Posts

Showing posts from April, 2015

संत हे चालते-बोलते देवच आहेत.

॥ श्रीराम जय राम जय जय राम ॥ प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य महाराज :: ६ एप्रिल :: संत हे चालते-बोलते देवच आहेत. व्यवहारात ज्याला चांगले वागता येत नाही, त्याला नाही परमार्थ करता येणार. व्यवहारात झालेल्या गोष्टींचा मनावर परिणाम होऊ देणार नाही असा निश्चय करावा, आणि सद्‌गुरू आज्ञा प्रमाण मानून तो तडीस न्यावा. साधनावर जोर द्यावा. स्वतः कोण याची ओळख करून घ्यावी. भगवंतापरते कोणी नाही हे कळले म्हणजे मी कोण हे कळते. निर्गुण जरी समजले तरी सगुण नाही सोडू. माझ्या मुखी राम आला यापरते दुसरे भाग्य ते कोणते ? हृदयात स्फूर्ती येऊनच आपण बोलतो; मग आमच्या मुखात राम आला तर तो हृदयात नाही असे कसे म्हणावे ? तुम्ही मला उपनिषदांतले सांगा म्हटले तर कसे सांगू ? ज्याने जे केले तेच तो सांगणार. एक गुरू आज्ञापालन याशिवाय दुसरे काहीच मी केले नाही, तर मी दुसरे काय सांगणार ? संताचा समागम केला म्हणजे आपण मार्गाला लागतो. आपण साधूला व्यवहारात आणतो, आणि नंतर तो आपल्याशी व्यवहाराने वागला म्हणजे त्याच्याजवळ समता नाही म्हणून उलट ओरड करतो ! संत हे देहाचे रोग बरे करीत नसून, त्या रोगांची भिती नाहीशी करतात. संत हे चालते-बोलते द

संत 'तू भगवंताचा आहेस' ही जाणीव देतात.

॥ श्रीराम जय राम जय जय राम ॥ प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य महाराज :: १७ एप्रिल :: संत 'तू भगवंताचा आहेस' ही जाणीव देतात. आपण कोणतेही कृत्य करीत असताना, ज्याकरिता ते कृत्य आरंभिले ते जसे आपल्या डोळ्यासमोर असते, त्याप्रमाणे नाम घेताना, आपण नाम कशाकरिता घेतले त्याची अखंड जाणीव असावी. ही जाणीव अखंड ठेवणे, मी भगवंताचा आहे हे जाणणे, याचे नाव अनुसंधान ठेवणे. वास्तविक आपण भगवंताचे आहोतच, पण मी विषयाचा आहे असे भ्रमाने वाटू लागले. संत 'तू विषयाचा नाहीस, भगवंताचा आहेस' असे सांगतात. हीच संतांची खरी कामगिरी, आणि याकरिता ते नाम घ्यायला सांगतात. नाम घेणे म्हणजे 'मी विषयाचा नाही, भगवंताचा आहे' असे मनाला सांगणे आणि मनात तशी जाणीव उत्पन्न करणे; आणि ही जाणीव टिकविण्याकरिता पुनः पुनः मनाला तेच सांगणे, म्हणजे तेच नाम सतत घेणे. तुम्हाला रामदर्शन पाहिजे म्हणता, पण राम तुम्हाला ओळखता कसा येणार ? रामदर्शन व्हायला रामाचे अंतर काटता आले पाहिजे; रामाला पक्के ओळखता आले पाहिजे. याकरिता अंतःकरणाची पवित्रता पहिजे; शुद्ध भाव पाहिजे. सर्व काही साधने केली, पण भाव नसेल तर ती व्यर्थ होतात. कालांतरा

Shri Guru Charitra Importance & Benefits...

Image

अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान

Image
अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान दिव्य तुझी राम भक्ती भव्य तुझी काया बालपणी गेलासी तू सूर्याला धराया हादरली ही धरणी, थरथरले आसमान लक्ष्मणा आली मुर्च्छा लागुनिया बाण द्रोणागिरीसाठी राया केले तू उड्डाण तळहातावर आला घेऊनी पंचप्राण सीतामाई शोधासाठी गाठलीस लंका तिथे रामनामाचा तू वाजविला डंका दैत्य खवळले सारे, परि हसले बिभिषण हार तुला नवरत्नांचा जानकीने घातला पाहिलेस फोडुन मोती राम कुठे आतला उघडुनी आपली छाती दाविले प्रभु भगवान आले किती गेले किती संपले भरारा तुझ्या परि नावाचा रे अजुनी दरारा धावत ये लवकरी आम्ही झालो रे हैराण धन्य तुझे रामराज्य धन्य तुझी सेवा तुझे भक्त आम्ही सारे उपाशी का देवा घे बोलावून आता कंठाशी आलेप्राण संकलित!

