Posts

Showing posts from January, 2016

चांगल्या क्षणांचा आनंद मनापासून घ्या

💐💐💐💐💐💐💐 "कितीवेळा मागितलं तरी सुख उसनं मिळत नाही" "एखद्या जागी बसून कधीच ध्येयाचं शिखर गाठता येत नाही" "आपल्या देवावर नेहमी निसंकोच विश्वास ठेवा" "योग्य वेळी तो इतकं देतो की मागयला काहीच उरत नाही". कडू औषध आपण लगेच गिळून टाकतो पण गोड चॉकलेट चघळून चघळून खातो असंच आयुष्यातले वाईट क्षण लगेच विसरा आणि चांगल्या क्षणांचा आनंद मनापासून घ्या... 🍃🍂🍃 शुभ सकाळ🍃🍂🍃🍂

प्रत्येक संकटात यशाचे बीज दडलेले असते

🎋🙏 ॥ सुप्रभात ॥ 🙏🎋 "समोर येणा-या  संधीला जो सन्मानपूर्वक सामोरा जातो, त्या व्यक्तिला त्याचे प्रयत्न नेहमीच साथ देत असतात. काहीजण मात्र मिळालेल्या संधीतही समस्या शोधत बसतात आणि संधी गमावतात... संकट छोटे असो वा मोठे , कुणालाच नको असते. मात्र अशा संकटामधूनही जे काही धडे घेतात, तेच ख-या अर्थाने आयुष्यात यशस्वी होतात. कारण प्रत्येक संकटात यशाचे बीज दडलेले  असते...!!!          🌴🍒 शुभ सकाळ 🍒🌴        🍮आनंदी दिवसाच्या शुभेच्छा🍮         •█▬█αややγ ℳ๑яทïทg

भविष्य तर त्यांचही असतं, ज्यांचे हातच नसतात

🌞 ••○○सुप्रभात○○•• 🌞 नशीबाच्या खेळामुळे नाराज होऊ नका. जीवनात कधी उदास होऊ नका. नका ठेवू विश्वास हातावरच्या रेषांवर. कारण भविष्य तर त्यांचही असतं, ज्यांचे हातच नसतात. 🍁सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🍁

सुखासाठी झिजणं केव्हाही उत्तमच

जे "कठीण" आहे,ते "सोपे" करावे,जे "सोपे" आहे,ते "सहज" करावे,जे "सहज" आहे,ते "सुंदर" करावे,आणि......जे "सुंदर" आहे त्यावर मनापासून "प्रेम" करावे. एखादी वस्तू वापरली नाही की ती गंजते, आणि जास्त वापरली तर झिजते... काहीही झालं तरी शेवट तर ठरलेलाच आहे.. मग कोणाच्याही उपयोगात न येता गंजण्यापेक्षा, इतरांच्या सुखासाठी झिजणं केव्हाही उत्तमच......!!! 💐💐💐💐💐💐 शुभ प्रभात 🌸🍀🌺🍃🍂🍁🌾 तुमचा दिवस आनंदात जावो..... 🌿🌾🍁🍃🌷🌷🌸💐🌺

कर्तव्य हे केलेच पाहिजे.

"प्रयत्न यशस्वी होवोत           अथवा अयशस्वी होवोत, कार्याची प्रशंसा होवो अथवा न होवो,       कर्तव्य हे केलेच पाहिजे.     जेव्हा मनुष्याची योग्यता व हेतुचा प्रामाणिकपणा सिध्द होतो       तेव्हा त्याचे शत्रू देखील   त्याचा सन्मान करू लागतात...$.      ...💕✨✨🌟💕   🙏🙏शुभ सकाळ 🙏🏻🙏

दुसरयाचे मन जिंकता येणारे "मन"

💫सुंदर विचार💫 मोत्यांच्या हारापेक्षा घामाच्या धारांनी मनुष्य अधिक शोभून दिसतो. कारण मोत्यांच्या हारांनी फक्त त्याचं सौंदर्य दिसतं, आणि घामाच्या धारांनी त्याचं कर्तुत्व सिद्ध होत....!!! मन तर देवाने प्रत्येकाला दिले आहे पण दुसरयाचे मन जिंकता येणारे "मन" काही ठराविक लोकानांच दिले आहे !!                      💐💐 शुभ सकाळ💐💐  📍₲๑๑δ💞ℳ๑яทïทg📍   💐💐💐 💐💐💐

त्या परमेश्वराला का विसरता ?

