Think out of box... चौकटीच्या बाहेर विचार करा । । Moral story

चौकटीच्या बाहेर विचार करा।। THINK OUT OF BOX



एका राजाने दोन गरुड आणले
आणि त्यांना शिकवण्यासाठी माणूस
ठेवला .
काही दिवस गेले . एक गरुड उंच
भराऱ्या घेऊ लागला, अगदी बघत
रहावे असे .
दुसरा मात्र उडेचना.
राजा काळजीत पडला ,
अगदी सारखे दोन पक्षी एक
भरारी घेतोय दुसरा थंड .
काय करावे.. काय करावे..???
.राजाने दवंडी पिटली,
गरुडला कोणी उडवून दाखवावे
म्हणून .
दुसऱ्या दिवशी पहाटेस
राजा बागेत आला, बघतो तो दुसरा गरुड
पहिल्या पेक्षाही उंच
गेला होता आणि हवेत सुंदर संथ
गिरक्या घेत होता .
राजाच्या आश्चर्यास पारावार
उरला नाही. हे अजब घडले कसे
आणि केले तरी कोणी !
एक
सामान्यसा दिसणारा शेतकरी अदबीने
पुढ्यात आला आणि म्हणाला "महाराज
मी केले"
राजा : अरे पण कसे ?
शेतकरी : मी फक्त तो गरुड ज्यावर
बसला होता ती फांदी कापली,
दुसऱ्या क्षणी तो आकाशात
झेपावला बाकी तुम्ही बघत आहातच.
****
तात्पर्य :
आपली फांदी
कधीतरी सोडून बघा.
सतत सुखद मर्यादित कवचांमध्ये
स्वतःला गुरफटवून ठेवू नका.
कदाचित बाहेर अधिक सुंदर
खुले समृद्ध
आकाश तुमची वाट बघत असेल.
Change ur thought.....
May change ur life....
विचार बदला , आयुष्य बदला !!!
and think possitive...sweet day...for sweet people...

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!