Posts

Showing posts from July, 2015

म्हणूनच मित्रांनो देवाच्या योजनेसाठी नेहमी तयार रहा. जीवनामध्ये अपघाताने काहीच घडत नाही. सर्व पूर्वनियोजीत असते.

Image
सर्व पूर्वनियोजीत असते. डॉ.मार्क,एक प्रख्यात विद्वान कर्करोग डॉक्टर होते. त्यांच्या उत्कृष्ट कामासाठी त्यांचा खूप मोठा सत्कार समारंभ होणार होता.त्यासाठी ते विमानाने निघाले होते.या समारंभाची डॉ मार्क यांना खूप उत्सुकता होती.तांत्रिक बिघाडामुळे विमान मध्येच खाली उतरवावे लागले.8 ते 10 तासाने दुसरे विमान निघणार होते,पण डॉक्टरांना समारंभाला पोहचण्याची घाई असल्याने त्यांनी कार भाड्याने घेवून पुढे जाण्याचा सल्ला वैमानिकाने दिला.त्याप्रमाणे कार घेवून प्रवास चालू केला.पण पुढे गेल्यावर जोराचे वादळ आणि पाऊस चालू झाल्याने डॉ.रस्ता चुकले आणि ते खूप पुढे गेले होते.तोपर्यंत डॉ.दमले होते.त्यांना खूप भूकही लागली होती. जवळच्याच गावातील एका बाईकडे त्यांनी फोन मागितला पण त्या बाई म्हणाल्या की माझ्याकडे फोनच नाही.तसेच इथून संपर्काचे कुठलेच साधन नाही.कृपया आपण माझ्या घरी या ,अल्पोपहार करा अन विश्रांती घ्या.डॉ.दमले होते व त्यांचेपुढे दुसरा मार्गच नव्हता.ते गेले.थोडा फराळ केला तोपर्यंत त्या अनोळखी बाईची प्रार्थनेची वेळ झाली होती.त्या डॉ.ना माझ्याबरोबर प्रार्थनेला या,असे म्हणाल्या. डॉ म्हणाले,माझा दे