माझे सद्गुरुराव मारुति-अवतार | कोणी हा संदेह धरू नये ||

Image
माझे सद्गुरुराव मारुति-अवतार | कोणी हा संदेह धरू नये || माझे सद्गुरुराव मारुति-अवतार | कोणी हा संदेह धरू नये || दया ती पहावी सद्गुरूनाथांची | समर्थांचे परी शोभतसे || नारी-नर ज्याला झाले रामरूप | नाही नाही भेद तिळप्राय || कोट्यानुकोटी उद्धरिले लोक | रामनाम एक बोधूनिया || करुनी व्यवहार परी नाही लिप्त | पंकांतूनि गगन तैसे जाणा || सच्चिदानंद स्वरूपी निमग्न | रामरूप सत्य सत्य जाणा || तुर्यातीत अवस्था आहे निरंतर | ब्रह्मानंद खूण सांगतसे || ||श्रीराम जय राम जय जय राम|| ___/|\___

नि:शंक हो निर्भय हो मना रे। प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे ॥

नि:शंक हो निर्भय हो मना रे। प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे ॥ अतर्क्य अवधुत हे स्मरणगामी । अशक्य ही शक्य करतील स्वामी ॥१॥ जिथे स्वामीपाय तिथे न्युन काय । स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय ॥ आज्ञेविन काळ ना नेई त्याला । परलोकीही ना भिती तयाला ॥२॥ उगाची भितोसी भय हे पळु दे । जवळी उभी स्वामी शक्ती कळु दे ॥ जगी जन्ममृत्यु असे खेळ ज्यांचा । नको घाबरु तु असे बाळ त्यांचा ॥३॥ खरा होई जागा श्रद्धेसहीत । कसा होशी त्याविण तु स्वामीभक्त ॥ कितीदा दिला बोल त्यांनीच हात । नको डगमगु स्वामी देतील साथ ॥४॥ विभुती नमन नाम ध्यानादी तीर्थ । स्वामीच ह्या पंचप्राणामृतात ॥ हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती । न सोडी कदा स्वामी ज्या घेई हाती ॥५॥ **॥ श्री स्वामी चरणारविंदार्पणमस्तु ॥**

४ एप्रिल :: संत कसे असतात ? How is nature of Saint(Good person)

॥ श्रीराम जय राम जय जय राम ॥ प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य महाराज :: ४ एप्रिल :: संत कसे असतात ? आपले शहाणपण बाजूला ठेवून जो संताला शरण जातो तोच खरा साधक. ज्याला सर्व सृष्टी रामरूप दिसते, आणि शिष्यालाही जो रामरूप पाहतो, तोच खरा गुरू. सदगुरू कधीही मिंधेपणाने वागत नाही, आणि त्याला भीतीचा लवलेशही नसतो. आपला शिष्य कोणत्या आध्यात्मिक भूमिकेवर आहे हे संतांना कळते. देहबुद्धीचे लोक विषयाचे दास असतात, पण संत मात्र विषयावर मालकी गाजवतात. संतांजवळ जे समाधान असते ते आपल्याला लाभले, किंवा त्याची आवड उत्पन्न झाली म्हणजे संताची प्रचीती आली असे समजावे. औषध काय आहे हे न कळतासुद्धा रोग्याने ते श्रद्धेने घेतले तर त्याला गुण येतो, किंवा एखाद्याला स्वयंपाक करता आला नाही तरी त्याला अन्नाची चव समजते आणि तो पोटभर जेवू शकतो. त्याचप्रमाणे एखाद्याला ज्ञानाचा अनुभव येईल, पण शब्दाने त्याला तो सांगता येईलच असे नाही. मीठ खारट आहे याचे जसे आपल्याला दुःख होत नाही, त्याचप्रमाणे जगामधल्या लढाया, हाणामार्‍या, सज्जनांचा छळ, संकटे, यांचे संतांना वाईट वाटत नाही. 'वाईट वाटत नाही' याचा अर्थ ते त्यांना आवडते असा मात

