Posts

Showing posts from May, 2016

हुमनी साठी इलाज असाही

हुमनी साठी इलाज असाही♥प्रगतशील शेतकरी♥ ♥(१) वेखंड १ किलो ६ लिटर पाण्यात उकळून ३ लिटर करणे,+५०० ग्रम हिंग २०० लिटर पाण्यात टाकुन हे पाणी ओलावा असतांना ड्रिंचिंग करणे व झाडाच्या बुडाशी टाकणे  ♥(२) १ किलो रुईच्या ओल्या काड्या ६ लिटर पाण्यात उकळुन निम्मे होईस्तोवर आटवणे जमीनीवर व बुडाशी टाकणे ♥(३) तंबाखू पावडर जमिनीत पिकाच्याबुडावर ५० ग्रम देणे किंवा अर्क काढुन पाणी ओतणे ♥(४)  निवडुंग(साबरकांड) ठेचुन बुडावर टाकणे.       ♥(5)रुई/रुचकिण हिरव्या फांदया पानासह 6 किलो 10ते20लिटर पाण्यात निम्मे होईपर्यन्त  उकळावे  200 लिटर पाण्यात टाकुन ड्रिचिंग करा किंवा ठिबक मधुन द्यावे ♥(6 )पारंपरिक कृती मागील विज्ञान आपले वडील आजोबा पहिल्या कोळपणीला रुईची फांदी कोळप्यावर ठेवुन कोळपणी करायला लावत-👉कारण पहिला पाऊस पडला म्हणजे हुमनिचे पतंग निघत कडुनिंबाच्या झाडावर पाला खाउन मिलन होते झाडाखाली पाला पाचोळ्यात किंवा उकिरडया वर हे पतंग अंडी घालतात मग अळया जन्म घेतात आधी शेणखत पाला पाचोला खातात ते नाही मिळाले पिकांच्या मुळया खातात संकलीत!

बियाणे काळजी अशी घ्यावी

बियाणे काळजी अशी घ्यावी♥प्रगतशील शेतकरी♥ ♥बियाणे पेरताना काळजी घ्या.... १) पिशवीतील किंवा बॉक्समधील बियाणे पेरणीसाठी वापरताना विशेष काळजी घ्यावी लागते. २) बियाण्याची पिशवी ही नेहमी खालच्या बाजूने फोडावी. म्हणजेच ज्या बाजूला टॅग असेल ती बाजू तशीच व्यवस्थित राहू द्यावी. तसेच बॉक्स असेल तर त्यावरील माहिती सुरक्षित राहील याची काळजी घ्यावी. ३) बियाण्याचा थोडा नमुना पिशवीमध्ये किंवा बॉक्समध्ये राखून ठेवावा. म्हणजे बियाणे सदोष आढळल्यास तक्रार केल्यानंतर तपासणी अधिकाऱ्यांना सदर बियाण्याचा नमुना देता येईल. ♥सदोष बियाणे - १) ज्या वेळेस आपण प्रमाणित बियाणे खरेदी करतो, त्या बियाण्याच्या पिशवीवर किंवा टॅगवर प्रमाणित केलेल्या प्रमाणकापेक्षा किंवा दिलेल्या माहितीबरोबर जर बियाण्यांची गुणवत्ता नसेल, तर त्यास सदोष बियाणे म्हणतात. २) यामध्ये प्रामुख्याने त्याची उगवणक्षमता पोषक परिस्थितीत पेरल्यानंतर खूपच कमी असेल, तर बियाणे सदोष आहे असे समजावे. ३) त्याची भौतिक शुद्धता म्हणजेच त्यातील काडीकचरा, इतर पिकांचे बियाणे, तणांचे बी यांचे प्रमाण टॅगवरील माहितीपेक्षा जास्त असल्यास सदर बियाणे सदोष आहेत, असे

काहीतरी अर्थपूर्ण करण्याची स्वप्ने पहावीत...

श्री.संदीपकुमार साळुंखे IRS ,आयकर आयुक्त,नागपूर. 9 वी ते पदवीच्या शेवटच्या वर्षापर्यंतच्या सर्व मिञ मैञिणींनो..."सैराट" चिञपटाच्या निमित्ताने तुमच्याशी दोन शब्द बोलावेत म्हणून हा whatsapp मेसेज पाठवतो आहे. खरे तर वर्तमानपत्रात लेख लिहणार होतो पण विचार केला की तुम्ही वर्तमानपत्रापेक्षा Whatsapp वरचे मेसेजेस जास्त वाचतात म्हणून whatsapp message करायचे ठरवले. असो. फक्त एक चिञपट म्हणून सैराट उत्कृष्ट आहे, संगीत सुमधुर आहे, नागराज मंजुळे यांचे दिग्दर्शन छान आहे. सर्व कलाकारांचा अभिनयही लाजबाब आहे. पण चिञपटात कोवळ्या, न कळत्या, अडनिळ्या वयातल्या केवळ निसर्गसुलभ आकर्षणाचे केलेले उदात्तीकरण अन् त्या प्रेमीजनांचे निर्णय याने प्रभावित होऊन तुम्हीही आपल्या आयुष्याचे गणित सोडवण्याचा प्रयत्न करु नये असे मनापासून वाटते म्हणून हा लेखनप्रपंच. सांगताना अनेकजण सांगतात की चिञपट पाहून कुणी चांगला वा वाईट होत नाही किंवा आपल्या आयुष्याचे निर्णय घेत नाही वगैरे. पण हे प्रगल्भ व्यक्तींबाबत खरे असते. कोवळ्या वयातल्या मुलामुलींवर चिञपटांचा नक्कीच परिणाम होतो. त्यांना चिञपटाचे नायक नायिका आपले आदर्श व

आरोग्य कडे पहीले पाउल Step towards health

आरोग्य कडे पहीले पाउल *शरीराला आवश्यक खनिजं * Minerals we need... 🔺कॅल्शिअम कशात असतं? शेंगदाणे, तीळ, दूध, खोबरं, मुळा, कोबी. ज्वारी, राजगिरा, खरबूज, खजूर कमतरतेमुळे काय होतं? हृदयरोग, ऑस्टियोपोरोसिस, दंतरोग, केस गळणे कार्य काय असतं? शरीरातील सर्वात मुख्य खनिजं असून ते हाडांची मजबुती आणि शरीराच्या निर्मितीसाठी आवश्यक असतं. 🔺लोह कशात असतं? खजूर, अंजीर, मनुका, सफरचंद, डाळिंब, पालक, सीताफळ, उस, बोर, मध, पपई आणि मेथी कमतरतेमुळे काय होतं? शरीरात रक्ताची कमतरता भासते. अशक्तपणा, कावीळ किंवा पोटात मुरडा येतो. कार्य काय असतं? शरीराच्या वाढीसाठी अतिशय आवश्यक असतं. 🔺सोडिअम कशात असतं? मीठ, पाणी, बटाटा, आलं, लसूण, कांदा, मिरची, पालक, सफरचंद, कारलं कमतरतेमुळे काय होतं? रक्तदाबाशी निगडित समस्या, निद्रानाश, अंगदुखी, अपचन, मूळव्याधीसारखे आजार, मोतीबिंदू, बहिरेपणा, हात अणि पाय कडक होणे. कार्य काय असतं? शरीराला आवश्यक असणारी पाचक रसायनाची निर्मिती करतात, त्याचप्रमाणे शरीरात होणारा गॅस नष्ट होतो. 🔺आयोडिन कशात असतं? शिंघाडा, काकडी, कोबी, राजगिरा, शतावरी, मीठ आणि लसूण. कमतरतेम