Posts

Showing posts from April, 2020

सोंग

#सोंग_ *तो* घरातला कर्ता पुरुष शांत विचारात मग्न  बसलेला . मुळ म्हणजे मध्यम वर्गीय घरातला  बायको : अहो... घरातलं तेल संपलय जरा घेऊन या! तो : हो आणतो. (कस सांगू हिला मोजकच कर ,😕  घरात खाणारी तोंड , वाढत्या वयात आलेली पोरं  त्यांना खाऊ नका म्हणून सांगू तरी कस? वय झालेले आई वडील त्यांना ही लागताच की निदान औषध घेण्यापूर्वी तरी.. धंदा बंद पडलाय. हवं तेवढं सगळ्या  रोजच्या कमाई चा साठा संपलाय , खिशातले शेवटचे ५०० रुपये.. उद्या पर्यंत संपणार.. मग? घेऊ का सोंग पैश्याचं? की भिकेचं?) नको ! नगर शेवकाच्या कार्यकर्त्यांनी पाहिलं तर शिवभोजनाची थाळ घेतांना तर उगाच चर्चेचा विषय ... लोक : अरे काय कमी आहे त्याला, एेवढ मोठं घरदार , तरी हा ईकडे येऊन गरिबांची थाळी खातो  तो: कस सांगू यांना पोट भरायला  घरादाराची वीट नाही, तर अन्न लागतं म्हणून . पण पैशाचा आव तरी कसा आणू ..?  हो घरात मात्र पोरांचा वेळ जावा म्हणून सारिपाटाचा डाव मांडतो डाव जिंकला की पुन्हा घरात येऊन थांबतो . मग मुलगा म्हणतो  मुलगा : बाबा अहो तुमच्या सगळ्याच सोंगट्या घरात गेल्या , तुम्ही जिंकलात . आता तुम्ही घर बांधणार. माझ्या मात्र तोंडावर स्मि

नैसर्गिक पणे राहा...माणूसकीने वागा...

आता खरच निसर्गालाच माणूस नकोसा झाला अस वाटतय. कारण,आपल्याला घरात बसवून निसर्ग स्वतःला दुरूस्त करून घेत आहे. सगळीकडे नद्या स्वच्छ होत आहेत. हवा शुद्ध वहात आहे. पक्षांचा कलकलकलाट,गाई वासरांचे हंबरणे ऐकु येत आहे. कुठे मंदिरातील घंटा आता वाजत नाही. मस्जीद मधील अजाण नाही. चर्च मधिल सामुहिक प्रार्थना नाही. कुठलेही धार्मिक कार्यक्रम नाही. कुणाला आता मंगळ  नाही. कुणाला आता शनिचीसाडेसाती नाही. स्मशानात कुठलेही विधी नाही. पिंडदान नाही. कावळ्याला आपल्या त्या पिंडाची अपेक्षा नाही. आता कालसर्पाची पुजा बंद आहे. नवग्रहाची शांती बंद आहे.. आता कोणी शुभ मुहूर्त पहात नाही.. तरी सगळ कस शांततेत सुरू आहे. पृथ्वी आनऺदात आहे ,निसर्ग बहरतो आहे ,म्हणुन तर.... निसर्ग हसतो आहे आता आपल्यावर व आपल्या भोंदूगिरीवर... कारण त्याला तुमच्या वरील कोणत्याही गोष्टीची अजिबात आवश्यकता नाही,कारण वरील कोणतीही गोष्ट त्याने बनवली नाही... तो आता एकच म्हणतो...मला जवळ करा.... नैसर्गिक पणे राहा... माणूसकीने वागा... बघा जमतय का...

जानो #अपने #धर्म और #संस्कृति के #बारे #मे

#जानो #अपने #धर्म और #संस्कृति के #बारे #मे *पाण्डव पाँच भाई थे जिनके नाम हैं -* *1. युधिष्ठिर    2. भीम    3. अर्जुन* *4. नकुल।      5. सहदेव* *( इन पांचों के अलावा , महाबली कर्ण भी कुंती के ही पुत्र थे , परन्तु उनकी गिनती पांडवों में नहीं की जाती है )* *यहाँ ध्यान रखें कि… पाण्डु के उपरोक्त पाँचों पुत्रों में से युधिष्ठिर, भीम और अर्जुन* *की माता कुन्ती थीं ……तथा , नकुल और सहदेव की माता माद्री थी ।* *वहीँ …. धृतराष्ट्र और गांधारी के सौ पुत्र…..* *कौरव कहलाए जिनके नाम हैं -* *1. दुर्योधन      2. दुःशासन   3. दुःसह* *4. दुःशल        5. जलसंघ    6. सम* *7. सह            8. विंद         9. अनुविंद* *10. दुर्धर्ष       11. सुबाहु।   12. दुषप्रधर्षण* *13. दुर्मर्षण।   14. दुर्मुख     15. दुष्कर्ण* *16. विकर्ण     17. शल       18. सत्वान* *19. सुलोचन   20. चित्र       21. उपचित्र* *22. चित्राक्ष     23. चारुचित्र 24. शरासन* *25. दुर्मद।       26. दुर्विगाह  27. विवित्सु* *28. विकटानन्द 29. ऊर्णनाभ 30. सुनाभ* *31. नन्द।        32. उपनन्द   33. चित्रबाण* *34. चित्रवर्मा    35. सुवर्मा    36.

