निफ्टी ५० - शेअर मार्केट आढावा २०२० (६ जानेवारीस २०२० ते २६ ऑक्टोबर २०२० पर्यंत)NIFTY 50 - SHARE MARKET REVIEW 2020 (FROM 6 JAN.20 TO 26 OCT.20)

निफ्टी ५० - शेअर मार्केट आढावा २०२०

NIFTY 50 - SHARE MARKET REVIEW 2020 (FROM 6 JAN.20 TO 26 OCT.20)

(खालील माहितीत त्रुटी असण्याची शक्यता आहे, हि माहिती फक्त ज्ञान वाढवण्यासाठी आहे, खालील माहिती हे माझे वैयक्तिक मत आहे आणि ह्या माहितीचा कोणत्याही संस्थेशी, व्यक्तीशी व वास्तूशी संबंध नाही*)

६ जानेवारीस २०२० - १२२०२

३० मार्च २०२०         - ८६६० ( ३ महिन्यात कोवीड मुले शेअर मार्केट ३५०० अंक खाली आला )

२६ ऑक्टोबर २०२० - ११८८७ ( मार्च नंतर परत शेअर मार्केट मूळ स्थितीत येताना )

========================================================

मित्रांनो,

शेअर मार्केट खूप सोपे वाटते आणि तसे आहे पण मला नफा मिळाला कि आनंद आणि तोटा झाला कि दुःख होणे स्वाभाविक आहे. तोटा झाला कि दुःख येणे चांगले पण घाबरणे वाईट आणि नफा मिळाला कि आनंद होणे चांगले पण लोभ होणे वाईटच. 

इंट्राडे ट्रेडर, डिलिव्हरी इन्व्हेस्टर अशी अनेक नावे शेअर मार्केट मध्ये प्रचलित आहे, उद्दीष्ठ एकच आणि ते म्हणजे नफा मिळविणे, यात तोटा व्हावा म्हणून खेळणारे अपवादात्मक व्यक्ती असतील. 

बैल Bullish Market (मार्केट वर जाईल अशी मत असणारे लोक) आणि अस्वल Bearish Market (मार्केट खाली पडेन असा विस्वास असणारी लोक) हे नाव सुद्धा प्रचलित आहे. पण गरुडासारखी (Eagle Eye) तीक्ष्ण नजर आणि शिकार कुठे वळेल आणि अचूक वेळी शिकारीचा समाचार घेणारे लोकच शेअर मार्केट मध्ये यशस्वी होतात. 

शिस्त हाच मूलमंत्र शेअर मार्केट मध्ये उपयोगी होतो. 

क्रमशः 







Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

प्रकल्प म्हणजे काय ? What is Project?