Posts

Showing posts from February, 2016

गजानन विजय : अध्याय 4 ... Gajanan Vijay : Adhyay 4

गजानन विजय : अध्याय 4 ... Gajanan Vijay : Adhyay 4 ॥ श्रीगणेशाय नमः ॥ हे सर्वसाक्षी सर्वेश्वरा । नीलकंठा गंगाधरा । महाकाल त्र्यबंकेश्वरा । श्रीओंकारा पाव मशी ॥१॥ तूं आणि रुक्मिणीशा । एक तत्त्व आहां खास । तोय वारी म्हटल्यास । काय जलीं भेद होतो ? ॥२॥ तैसी तुमची आहे स्थिती । तंतोतंत जगत्पति । जैसी ज्याची मानेल मति । तैसा तो तुज बाहत ॥३॥ अनन्यभावें बाहतां । तूं पावसी आपुल्या भक्तां । माता न धरी निष्ठुरता । आपल्या वत्साविषयीं कधीं ॥४॥ मी तुझें अजाण लेंकरुं । नको माया पाताळ करुं । तूं साक्षात् कल्पतरु । इच्छा पूर्ण करी हरा ॥५॥ बंकटलालाचे घरांत । असतां स्वामी समर्थ । प्रकार एक अघटीत । आला ऐसा घडोनी ॥६॥ वैशाख शुद्ध पक्षासी । अक्षयतृतीयेचिया दिवशीं । पितरार्थ उदककुंभासी । देती श्राद्ध करोनिया ॥७॥ अक्षयतृतीयेचा दिवस । वर्‍हाडांतील लोकांस । विशेष वाटे प्रत्येकास । मोठा सण मानिती हा ॥८॥ त्या दिवशीं काय झालें । तें पाहिजे श्रवण केलें । महाराज पोरांत बैसले । कौतुकें लीला करावया ॥९॥ बालकां म्हणती गजानन । चिलीम द्यावी भरुन । तंबाखूची मजकारण । विस्तव वरी ठेवोनिया ॥१०॥ सक

गजानन विजय : अध्याय 3 Gajanan Vijay : Adhyay 3

गजानन विजय : अध्याय  3 Gajanan Vijay : Adhyay 3 ॥ श्रीगणेशाय नमः ॥ जय जय सच्चिदानंदा श्रीहरी । कृपा करावी लौकरी । तुम्ही पदनताच्या वरी । कधीं न कठोर झालांत ॥१॥ तूं करुणेचा सागर । तूं दीन जनाचें माहेर । तूं भक्तासी साचार । कल्पतरु वा चिंतामणी ॥२॥ ऐसा तुझा अगाध महिमा । संत गाती राघवा रामा । दासगणूसी पुरुषोत्तमा । पावा वेळ करुं नका ॥३॥ असो बंकटलाला घरीं । राहाते झाले साक्षात्कारी । दीन दुबळ्यांचे कैवारी । श्रीगजानन महाराज ॥४॥ लांबलांबोनी भक्त येती । समर्थांतें वंदिती । मधु तेथें माशा जमती । न लगे करणें आमंत्रण ॥५॥ एके दिनी काय झालें । तें आतां सांगतों वहिलें । महाराज होते बसलेले । निजासनीं आनंदांत ॥६॥ ती प्रभातीची होती वेळा । प्राची प्रांत ताम्र झाला । पक्षी किलकिलाटाला । करुं लागले वृक्षावर ॥७॥ कुक्कुटाचे होती स्वप्न । मंदशीत वाहे पवन । वृद्ध करिती नामस्मरण । शय्येवरी बैसोनिया ॥८॥ उदयाचलीं नारायण । येऊं पाहे हर्षें करुन । तेणें तम पलायन । करुं लागला कंदरीसी ॥९॥ परम भाविक सुवासिनी । रत सडासंमार्जनीं । वत्स धेनूस पाहोनी । तोडूं लागलीं चर्‍हाटें ॥१०॥ ऐशा त्या रम्य वेळे