गेले ते दिवस ,राहील्या त्या आठवणी....

*गेले ते दिवस ,राहील्या त्या आठवणी..........* *बंबात* तापलेल्या पाण्याची *अंघोळ न्हाणीतली* असायची. *लाईफबाॅयशिवाय* दुसरी कंपनी माहीती नसायची. *ok,501* साबणाची वडी कपड्यावर घासायची... *Moti* साबणाचं कौतुक फक्त *दिवाळीला* असायचं. *शाम्पू* कुठला लावताय राव, *निरम्यानचं* डोकं धुवायचं... *दिवाळीच्या* एका ड्रेसवर *वर्षभर* मिरवायचं... *थोरल्याचं* कापडं धाकट्यानं *झिजेपर्यंत* वापरायचं... *चहा चपातीची* न्याहरी, *उप्पीट,पोहे* कौतुकाने असायचे, *पार्ले* बिस्किटाशिवाय चहाला दुसरे जोडीदार  नसायचे... *गोल* पंक्तीत बसून सगळ्यांनी मिळून जेवायचं... *खर्डा ,भाकरी,झुणका* पंचपक्वानासारखं लागायचं. *गोट्या,विटीदांडू,लपाछपी........* कधी कधी *पत्त्यांचाही* खेळ रंगायचा... *काचाकवड्या,जिबली* नाहीतर..... *भातुकलीचा* डाव मांडायचा... अधून मधून *चिंचा,पेरू,आंब्याची* झाड शोधायचं... नाहीतर *जिभेला* रंग चढवत *गारेगार* चोखायचं... *गणगाटाची* बैलगाडी,त्याला त्याचाच *बैल* जुंपायचा... *शेंगा* चेचून केलेला चिक्की बाॅल दणकट असायचा... पानं चेचून केलेली *मेंहदी* हातावर खुलायची... *बाभळीच्या* शेंगाची जोडवी बोटात खुळखुळायची... *म

आपण पाहुणे आहात मालक नव्हे

आपण पाहुणे आहात मालक नव्हे आपण आपल्याच विश्वात गाढ झोपलो होतो आणि आता आपल्याला जाग आलीये तेव्हा एका वेगळ्याच विश्वात आहोत.   अकस्मात डिस्नेची सगळी जादू ओसरलीय. पॅरिसचा सगळा शृंगार विस्कटलाय. न्यूयॉर्कचा दिमाख उतरलाय. चीनची अभेद्य भिंत पूर्ववत नाही राहिली. जल, थल आणि नरसंहाराने भरलेला मानवाचा इतिहास स्तब्ध झालाय. चुंबने, आलिंगने जणू संहारक शस्त्रे बनली आहेत आणि आईवडिलांना, मित्रांना, प्रेयसीला, प्रियकराला अगदी कोणालाही न भेटणे हीच प्रेमाची परीक्षा होऊन बसली आहे.      अचानक आपल्याला कळून चुकलंय की सत्ता, संपत्ती, सौंदर्य आणि उपभोग या गोष्टी  कुचकामी आहेत. जगण्यासाठी ओंजळीत मावेल एवढंच अन्न, तेवढंच पाणी आणि प्राणवायू पुरेसे आहेत. त्याचवेळी माणूस वगळता उर्वरीत विश्वाचा गाडा मात्र पूर्ववत सुरळीत चालू आहे. त्याचे सौंदर्य अबाधित आहे.  त्याने बंदिस्त केलंय ते फक्त माणसांना. मला वाटतं निसर्गाने  यातून आपल्याला एक संदेश दिलाय -      " ही पृथ्वी, जल, वायू आणि  आकाश तुम्ही नसला तरी सुखात असतात. तुमच्यावाचून काही अडत नाही त्यांचं . आता परताल ना तेव्हा एक गोष्ट ध्यानात ठेवा.  *तुम्हीआपण आपल्याच