जय किसान.. Jai Kisan
जय किसान..
👳👳👳👳👳
"कापसाला 10000 रुपये,💭💭💭💭💭
कांदयाला 5000,
ऊसाला 4000 रुपये दर
मिळालाच पाहिजे"
होय, आमच्या मुलांनाही
मल्टीप्लेक्समध्ये जाऊन
चित्रपट पाहावेसे वाटतात ....!
पाण्यासारखे पेट्रोल/डीझेल
उधळणाऱ्या एसयूव्ही कार
बाईक उडवाव्या वाटतात..!
त्यांनाही डॉक्टर, इंजिनिअर व्हावेसे वाटते.
उच्चभ्रू राहणीमानाचे माजोरी दर्शन घडवणाऱ्या प्रत्येक
शहरी गोष्टीचे त्यांनाही आकर्षण आहे. अशी स्वप्ने पाहणे गुन्हा आहे काय ?
टाटा, अंबानी यांच्या उद्योगांनी देशाची अर्थव्यवस्था खरेदी करता येईल इतकी संपत्ती कमवावी आणि आमची दहा पंधरा एकराची शेतजमीनही
हिसकावून घ्यावी आणि एमआयडीसी च्या यमाने तृप्तीचा ढेकर द्यावा.
आमची अंत:करणे जळत नाहीत का ?
बाईक , कार, बस, रिक्षा तर सोडाच साधे पायी चालत शाळेला जावे असे रस्तेही आमच्या लेकरा बाळांना मिळत नाहीत.
आमच्या अडलेल्या लेकीसुनांची खड्ड्यातच सुटका होते याचा अपमान आम्हाला वाटत नाही नसेल का?
जरा सर्दी खोकला झाला की सुपर स्पेशालिटीत दाखल
होणाराना महागडी औषधे कधी कडू लागत नाहीत....!
मात्र ऊस कडू लागतो.
पेट्रोल/डीझेल कितीही महागले तरी ब्र नसतो...!
पण भाजीपाला मात्र स्वस्त पाहिजे...!
तुमच्या एक वेळच्या शाॅवरच्या आंघोळीत
आमच्या कांद्याचे दोन वाफे भिजू शकले असते.
ऐन उन्हाळ्यात
शेतीचे पाणी रोखून शहराला पाणी पुरवले गेले,
तेव्हा किती जणांनी आपले शाॅवर बंद केले ....?
उन्हाळ्यात एका
रात्रीत कुलर पन्नास लिटर पाणी फस्त करतो.....!
तेवढ्यात ठिबकवर
मोसंबीची चार झाडे जगू शकली असती..!
किती जणांनी कुलर वापरणे
थांबवले....?
एक एसी तीन एचपी पावर ओढतो ! तेवढ्यात एका शेतकऱ्याचे शेत भिजवता येते..!
झाला का एसीचा वापर
बंद...?
शेतीला मिळणारी वीज इकडे वळवल्यामुळे चाळीस
वर्षापूर्वीची तेलावर चालणारी इंजिने खेड्यात टूकटूक करताना दिसत आहेत...!
कारण सोळा सोळा तास वीजच नसते...! का नाही होणार
शेतमाल महाग ... ?
खेड्यात वीजच नसते तर कुठला टीव्ही अन
संगणक ?
पंखा, कुलर तर विचारातच घ्यायचे नाही ..!
का आम्ही सावत्र आईची लेकरे आहोत ?
दिवाळीत शहरे
विषारी दारूच्या धुराने ओसंडून वाहतात,
आणि आमच्या पोरांना साध्या टिकल्या उडवत बसावे लागते..!
काय त्यांनी शेतकऱ्यांच्या पोटी जन्म घेतल्याचे पाप केले म्हणून ?
त्यांना नाही वाटत कानाचे पडदे फाडणारे फटाके फोडावेत
म्हणून...?
शेतकऱ्यांच्या किडन्या फेल होत नाहीत ?
त्यांना हृद्यविकाराचे झटके येत नाहीत ?
सरकारी इस्पितळात
डुकरासारखे भरती होताना त्यांना अपमान वाटत नाही ?
कुठून येतील महागड्या उपचारासाठी पैसे ?
तुमच्या कुत्र्यांना मिळतात
तसले वैद्यकीय उपचार शेतकऱ्यांच्या गाई,
बैलाला सोडा या माणसांनाही मिळू नयेत ?
कुठून येईल हा पैसा ?
उन्हाळ्यात तुम्ही आठ दहा दिवस सकुटुंब सहलीला जाऊन लाखभर रुपये खर्च करून यावेत...!
आणि त्यांनी फक्त वारीत पायपीट करून पर्यटनाचा आनंद मानावा ?
एक दिवसाची सुटी टाकून
स्वातंत्र्यदिन विकेंडला जोडून चार दिवसांची मौजमजा करणारांना माहित आहे
का कधी शेतकऱ्यांनी साजरा केलेला विकेंड ?
त्यांचा स्वातंत्र्यदिन
बैलाबरोबर शेतात साजरा होतो..!
जर आम्हा येड्या मुक्यांना काहीच स्वप्ने नसतात ?
मित्रांनो भानावर या .... !
कशासाठी नुसतेच म्हणायचे.
✊✊✊✊✊✊
।।जय जवान,जय किसान...।।
👊
Comments
Post a Comment