Distribute Love♡♡♡♡♡

Distribute Love...

एक अनोखी गोष्ट..
एका शहरात एक आजी संत्री विकायला बसायची.एक दिवस तिच्या जवळ एक तरून आला साधारण ३० वयाचा असावा..त्याने आजीला विचारले आजी संत्री कसे दिले.आजीने भाव सांगितला.. व त्याने २ कीलो संत्री विकत घेतले..व त्यातली एक संत्री सोलुन एक फोड खाऊन म्हणाला आजी ही संत्री गोड आहे का ? आजीने हात पुढे करत संत्री हातात घेऊन एक फोड खाल्ली.आणी म्हणाली लेकरा गोडच हाय की.. तो हसत हसत आजीच्या हातातील संत्री न घेताच निघून गेला.असच दुसरया दिवशीही तो आपल्या पत्नीलाही बरोबर घेऊन आला.त्या दिवशी ही त्याने संत्री ची एक फोड खात संत्री गोड आहे का विचारत आजीच्या हातात संत्री देऊन हसत हसत घरी गेला.असे बरेच दिवस निघून गेले. आजीच्या शेजारची एक भाजीवाली व त्या तरूणाची पत्नी हे रोज पाहत असे.एक दिवस त्याच्या पत्नीने विचारले तु असा रोज वजन झाल्यावर आजीला एक संत्री का देतोस.अन ती ही अर्धी खाऊन.त्या वर तो तरून आपल्या पत्नीला म्हणाला.अग वेडे आजी रोज हे संत्री विकते पन ती कधीच संत्री खात नाही कारण तिला २ रूपये कमी मिळतील.मि तिला रोज एक संत्री खायला घालून माझ्या आजीच्या रूपात तिला पाहतो.पत्नीने गर्वाने नवरयाला मिठी मारली.दुसरया दिवशीही तसच घडले तोच शेजारी असलेली भाजीवाली आजीला म्हणाली अग हा पोरगा रोज कशापाई तरास देतो समदी संत्री गोड हायीत.आजी तरूणाकडे व त्याच्या पत्नीकडे पाहुन हसत म्हणाली अग त्यो पिरमा पायी असा वागतुय.अन त्याचा हा जिव बघुन म्या बी त्याच्या वजनात चार संत्री रोज ज्यादा घालते. आजीचे शब्द एकुण त्याला खुप बर वाटल. मनात विचार करत असताना.शेजारी बसलेली भाजी वाली आजी.त्या तरूणाला म्हणाली.बाळा तु जे गमावत होता ते खुशीत गमावत होतास.म्हणुन तर तुला न मागता संत्री ही अन आजीच प्रेम या दोन्ही गोष्टी मिळाल्या..

मित्रांनो ओंजळीत बसेल एवढ नक्की घ्या..
पण सांडण्या अगोदरच ते वाटायलाही शिका..
माणुसकी कमी होत चाललीय.
तेवढी फक्त जपायला शिका..

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!