देव म्हणाला.. “विश्वास ठेव” God Says "Trust Me"

देव म्हणाला.. “विश्वास ठेव” काहीतरी छान वाचण्यासारख: देवासमोर उभा होतो, हताश मी हात जोडून डोळ्यामध्ये पाणी होते, मनातून गेलो पूर्ण मोडून मी म्हणालो, “देवा , काय करू कळत नाही” “प्रश्नाच उत्तर मिळत नाही” देव म्हणाला.. “विश्वास ठेव” “सगळेच रस्ते बंद आहेत आशेचे दिवे मंद आहेत” देव म्हणाला.. “विश्वास ठेव” “आज असं वास्तव आहे जिथे आशेचा किरण नाही उद्या काही छान असेल असा आजचा क्षण नाही" मी म्हणालो "कशावर मी विश्वास ठेवावा जगामध्ये विश्वास आहे तुझ्याकडे काय पुरावा ? ” शांतपणे हसत देव म्हणाला "पक्षी उडतो आकाशात, आपले पंख पसरून विश्वास असतो त्याचा, खाली न पडण्यावर.. मातीमध्ये बी पेरतो, रोज त्याला पाणी देत विश्वास असतो तुझा रोप जन्म घेण्यावर.. बाळ झोपते खुशीत, आईच्या कुशीत, विश्वास असतो त्याचा, तिने सांभाळून घेण्यावर.. उद्याचे बेत बनवतो, रात्री डोळे मिटतो विश्वास असतो तेंव्हा पुन्हा प्रकाश होण्यावर.. आज माझ्या दारी येऊन, आपली सगळी दुखः घेऊन, विश्वास आहे तुझा मी हाक ऐकण्यावर.. असाच विश्वास जागव मनात, परिस्थिती बदलते एका क्षणात नकळत तुझ्य

Must Story of why to make friends? अच्छे लोग हर किसी के दिल में अपनी जगह बना लेते हैं....

Must Story of why to make friends? अच्छे लोग हर किसी के दिल में अपनी जगह बना लेते हैं.... एक बहुत बड़ा सरोवर था। उसके तट पर मोर रहता था, और वहीं पास एक मोरनी भी रहती थी। एक दिन मोर ने मोरनी से प्रस्ताव रखा कि- "हम तुम विवाह कर लें, तो कैसा अच्छा रहे?" मोरनी ने पूछा- "तुम्हारे मित्र कितने है ?" मोर ने कहा उसका कोई मित्र नहीं है। तो मोरनी ने विवाह से इनकार कर दिया। मोर सोचने लगा सुखपूर्वक रहने के लिए मित्र बनाना भी आवश्यक है। उसने एक सिंह से.., एक कछुए से.., और सिंह के लिए शिकार का पता लगाने वाली टिटहरी से.., दोस्ती कर लीं। जब उसने यह समाचार मोरनी को सुनाया, तो वह तुरंत विवाह के लिए तैयार हो गई। पेड़ पर घोंसला बनाया और उसमें अंडे दिए, और भी कितने ही पक्षी उस पेड़ पर रहते थे। एक दिन शिकारी आए। दिन भर कहीं शिकार न मिला तो वे उसी पेड़ की छाया में ठहर गए और सोचने लगे, पेड़ पर चढ़कर अंडे- बच्चों से भूख बुझाई जाए। मोर दंपत्ति को भारी चिंता हुई, मोर मित्रों के पास सहायता के लिए दौड़ा। बस फिर क्या था.., टिटहरी ने जोर- जोर से चिल्लाना शुरू किया। सिंह समझ गया, कोई शिकार ह

Actually it is the absence of Love, Faith & True belief in God.