🔸जो अन्न देतो उदरासी l शरीर विकावे लागे त्यासी ll मग जेणे घातले जन्मासी l त्यासी कैसे विसरावे ll🔸 समर्थ रामदास स्वामी म्हणतात  - 🌺पोटासाठी  तुम्ही  नोकरी करता , म्हणजे दररोज ८ ते १० तास  तुम्ही तुमचे शरीर , मन व बुद्धी तुमच्या मालकाला विकलेली असते, मग ज्या परमेश्वराने तुम्हाला शरीर  दिले, मन, बुद्धी  दिली,उदरनिर्वाहाचे साधन, मानवजन्म दिला  त्या  परमेश्वराला का विसरता ?🙏🏻🌺 शुभ सकाळ.

भगवंत व संत यांना आकर्षित करणारी आवडणारी संपत्ती

दासतरंग - ३२ 卐 लग्नाची मुलगी घरात आहे. 卐 तीला पहायला येण्याचा प्रसंग बरेच वेळा येतो. 卐 होकार एकाच ठिकाणाहुन येणार असला तरी आपण ज्या ज्या वेळी मुलीला मंडळी पहायला येतात त्या त्या वेळी आपण आपल्या घरातील पसारा आवरुन ठेवतो. दार, खिडक्याना नविन पडदे वगैरे लावतो. याचा उद्देश येणा-या मंडळीना घर चागले वाटावे. त्यांना आनंद वाटावा. 卐 त्याच प्रमाणे भगवंत व संत यांना आपले घर आवडाले पाहिजे याचा विचार करावा. संतांना किंवा भगवंतला तुमच्या घरातील वैभव, फर्निचर त्याची निटनेटकी मांडणी आकर्षित करे शकणार नाही. आवडणार नाही. नामस्मरण, प्रासादीक ग्रंथांचे पारायण, शास्त्रविहीत आचरण हिच भगवंत व संत यांना आकर्षित करणारी आवडणारी संपत्ती आहे. निटनेटकी मांडणी आहे. प. पु. श्री आगाशे काका

1 फेब्रुवारी - देहबुद्धीच्या विस्मरणाकरिता नाम

१ फेब्रुवारी - देहबुद्धीच्या विस्मरणाकरिता नाम. 🍁आपली आपल्याला ओळख करून घ्यायला नामस्मरण हाच उपाय आहे. 🍁परमेश्वराचा अंश प्राणिमात्राच्या ठिकाणी आहे खरा, पण हे जाणण्याची बुद्धी मात्र मनुष्यप्राण्याच्याच ठिकाणी आहे. 🍁पण त्याची अधोगती कशी होत जाते पहा : जीव मुळात परमेश्वरस्वरूपच असल्यामुळे प्रथम तो म्हणतो,✨ 'मी तो, म्हणजे परमेश्वरच आहे.' इथपासून घसरत तो म्हणतो, ✨'मी त्याचा आहे'; आणि अखेर✨ 'त्याचा माझा काही संबंध नाही' इथपर्यंत तो खाली येतो. याला कारण, देहबुद्धीचा पगडा वाढतवाढत ✨शेवटी देह म्हणजेच मी, अशी आपली पक्की भावना होते. 🍁पण असे असले तरी मनुष्य अजाणता का होईना, पण खरे आहे ते ओळखल्यासारखेच बोलतो. जसे, एखाद्या इसमाचा स्नेही वारला तर लगेच तो इसम काय म्हणतो, 🌟'आमचे स्नेही गेले!' याचाच अर्थ, समोर असलेल्या देहाला तो स्नेही समजत नसून त्यात असणार्या चैतन्याला, ईश्वरी अंशाला, तो खर्या अर्थाने आपला मित्र समजतो. म्हणजे अजाणता का होईना, पण खरे तेच त्याच्या तोंडून बाहेर पडते. 🍁असे असले तरी स्वतःच्या बाबतीत मात्र तो ही जाणीव कायम राखीत नाही, आणि आपण म्ह

