गहू पिकावरील रोगाचे लक्षण व नियंत्रण असे कराल
गहू पिकावरील रोगाचे लक्षण व नियंत्रण असे कराल ♥प्रगतशील शेतकरी ग्रुप ♥
♥गहू पिकामध्ये प्रामुख्याने
तांबेरा (गेरवा),
काजळी किंवा काणी करपा,
मर,
मूळकूज,
खोडकूज या रोगाचा प्रादुर्भाव होतो.
♥गहू हे महाराष्ट्रातील रब्बी हंगामातील महत्त्वाचे पीक असून,
अन्य राज्यांच्या तुलनेत हेक्टरी उत्पादकता ही कमी आहे.
♥कमी उत्पादकतेमागे हवामानासोबतच या पिकावरील रोग व किडींचा प्रादुर्भाव हे मुख्य कारण आहे.
♥गहु पिकावर येणारा काजळी किंवा काणी रोग
♡काजळी किंवा काणी रोगकारक बुरशीचे नाव - युस्टीलँगो ट्रिटीसी
♡गव्हावरील काजळी किंवा काणी रोगाचे लक्षणे -
ही बुरशी गहू पिकाच्या फुलांवर वाढते. दाण्याऐवजी काळी भुकटी तयार होते. ही काळी भुकटी म्हणजेच काणी. या रोगाची थंड आणि आर्द्र हवामानात अधिक वाढ होते.
♡नियंत्रण व्यवस्थापन :
☆लागवडीसाठी रोगमुक्त बियाणे वापरावे.
☆उष्णजल बीजप्रक्रियाः-वापरण्यापूर्वी चार तास बियाणे थंड पाण्यात भिजवावे. त्यानंतर उष्ण पाण्याची प्रक्रिया ५४ अंश सेल्सियस तापमान असलेल्या पाण्यात १० मिनिटे बुडवून काढावे. त्यानंतर सावलीत वाळवावे.
☆रासायनिक बीज प्रक्रिया - कार्बेनन्डाझिम १ ग्रॅम किंवा थायरम ३ ग्रॅम प्रति किलो बियाणे
☆उभ्या पिकातल्या रोगट ओंब्या काळजीपूर्वक काढून नष्ट कराव्यात.
☆काणीग्रस्त रोगट झाडे दिसताच ती नष्ट करावी.
-------------------------------------------------------------------------------------------------------------
♥गव्हावरील तांबेरा रोगाचे प्रकार
♡खोडावरचा काळा तांबेरा
♡पानावरील नारंगी तांबेरा
♡पिवळा तांबेरा
गव्हावरील तांबेरा हा प्रमुख आणि नुकसानकारक रोग असून, त्यामुळे दाणे सुकतात व जिऱ्यासारखे दिसू लागतात. या रोगाचे खोडावरचा काळा तांबेरा, पानावरील नारिंगी तांबेरा आणि पिवळा तांबेरा असे प्रमुख तीन प्रकार आहेत.
♡ गव्हावरील खोडावरचा काळा तांबेरा
गव्हावरील खोडावरचा काळा तांबेरा रोगकारक बुरशीचे नाव - पक्सिनिया ग्रामिनीस ट्रिटीसी
गव्हावरील खोडावरचा काळा तांबेराची लक्षणे
☆पीक ओंबीच्या अवस्थेत या रोगाची लक्षणे पानांवर, खोडावर आणि ओंबीवर दिसतात.
☆ प्रादुर्भावानंतर तपकिरी रंगाचे लांबट गोलाकार फोड/पूरळ खोडावर व पानांवर दिसून येतात. हे फोड/पूरळ पूर्ण पानांवर व खोडावर पसरत जातात. प्रमाण वाढल्यानंतर ते एकमेकांमध्ये मिसळतात.
☆हाताचे बोट अलगद फिरवल्यास तपकिरी भुकटी बोटास लागते.
☆वाढत्या तापमानानुसार खोडावरील काळा तांबेरा वाढत जातो. रोपांमधील अन्नद्रव्ये शोषून या बुरशीची परिपूर्ण वाढ होते बुरशीचे बीजाणू पानांचा पापुद्रा फाडून बाहेर आलेले दिसून येतात.
☆पिकाची पूर्णावस्था व तापमान वाढल्यास कालांतराने हे फोड पुढे काळसर रंगाचे होतात. या रोगास खोडावरचा काळा तांबेरा असे संबोधले जाते.
☆या रोगाच्या वाढीस तापमान सुमारे १५ अंश सेल्सिअस ते ३५ अंश सेल्सिअस व पुरेशी आर्द्रता आवश्यक असते.
☆ रोगग्रस्त झालेल्या रोपांपासून कमी प्रमाणात फुटवे निर्माण होऊन उत्पन्न कमी मिळते.
♡ गव्हावरील पानावरील नारंगी तांबेरा रोग
गव्हावरील पानावरील नारंगी तांबेरा रोगकारक बुरशी - पक्सिनिया रेकॉनडिटा.
लक्षणे - रोगाचा प्रादुर्भाव प्रामुख्याने पाने व देठांवर आढळतो.
- गोलाकार नारंगी रंगाचे लहान पुरळ हे पानांवर व देठांवर दिसून येतात. सुरवातीस पानाच्या वरील भागांवर दिसतात, कालांतराने दोन्ही भागांवर पूरळ दिसून येतात.
- या बुरशीच्या वाढीस लागणारे तापमान १५ अंस सेल्सिअस ते २५ अंश सेल्सिअस इतके आवश्यक असते.
♡ गव्हावरील पिवळा तांबेरा रोग
★गव्हावरील पिवळा तांबेरा रोग रोगकारक बुरशीचे नाव - पक्सिनिया स्ट्रीफोरमीस.
