हिवाळ्यात केळी फळबागेचे संरक्षण असे कराल

हिवाळ्यात केळी फळबागेचे संरक्षण असे कराल♥प्रगतशील शेतकरी ग्रुप ♥

♥हिवाळ्यात केळी फळबागेचे संरक्षणकरिता बागेभोवती किंवा बागेजवळ
गव्‍हाचा भुसा,
लाकडाचा भुसा
किंवा
मक्‍याचा भुसा,
काडीकचरा,
गवत जाळून बागेमध्‍ये धूर करावा.

♥हिवाळ्यात केळी फळबागेचे संरक्षणकरिता केळी पिकामध्‍ये
उसाचे पाचट,
रोगाचा प्रादुर्भाव नसलेली वाळलेली पाने,
सोयाबीन भुसा
यासारखे सेंद्रिय पदार्थ अथवा
चंदेरी रंगाच्‍या पॉलिप्रॉपिलीन पेपरचे आच्‍छादन करावे.

यामुळे जमिनीतील तापमान स्थिर राहण्यास मदत होते.

लाभदायक सूक्ष्‍म जिवाणूंची संख्‍या वाढते.

♥ हिवाळ्यात केळी फळबागेचे संरक्षणकरिता थंड वातावरणात
केळीची नवीन लागवड टाळावी.

♥ हिवाळ्यात केळी फळबागेचे संरक्षणकरिता थंड वातावरणात केळीची लोंबणारी हिरवी निरोगी तसेच वाळलेली पाने खोडाभोवती तशीच लपेटून ठेवावीत.
अशी पाने शक्‍यतो हिवाळ्यात कापू नयेत.
फक्‍त रोगग्रस्‍त पानाचा तेवढा भाग कापावा.

♥ वारा प्रतिरोधक वनस्‍पतींचा वापर हिवाळ्यात केळी फळबागेचे संरक्षणकरिता करावा

केळी लागवडीच्‍या वेळेस पश्चिमेला व दक्षिणेला
सुरू चे झाडे,

पश्चिमेला व दक्षिणेला नेपियर गवत,

पश्चिमेला व दक्षिणेला शेवरी इत्‍यादी वारा प्रतिरोधक वनस्‍पतींची
२-३ ओळीत दाट लागवड करावी.

वारा प्रतिरोधक वनस्‍पतींमुळे केळी बागेचे थंड वाऱ्यापासून संरक्षण होते.

♥ वाफसा टिकवून ठेवण्‍यासाठी

थंडीच्या काळात जमिनीत योग्‍य तापमान तसेच वाफसा स्थिती टिकवून ठेवण्‍यासाठी शेणखत अथवा गांडूळ खत पिकास द्यावे.

थंडी सुरू होण्‍याअगोदर रासायनिक खतांच्‍या शिफारशीत मात्रा द्याव्‍यात. पालाश या प्रमुख अन्‍नद्रव्‍याची कमतरता पडू देऊ नये. पालाश निर्धारित मात्रेपेक्षा २० टक्के अधिक द्यावा.

♥ केळफूल कापणी व त्यानंतर पोटॅशियम डाय हायड्रोफॉस्‍फेट फवारणी,
केळी पिकातील खालची फणी कापणी व घड पिशव्‍यांनी झाकावा.

घडाची योग्‍य वाढ व पक्‍वता याकरिता शेवटची फणी उमलल्‍यानंतर केळफूल कापावे. ते बागेबाहेर नेऊन नष्‍ट करावे.

फण्‍या उमलल्‍यानंतर सर्वांत खालची फणी बऱ्याच वेळा अर्धवट असते. ती कापावी.

केळफूल कापणीनंतर घडावर
पोटॅशियम डाय हायड्रोफॉस्‍फेट ५० ग्रॅम अधिक
युरिया १०० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी यांची फवारणी घ्यावी.
त्यात स्टिकर १ मिलि प्रति लिटर मिसळावे.
पुढील फवारणी १५ दिवसांनी घ्यावी.
यामुळे घडातील फळांच्‍या आकारमान वाढते.
केळी घडांचे वजन वाढते.
केळी घड लवकर काढणीस येतो.

केळीवरील करपा या बुरशीजन्‍य रोगाच्‍या प्रभावी नियंत्रणासाठी कार्बेन्डाझिम बुरशीनाशकांची फवारणी करावी.

बाग स्‍वच्‍छ ठेवल्यास फायदा होतो.
कार्बेन्डाझिम १० ग्रॅम अधिक ५० मिलि मिनरल ऑइल अथवा
प्रोपीकोनॅझोल १० मिलि अधिक ५० मिलि मिनरल ऑइल (प्रमाण : प्रति १० लिटर पाणी)

केळफूल कापणी,
फण्यांची विरळणीनंतर
घड ७५ x १०० सेंमी आकारमानाच्‍या
२ सच्छिद्र पॉलिप्राॅपिलीन पिशव्‍यांनी झाकावा.
यामुळे घडाचे थंडी, हवा, धूळ, पाणी तसेच दव यापासून संरक्षण होते.

♥ निंबोळी पेंड चा वापर करावा

तसेच या कालावधीत प्रतिझाड किमान अर्धा किलो निंबोळी पेंड दिल्यास जमिनीचे तापमान वाढते.

तसेच सूत्रकृमींपासून पिकांचे संरक्षणही होते.

♥हिवाळ्यात केळी फळबागेचे संरक्षणकरिता केळी पिकामध्‍ये पहाटेच्‍या वेळी किंवा रात्री ठिबक संचाने सिंचन करावे.

♥हिवाळ्यात  कमाल आणि किमान तापमानातील कमी- अधिक फरकामुळे
केळीच्‍या कंद,
घड,
मुळे आणि
पानांवर विपरीत परिणाम होत असतो.
हे विपरीत परिणाम कमी करण्यासाठी वरिल उपाययोजना केल्यास निश्चितच केळी फळाची गुणवत्ता व उत्पादन तत्सम उत्पन्न वाढेल.

संकलित!

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

ओशो के अनमोल विचार ... Osho great thought in Hindi & English ...