Actually it is the absence of Love, Faith & True belief in God. Thought Provoking In 1902, a professor asked his student whether it was God who created everything that exists in the universe? Student replied: Yes He again asked: What about evil? Has God created evil also? The student got silent... Then the student requested that may he ask a question from him? Professor allowed him to do so. Student asked: Does cold exist? Professor said: Yes! Don't you feel the cold dear? Student said: I'm sorry but you are wrong sir. Cold is a complete absence of heat... There is no cold, it is only an absence of heat. Student asked again: Does darkness exist? Professor Said: Yes! Student replied: you are again wrong sir. There is no such thing like darkness. It’s actually the absence of light. Sir! We always study light & heat, but not cold & darkness. Similarly, the evil does not exist. Actually it is the absence of Love, Faith & True belief

Story about Faith बस यूही चल रहा है मेरा भारत महान ।

Story about Faith  बस यूही चल रहा है मेरा भारत महान । किसी मज़ार पर एक फकीर रहते थे। सैकड़ों भक्त उस मज़ार पर आकर दान-दक्षिणा चढ़ाते थे। उन भक्तों में एक बंजारा भी था। वह बहुत गरीब था, फिर भी, नियमानुसार आकर माथा टेकता, फकीर की सेवा करता, और फिर अपने काम पर जाता, उसका कपड़े का व्यवसाय था, कपड़ों की भारी पोटली कंधों पर लिए सुबह से लेकर शाम तक गलियों में फेरी लगाता, कपड़े बेचता। एक दिन उस फकीर को उस पर दया आ गई, उसने अपना गधा उसे भेंट कर दिया। अब तो बंजारे की आधी समस्याएं हल हो गईं। वह सारे कपड़े गधे पर लादता और जब थक जाता तो खुद भी गधे पर बैठ जाता। यूं ही कुछ महीने बीत गए,, एक दिन गधे की मृत्यु हो गई। बंजारा बहुत दुखी हुआ, उसने उसे उचित स्थान पर दफनाया, उसकी कब्र बनाई और फूट-फूट कर रोने लगा। समीप से जा रहे किसी व्यक्ति ने जब यह दृश्य देखा, तो सोचा जरूर किसी संत की मज़ार होगी। तभी यह बंजारा यहां बैठकर अपना दुख रो रहा है। यह सोचकर उस व्यक्ति ने कब्र पर माथा टेका और अपनी मन्नत हेतु वहां प्रार्थना की कुछ पैसे चढ़ाकर वहां से चला गया। कुछ दिनों के उपरांत ह

Something about Spiritual Mentor ( गुरु )

Something about Spiritual Mentor ( गुरु ) प्रश्न : गुरु कुणाला म्हणतात ? गुरूंचे स्वरूप काय ? उत्तर : गु म्हणजे गुप्त आणि रु म्हणजे रूप. आत्म्याचे गुप्त रूप साधकाला दाखवणारा, साधकाच्या अनुभवास आत्मरूप आणून देणारा(१) तो गुरु. आत्म्याचे गुप्त अंग जो दाखवितो तो गुरु. गुरुपद म्हणजे तत्पद. तत्पद म्हणजे स्थूल, सूक्ष्म, कारण व महाकारण या चार देहांच्या पलीकडे असणारे आत्मतत्त्व. तत्पद म्हणजे सत्पद. सत्पद म्हणजेच चित्पद. म्हणून गुरु हे चैतन्यरूप आहेत व त्यांचे पदही चैतन्यरूप आहे. चैतन्य हेच गुरूचे स्वरूप आहे. गुरु हे देहातीत व चैतन्यरूप असतात. निरुपाधिक जीवन हेच त्यांचे खरे स्वरूप. गुरु हा सत्तारूप आहे. गुरु सोहंरूप आहेत. सोहंमधील आकाश म्हणजे चिदाकाश. चिदाकाशात आत्मा तेजोरूपाने आहे; तेच गुरूचे खरे स्वरूप आहे. तेथेच गुरूंचा वास असतो. प्रश्न : व्यवहारात गुरु कसे असतात ? त्यांची आवश्यकता काय ? उत्तर : ज्याला मी गुरु आहे असे वाटत नाही तोच गुरु. दुसर्याला गुरुत्व देतो म्हणूनच तो गुरु. ज्याला आपला शिष्य मोठा व्हावा असे वाटते, तोच खरा गुरु. खर्या गुरूला स्वतःच्या शिष्याचा मोठेपणा

प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य महाराज :: ३ एप्रिल :: संतांना कसे ओळखावे ? How to identify Saint (Good Person)