★गव्हावरील पिवळा तांबेरा रोगाची लक्षणे -
☆या रोगामध्ये पिवळ्या रंगाचे बारीक पूरळ पानांच्या शिरांवर सरळ रेषांत दिसून येतात.
☆गव्हावरील पिवळा तांबेरा हा रोग प्रामुख्याने थंड हवामान असलेल्या ठिकाणी आढळतो. तसेच वाढीस अनुकूल तापमान १५ अंश ते २० अंश सेल्सिअस असते.
☆ या रोगाची तीव्रता जास्त आर्द्रता व पर्जन्यवृष्टीच्या ठिकाणी वाढते.
★गव्हावरिल तांबेरा रोगाचा प्रसार
☆ तांबेरा रोगाची बुरशी ही फक्त गहू पिकावर आपले अस्तित्व टिकवू शकते.
☆मैदानी प्रदेशात गव्हाची काढणी झाल्यास या बुरशीचे बीजाणू पूर्णपणे नाश पावतात.
☆दक्षिण भारतातील तामिळनाडू राज्यातील निलगिरी व पलनी टेकड्यांवर या तांबेरा रोगाची बुरशीचे अस्तित्व वर्षभर दिसून येते. तेथील उन्हाळी किंवा गैरहंगामी गहू पिकावर किंवा स्वयंरुजीत गव्हावर या बुरशीचा प्रादुर्भाव वर्षभर आढळतो. नोव्हेंबर महिन्यात निलगिरी व पलनी टेकड्यांवरून वादळी वाऱ्यासोबत या बुरशी बिजाणूंचे दक्षिण समुद्रात प्रसारण होते. या बुरशीचे बीजाणू वादळी पावसाबरोबर हवेमार्फत १८०० कि.मी. इतक्या अंतरापर्यंत वाहून जातात. मैदानी प्रदेशात गहू पिकाची लागवड झालेली असल्यास रोगास अनुकूल परिस्थितीमध्ये या बुरशीचे बीजाणू रुजून रोगाचे प्रमाण वाढते. तांबेरा रोगाचा प्रसार अधिक वाढतो.
★गव्हावरिल तांबेरा रोगाचे नियंत्रण व्यवस्थापन
☆गहू पिकाची पेरणी हंगामापूर्वी किंवा उशिरा करू नये.
☆लागवडीसाठी रोग प्रतिकारक्षम जातींची निवड करावी.
☆रासायनिक खतांची मात्रा संतुलित प्रमाणात असावी.
पिकास योग्य वेळी शिफारशीत प्रमाणात नत्रखताची मात्रा द्यावी.
नत्र खतांचे प्रमाण अधिक झाल्यास पीक तांबेरा रोगास बळी पडते.
☆पिकास अति पाणी देणे टाळावे.
विशेषतः भारी जमिनीत पाणी देताना अधिक काळजी आवश्यक असते.
त्यामुळे शेतातील हवामान अधिक दमट राहून तांबेरा रोगाच्या प्रसाराला मदत होते.
☆साधारणपणे मध्यम ते भारी जमिनीत १८ ते २१ दिवसांच्या अंतराने व
हलक्या जमिनीत १० ते १५ दिवसांच्या अंतराने
पाण्याच्या एकूण तीन ते चार पाळ्या द्याव्यात.
☆रोगाचा प्रादुर्भाव दिसून येताच, (फवारणी: प्रति लिटर पाणी)
प्रोपीकोनॅझोल १ मि.ली. किंवा मँन्कोझेब दोन ग्रँम
गरज भासल्यास पुढील फवारणी पहिल्या फवारणीनंतर १५ दिवसांनी करावी.
-------------------------------------------------------------------------------------------------
♥गव्हावरिल करपा रोग
★गव्हावरिल करपा रोगकारक बुरशीचे नाव - अल्टरनेरिया ट्रिटीसिना
★गव्हावरिल करपा रोगाची लक्षणे -
कोरडवाहू पेक्षा बागायती गव्हावर जास्त प्रमाणात अल्टरनेरिया करपा हा रोग येतो.
रोगाचे प्रमाण जास्त वाढल्यास करप्याचे ठिपके एकत्र मिसळून संपूर्ण पान करपते.
१९ ते २० सेल्सियस तापमान, सतत दमट हवामान असल्यास या रोगाचा प्रसार होतो.
★गव्हावरिल करपा रोगाचे नियंत्रण व्यवस्थापन :
☆पेरणीसाठी रोगमुक्त शेतातील बियाणे वापरावे.
☆बीजप्रक्रिया - ३ ग्रॅम थायरम प्रति किलो बियाणे.
☆उभ्या पिकावर रोगाचा प्रादुर्भाव दिसल्यास,
मँकोझेब २० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
-------------------------------------------------------------------------------------------------
♥गव्हावरील मूळकूज आणि खोडकुज रोग
★गव्हावरील मूळकूज रोगकारक बुरशीचे नाव - फ्युजारियम
★गव्हावरील खोडकूज रोगकारक बुरशीचे नाव - रायझोक्टोनिया
★गव्हावरील मूळकूज आणि खोडकुज रोगाची लक्षणे - या रोगांचा एकत्रित परिणाम होऊन रोपे पिवळी पडून सुकायला लागतात. खोडाचा जमिनीलगतचा भाग आणि मुळे कुजतात. झाडे कोलमडून पडतात. रोपे मरतात.
★ गव्हावरील मूळकूज आणि खोडकुज रोगाचे नियंत्रण
गहु बीयाणे बीजप्रक्रिया - ३ ग्रॅम थायरम प्रति किलो बियाणे.
संकलित! भूषण खैरनार. 09422895411
B.Sc. ( Agri ), M.B.A. ( Marketing & System )
Comments
Post a Comment