तुम्ही माणुस आहात का?

तुम्ही माणुस आहात का?

एक विचार  करण्यासारखी कविता ...
मी "बाबासाहेबांवर" कविता लिहिली
लाेकांनी मला फोन करून विचारले
"तुम्ही बौध्द आहे का?"

मी  "छत्रपतींवर" कविता लिहिली
लाेकांनी मला फोन करून विचारले
"तुम्ही मराठा आहे का?"

मी "फुल्यांवर" कविता लिहिली
लाेकांनी मला फोन करून विचारले
"तुम्ही माळी आहे का?"

मीअहिल्या देवींवर कविता लिहीली
लाेकांचा मला फोन आला
अन विचारले
"तुम्ही धनगर अहात का"

मी "माणसावर" कविता लिहिली
मला फोनच आला नाही............

वाट पाहतोय.......
“ती"माणसे  गेली कुठे

माणसाने माणुस मारून
फ़क्त आणि फ़क्त
जात जिवंत ठेवली आहे...🙏🙏🙏                   

संकलित!

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

वांगी किड व रोग नियंत्रण Brinjal pest & disease control