आद्रक (आले) ची शेंडे पिवळी पडण्यास कारणे व उपाय असा कराल

आद्रक (आले) ची शेंडे
पिवळी पडण्यास कारणे व उपाय असा कराल♥प्रगतशील शेतकरी♥
  
♥आद्रक (आले) ची शेंडे पिवळी पडण्यास कारणे

1) वनस्पतीमध्ये पेशीच्या वाढीसाठी आणि पेशी विभाजनासाठी बोरॉन या अन्नद्रव्यांचा महत्त्वाचा सहभाग असतो. आवश्‍यकतेनुसार साखरेच्या अंतर्गत प्रसारणास व हालचालीस महत्त्वाची मदत करतो. बोरॉन हा कॅल्शिअम विद्राव्य स्थितीत राहण्यास आणि स्थलांतर होण्यास मदत करतो. या अन्नद्रव्यामुळे वनस्पतीमध्ये पाण्याचे नियंत्रण होते. संप्रेरक म्हणून रासायनिक प्रक्रियेत सहभाग असतो. आद्रक पिकाला बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता भासल्यास आद्रकाचे जास्त नुकसान होते. आद्रकाची वाढ खुंटते आणि आद्रक उत्पादन कमी मिळते. बोरॉनची कमतरता भासल्यास आद्रकाचा शेंडा पिवळा पडतो, कोवळी मुळे व शेंडे सडतात., नवीन पालवी वाळून मुख्य शेंडा मरतो . नंतर तो तांबूस काळा पडून वाळून जातो. पानांपासून तुटल्यासारखे वाटतात. आद्रकाची कोवळी पाने छोटी, अरुंद व पिवळी दिसतात, खराब होतात.

2) पाण्याचे नियोजन नसेल व जमिनीतील निचरा होत नसेल, खोडा लगत पाणी जास्त काळ साचले असेल तेव्हा पिकाच्या वाढीवर परिणाम होतो  .

3) पाने खानारी आळी, रस शोषणा-या किडी, पाने गुंडाळणा-या अळया पिकामधील अन्नद्रव्याचा प्रवाह खंडित करतात, परिणाम पाने पिवळी पडणे, वाढ खुंटणे, शेंडा पिवळा पडणे इ.

4) वातावरणच्या बदलामुळे विवीध रोगाचा प्रादुर्भाव होतो, प्रतीबंधक वा निवारात्मक उपायांनी नियंत्रण शक्य आहे.

♥आद्रक (आले) ची शेंडे पिवळी पडण्यास उपाय

1) माती परीक्षण करून घेणे व त्यानुसार खतमात्रा द्याव्यात.

2) पाण्याचे नियोजन करावे व जमिनीतील निचरा सुधारावा, खोडा लगत पाणी जास्त काळ साचू देवु नये.

3) पाने खानारी आळी, रस शोषणा-या किडी, पाने गुंडाळणा-या अळया यांच्या नियंत्रणासाठी

डायमेथोएट 30 ई.सी.या किटकनाशकाची 10 लिटर पाण्यामध्ये 15 मिली या प्रमाणे 2 ते 3 फवारण्या 15 दिवसाच्या अंतराने कराव्यात.

कंदमाशीच्या नियंत्रणासाठी जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, महिन्यात 3 वेळा हेक्टरी 20 किलो फोरेट 10 टक्के दाणेदार मातीत मिसळून दयावे.

4) करपा- या रोगाचे नियंत्रणासाठी
मॅन्कोझेब, 10 लि. पाण्यामध्ये 25 ग्रॅम या प्रमाणात घेवून सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीमध्ये 3 ते 5 फवारण्या 15 ते 20 दिवसाच्या अंतराने कराव्यात.

कंदकुज, सूत्रकृमी , मररोग इत्यादींच्या नियंत्रणासाठी
ट्रायकोडर्मा हेक्टरी 5 किलो शेणखतात मिसळून दयावे
किंवा
5 ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून द्रावण रोपांचे मुळाशी ओतावे.

4) जमिनीत कुजलेले शेणखत व त्यात लिंडेन पावडर मिसळून नियमीत वापरावे
.
5) चारी खोदुन जास्त पाणी बाहेर काढावे.

6) बोरान ची कमतरतेमुळे शेंडे पिवळी पडतात तरी बोरानची कमतरता भरुन काढावी.
जमिनीत या अन्नद्रव्याची कमतरता असेल तरच एकरी पाच किलो या प्रमाणात एक वर्षाआड बोरीक ऍसिड किंवा बोरॅक्‍स जमिनीतून वापरावे, गरज नसताना सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर केल्यास फायदा न होता तोटाच होतो.

(जरी वरिल माहिती उपयोगी आहे तरी माहितीचा उपयोग वापरकर्त्याने स्व-जबाबदारिवर करावा!)

संकलित!

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

प्रकल्प म्हणजे काय ? What is Project?