रश्न करतो..

मुलगा: - बाबा मला शाळेत शिकवतात की माणूस अगोदर आदि मानव होता. हे खरे आहे काय ?

बाप: - हो बेटा ,पूर्वी माणसे आदि मानव होते.

मुलगा: -मग ते अंगावर कपड़े का घालत नसत.

बाप: - नाही बाळ ,माणसांच्या जीवनात हळु -हळु प्रगती झाली. माणसाला थोडे थोडे कळु लागले तेंव्हा तो अगोदर  झाडाच्या पानांचे कपड़े घालू  लागला मग  त्याला जसे जसे कळु लागले तसे तो सूधारत गेला व अनेक शोध लावत गेला. आत्ता जेव्हढे काय आपण पहातो, वापरतो, ते सगळ माणसांनीच निर्माण केले आहे.

मुलगा: - बाबा मग देव अगोदर होते की माणसे .?

बाबा: - बाळा देव आगोदर होते .
मुलगा: - मग बाबा असे कसे काय हो.  त्या देवांच्या फोटोत तर कपड़े , दागिने ,त्रिशूल, सोने  ,भाले ,गदा, पैसे, लाडू ,मोदक असे अनेक काय -काय दिसते. तसेच माणसाला फक्त दोनच हात, व देवांला, देवीला, चार, आठ , बारा ,सोळा , हात.  मग हा काय प्रकार आहे ? त्या वेळेस दागिने तयार करायला सोनार होता का ? कपड्यांच्या मिल होत्या का ? कपड़े शिवायला टेलर होता का ?
भले ,त्रिशूल ,गधे ,तलवारी बनवानारे कारीगर होते काय ?
लाडू ,मोदक बनवनारे हालवायी होते कां ? बाबा सांगा ना  उत्तर द्या ना बाबा..

बाप:- मूर्खा सारखे प्रश्न विचारू नकोस, गप्प बस !
अरे बाळा, ते देव होते. ते काहीही करू शकतात.

मुलगा: - मग आता देव कुठे आहेत बाबा ?

बाप: - अरे देव आपल्याच आजु बाजूला आहेत.

मुलगा:- काय ? देव आहे इथे ?

बाप: - हो बाळा.

मुलगा: - मग त्याला सांगा ना बाबा. आपल्या देशातला भ्रष्टाचार मिटवायला, शेतकर्यांच्या समस्या सोडवायला , त्यांची फाशी थांबवायाला, 2 वर्षाच्या लहान मुली पासुन 60.वर्श्याच्या बाई पर्यंत बलात्कार रोज होतायत. ते थांबवायाला. मंत्री लोकांनी
आख्या देशाला लुटुन खाल्ले आहे. तो सर्व पैसा बाहेर काढायाला , तसेच देवा जवळच त्याच्या देवळात सोने व  कोट्यावधी रुपये साठलेत. ते  लोक कल्याणा करिता द्यायाला. सांगा ना बाबा. किती तरी जीव आपल्या देशांत कुपोषित राहून मरत आहेत..

बाबा: - बाळा मी तुला हात जोड्तो. बस्स कर तूझे प्रश्न.मलाच अजुन कळले नाही. तर मी तूला काय उत्तर देऊ. मला जसे लहान पणा पासुन शिकवले तसेच मी करत गेलो.
मुलगा: -- म्हणजे तुम्ही आजपर्यंत  तुमच्या बुद्धिचा वापरच केला नाही. पण बाबा मी तसे करणार नाही. सत्य असत्य जानूनच पूढे जाणार आहे. व मला एक खात्री तर पक्की आहे. हे जग मानव निर्मितच आहे. व तुम्ही जसे अज्ञान राहीलात. तसा मी रहाणार नाही .
हे ऐकुंन  बापाची मान खाली गेली व मुलाला नजर चुकऊ लागले . 

म्हणून अशी गोष्ट करा की त्याचे सम्पूर्ण कारण माहिती आहे. विनाकारण कोणी करते म्हणून करू नका. मला वाटत नाही. वरील मुलाच्या प्रश्नाची उत्तरे कुठल्या आई वडिलांकडे असतील. मग ज्याचे आपल्यालाच कळत नाही त्यांची कारणे माहीत नाही . व त्या मध्ये आपण वहात जाने कीती योग्य आहे ? आज नाही, पण कधी ना कधी पुढील पिढीतील मुले असे प्रश्न तुम्हांला नक्की विचारतील. हे लक्षात ठेवा मग तेंव्हा मान खाली घालण्या पेक्षा आत्ताच चुक सुधारुन घ्या . व पुढची पिढी ही देशासाठी तयार करा. देवासाठी नको..

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!