Thomas Edision
*थॉमस अल्वा एडीसन*
एके दिवशी लहानगा थॉमस शाळेतून येताना सोबत एक कागद घेऊन
आला. तो कागद आईला देऊन म्हणाला, "आई हे माझ्या
वर्गशिक्षकांनी तुला द्यायला सांगितलय." आईने तो कागद वाचला
आणि चटकन तिच्या डोळ्यात पाणि भरले. आईला रडताना पाहून
छोट्या थॉमसने आईला का रडतेयस म्हणून विचारले. आई त्याला
जवळ घेत म्हणाली , "काही नाही रे माझ्या बाळा, शाळेचं असं
म्हणणं आहे की, तुमचा थॉमस खूप खूप हुशार आहे. पण त्याला
शिकवण्यासाठी त्याला योग्य अशा गुणवत्तेचा शिक्षकवर्ग
आमच्याकडे नाही. म्हणून तुम्ही त्याला घरीच शिकवा.
त्या गोष्टीला बराच काळ लोटला. थॉमसची प्रेमळ आई त्याला
अतिशय प्रेम व संस्कार देऊन काळाच्या पडद्याआड गेली. आता
थॉमस मोठा शास्त्रज्ञ झाला होता. मानवाला ऊपयोगी पडतील
अशा अनेक शोधांचा तो ऊद्गाता झाला होता. शतकातील सर्वोत्तम
शास्त्रज्ञ म्हणून नावारूपाला आला होता.
एका निवांत दिवशी तो आपल्या घरी कुटुंबातील जुन्यापुराण्या गोष्टी
काढून जुन्या आठवणीत रममाण झाला होता. अचानक कपाटातील
ड्रॉवरच्या एका कोप-यात त्याला एक घडी घातलेला कागद दिसला.
त्याने तो ऊघडला. त्यात लिहीले होते:- तुमचा मुलगा
मानसिकदृष्टया आजारी आहे. ईथुन पुढे तुम्ही त्याला आमच्या
शाळेत पाठवू नका. आम्ही त्याला शाळेत घेणार नाही.
ते पत्र वाचल्यावर थॉमस सुन्न झाला. कित्येक तास रडला. मन
मोकळे झाल्यावर त्याने आपली रोजनिशी( Diary) काढली. आणि
लिहीले.
"थॉमस अल्वा एडिसन हा लहान पणापासून मानसिकदृष्ट्या अपंग
होता. पण त्याच्या जन्मदात्री आईने त्याच्यावर विश्वास दाखवुन
त्याला शतकातील सर्वोत्तम शास्त्रज्ञ करुन दाखवले."
परीपुर्ण कुणीच नसतो. पालकांनी आपल्या मुलांच्यात ऊणिवा न
शोधता त्याना सतत प्रोत्साहन देऊन त्यांना त्यांच्या आयुष्यात
यश संपादित करण्यास सहाय्यक होणे आवश्यक आहे..
Comments
Post a Comment