आतातरी उठा आणि धरा माणूसकीचा हात ... live in harmony

भारतात इंग्रज आले , फक्त १७९ नंतर १००० झाले , नंतर १०,००० आणि नंतर १,००,००० झाले आणि या एक लाख इंग्रजांनी आपल्या ३० करोड जनतेवर राज्य केले. कसे बर शक्य झाले ??? कारण जे १७९ पहिल्यांदा आले होते त्यांनी आपला लोकांचा चांगला आभ्यास केला होता आणि त्यांनी एक निष्कर्ष काढला जो आजही 2016 सालीही लागू होतो , तो म्हणजे भारतीय लोकांना जाती-भेद, धर्मभेद, गरीब-श्रीमंत, प्रांत भेद या गोष्टीनमध्ये पेटवायचे मग हे ३० काय ३०० करोड जरी झाले तर कधीही आपल्याबरोबर लढणार नाहीत ... कारण.... ते एकमेकांनाच कापत बसतील पण कधीही एक होऊ शकणार नाहीत . एवढा द्वेष मनामध्ये भरेल. मी मराठा मी धनगर मी चांभार मी कुंभार मी मांग मी महार मी ब्राम्हण मी माळी मी आमुक आणि मी तमुक ..... .... झालं यातच आम्ही आमचे श्रेष्ठत्व मानतो. ( मीञांनो ६७४२ जाती आहेत) आज आम्ही एवढे मोठे झालो आहे की.... ..... थोर युग पुरुषांच्याही वाटण्या केल्या आम्ही.. सावरकर ब्राह्मणांचे झाले, बाबासाहेब आंबेडकर दलितांचे , छत्रपती शिवाजी महाराज मराठ्यांचे, मल्हारराव होळकर धनगारांचे. महात्मा ज्योतीराव

‪‎Plz Respect women

‪‎Plz Respect women नक्की वाचा फक्त १ मिनिट लागेल . बाजारातुन परत घरी येताना काही खाण्याच मन झाल.. म्हणुन ती मुलगी पाणीपुरीच्या ठेल्यावर थांबली.. एकटी मुलगी पाहुन शेजारीच असलेल्या पान टपरीवरची काही मुले ही त्या ठेल्यापाशी आली.. . त्यांनी त्या मुलीला छेडायला चालु केल.. अश्लिल गाणी आणी संवाद चालु केला.. घाणेरडी नजर त्या मुलीच्या देहावरुन फिरत होती.. बिचारी आगोदर पैसे दिल्याने तिला तेथुन जाता ही येत नव्हते.. आपली ओढणी संभाळत.. "भैया जल्दी दो".. या पलिकडे ती काहीच बोलत नव्हती.. घाबरलेली तिची नजर फक्त खाली पाहत होती.. . तेवढ्यात तिथे एक तरुण युवक आपल्या बाईक वरुन येऊन तेथे थांबला.. . आधिच मनात कल्लोळ चालु असताना त्यात आजुन एक ती पुर्ण भेदरुन गेली.. . तेवढ्यात तो युवक बोलला.. " आरे अंजली तु इथे कुठे" भावाला एकट्याला सोडुन पाणी पुरी खातीयेस काय?" . संकटाची संभावणा पाहुन तिथली बाकीचे मुले चालते झाले.. आपल्यावरच संकट टळलेल पाहुन मुलीन मोकळा श्वास घेतला.. . न राहुन तिने त्या युवकाला विचारल.. "माफ करा माझ नाव अंजली नाही पुर्वा आहे" .

वाल्याचे झाले वाल्मीकी

||श्री स्वामी समर्थ|| ||ब्रम्हांडनायकाच्या अद्भुत लीला||    || वाल्याचे झाले वाल्मीकी|| "अक्कलकोटच्या जवळच्या गावी दोन भील्लांनी धुमाकुळ घातला होता. ते वनात टपुन बसायचे आणी येणाऱ्या-जाणाऱ्यांना लुटायचे. भल्या बोलांनी कोणी आपलं धन दिल तर ठीक नाहीतर त्यांना ठार मारण्या पर्यंत त्यांची मजल गेली होती. त्या मुळे लोकांनी त्या वाटे वरून जायचंच बंद केलं होतं. 'श्रीमंत असेल तर स्वामी साठी धन नेणार आणी गरीब स्वामी कडून धन घेऊन जाणार',असं गृहीत धरुन त्यांनी अक्कलकोटलाच्या रस्तावर स्वामी भक्तांना लुटायचं ठरवलं. त्यांच्यावर नजर ठेवायला एक भील्ल वेश पालटून स्वामी कडे जातो. तिथे एक श्रीमंत व्यक्ती स्वामींना धनाची पिशवी देतो. स्वामी त्या पिशवीला एका गरीबीनी गांजलेल्या व्यक्तीला देतात. तो वृद्ध व्यक्ती भील्लांच्या भितीनी स्वामींना रात्रभर मुक्काम करण्याची परवानगी मागतो. स्वामी स्पष्टपणे नकार देतात. मग त्याला आपल्या हातातली अंगठी देतात आणी म्हणतात- "काहीही झालं तरी अंगठी बोटातून काढायची नाही!" "आम्ही तुझ्या पाठीशी आहो!" रस्त्यात भील्ल वृद्ध व्यक्तीला रस