Discourses of Shri Brahma Chaitanya Gondavalekar Maharaj ॥ श्रीराम जय राम जय जय राम ॥ प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य महाराज :: ३ एप्रिल :: संतांना कसे ओळखावे ? धान्यामध्ये काही असे खडे असतात की धान्यापासून ते वेगळे निवडता येत नाहीत. तांदळात पांढरे खडे असतात, ते निवडू गेले तरी निवडले जात नाहीत. त्याप्रमाणे साधू लोक हे आपल्यात असतात, त्यांना पाहू गेले तर ते आपल्यासारखेच संसारात वावरत असलेले दिसतात; पण त्याप्रमाणे आपण पाहू गेलो तर साधू ओळखता येईलच असे नाही. साधूचे एकच लक्षण सांगता येईल, ते हे की, जो सर्व ठिकाणी देवाला पाहू शकतो तो साधू. पण एवढयावरून आपल्याला तो ओळखता येईल का ? नाही; तर जेव्हा आपण साधू व्हावे, तेव्हाच आपल्याला साधूला ओळखता येईल. जगात आपण कुणाचीच निंदा करू नये. आपण जेव्हा दुसर्‍याचे दोष पाहतो, म्हणजेच ते जेव्हा त्याच्याजवळ आहेत असे दिसतात, त्या वेळेस तेच दोष आपल्याजवळ सूक्ष्म रूपाने असतात असे समजावे; आणि आपण लगेच देवाला शरण जाऊन, 'हे माझे दुर्गुण काढून टाक', म्हणून त्याची करूणा भाकावी. आपण जेव्हा 'जगात न्याय उरला नाही' असे म्हणतो, त्या वेळेस आपल्याजवळ तो दोष

God pray दत्तगुरूंचे नाम स्मरा हो

Image
God pray दत्तगुरूंचे नाम स्मरा हो दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा दत्तगुरूंचे नाम स्मरा हो दत्तगुरूंचे भजन करा हे नामामृत भवभयहारक अघसंहारक त्रिभुवनतारक आत्मसुखाचा मोक्ष लुटाया अमोल ठेवा हाति धरा दत्तचरण माहेर सुखाचे दत्तभजन भोजन मोक्षाचे कवच लाभता दत्तकृपेचे कळिकाळाचे भय न जरा हा उत्पत्ति-स्थिति-लयकर्ता योगज्ञान-उद्गाता, त्राता दत्तचरित मधु गाता गाता भवसागर हा पार करा

सुकून उतना ही देना प्रभु जितने से जिंदगी चल जाए... What pray to God

सुकून उतना ही देना  प्रभु जितने से जिंदगी चल जाए... What pray to God सुकून उतना ही देना  प्रभु जितने से जिंदगी चल जाए, औकात बस इतनी देना कि  औरों का भला हो जाए, रिश्तो में गहराई इतनी हो कि प्यार से निभ जाए, आँखों में शर्म इतनी देना कि बुजुर्गों का मान रख पायें, साँसे पिंजर में इतनी हों कि बस नेक काम कर जाएँ, बाकी उम्र ले लेना कि औरों पर बोझ न बन जाएँ . सुकून उतना ही देना  प्रभु जितने से जिंदगी चल जाए,

Must Read Poem about life ... आहिस्ता चल जिंदगी, अभी कई कर्ज चुकाना बाकी है

आहिस्ता चल आहिस्ता चल जिंदगी, अभी कई कर्ज चुकाना बाकी है कुछ दर्द मिटाना बाकी है कुछ फर्ज निभाना बाकी है रफ़्तार में तेरे चलने से कुछ रूठ गए कुछ छूट गए रूठों को मनाना बाकी है रोतों को हँसाना बाकी है कुछ रिश्ते बनकर ,टूट गए कुछ जुड़ते -जुड़ते छूट गए उन टूटे -छूटे रिश्तों के जख्मों को मिटाना बाकी है कुछ हसरतें अभी अधूरी हैं कुछ काम भी और जरूरी हैं जीवन की उलझ पहेली को पूरा सुलझाना बाकी है जब साँसों को थम जाना है फिर क्या खोना ,क्या पाना है पर मन के जिद्दी बच्चे को यह बात बताना बाकी है आहिस्ता चल जिंदगी ,अभी कई कर्ज चुकाना बाकी है कुछ दर्द मिटाना बाकी है कुछ फर्ज निभाना बाकी है !