LIC Endowment Plus .. एलआईसी कि एण्डाॅवमेंट प्लस

Image
LIC Endowment Plus 👉Ulip plans are investment plans for those who realise the worth of hard-earned money. These plans help you see your savings yield rich benefits and help you save tax even if you don't have consistent income. 👉A unit linked assurance plan, offering investment-cum-insurance during the term of the policy.. 👉This Plan allows policyholder to decide the amount of premium he/she can pay. There is a option to choose from 4 funds for investment. Bond Fund Secured Fund Balanced Fund Growth Fund A pre-specified percentage shall be deducted upfront from the premium as Premium Allocation Charges. This charge is levied to meet the cost of issuing policy such as distributor fee and cost of underwriting. 👉Premium Allocation Charge 1st Year 7.50% 2nd to 5th Year 5.00% thereafter 3.00% 👉Death Benefits : In the event of death of life assured before the date of maturity, the sum payable would be: Upto age 8 years of the Life Assured OR before completion of 2 poli

मरतुकडी गाय

मरतुकडी गाय चिनमधले एक विद्वान गुरू आपल्या काही शिष्यांसकट प्रवासाला निघाले. त्यांना एक ओसाड प्रदेश लागला. त्या प्रदेशात पाण्याचे दुर्भीक्ष होते तर गवताचे एक पान पण दिसत नव्हते. त्या प्रदेशातील एका टेकडीवर त्यांना एक जिर्ण झालेली, मोडकळीला आलेली झोपडी दिसली. या अशा ओसाड प्रदेशात कोण रहात असावे या कुतुहलाने ते त्या झोपडीजवळ गेले. तेथे त्यांना एक मध्यमवयीन चिनी जोडपे, त्यांची तीन लहान मुले व एक मरतुकडी गाय दिसली. ‘तुमचे कसे भागते?’ गुरुंनी त्या चिनी माणसाला विचारले. त्याने त्या मरतुकड्या गाईकडे बोट दाखवले व म्हणाला, ‘ही गाय रोज आम्हाला थोडे थोडे दूध देते. यातील काही दूध आम्ही वापरतो. उरलेल्या दूधाचे दही करून त्याचे लोणी तयार करून जवळच्या गावात जाऊन विकतो. त्याचे जे काही थोडेफार पैसे मिळतात त्यातुन इतर गरजेच्या वस्तु आणतो. आमचे कसेतरी भागते.’ गुरु टेकडी उतरून खाली आले व आपल्या शिष्यांना म्हणाले, ‘ताबडतोब ती मरतुकडी गाय मारून टाका!’ गुरुंची ही आज्ञा ऐकून शिष्य चांगलेच गोंधळले. ज्या गाईवर त्या माणसाचे जिवन चालू आहे, त्या कुटुंबाला रोजी रोटी मिळते आहे ती गाय मारून टाकायची? शिष्यांना वाटले

29 जानेवारी - नामात दृढभाव कसा येईल? How keep faith in GOD's name?

29 जानेवारी - नामात दृढभाव कसा येईल? 👉नामात प्रेम नामानेच येणार. हे प्रेम यायला विषयावरचेप्रेम कमी करायला पाहिजे. 👉दृढनिष्ठा पाहिजे. नामच तारील, नामच सर्व काही करील, असा दृढभाव पाहिजे. तो ठेवून व्यवहारातले प्रयत्न चालू ठेवावेत, पण यश देणारा परमात्मा असा भाव पाहिजे. 👉वैद्याकडचे औषध आपण गड्याकडून आणवतो, पण गुण गड्याने दिला असे नाही म्हणत. याच्याही पुढे जाऊन, वैद्याच्या औषधाने आलेला गुण परमात्म्यानेच दिला, असे का मानत नाही ? 👉परमात्म्याला शरण जाणेम्हणजे परमात्मा आपला आहे, त्याच्यावाचून आपल्याला दुसरे कुणी नाही, आपण काही करीत नसून सर्व तोच आपल्या हिताकरिता करतो आहे, असा दृढ विश्वास ठेवणे. 👉आपण आपल्या बायकोमुलांवर प्रेम करतो, कारण त्यांना 'आपले' म्हटले म्हणून. म्हणजे प्रेम हे आपलेपणात आहे, मग परमात्म्याला आपले म्हटले म्हणजे सहजच त्याच्यावर प्रेम बसणार नाही का ? 👉दुसरे असे की, भगवंत हा आपला जिवलग सखा आहे, तो सर्व काही आपल्या हिताकरिताच करतो आहे, असा विश्वास धरल्यावर काळजीला तरी जागा कुठे उरली ? 👉आपली देहबुद्धी नाहीशी होण्यातच आपले हित आहे. परमात्म्याच्या ठिकाणी आपलेपणा