पेरु लागवड व्यवस्थापण असे कराल

पेरु लागवड व्यवस्थापण असे कराल♥प्रगतशील शेतकरी ग्रुप ♥

♥ पेरु फळबाग अत्यंत हलक्‍या व मध्यम जमिनीमध्ये पेरूची लागवड 7.5 x 7.5 फूट अंतरावर
7.5 x 7.5 फूट अंतरावर लागवड केली तर एकरी 774 झाडे बसतात.

♥पेरु फळबाग  भारी जमिनीमध्ये 10 x 10 फूट अंतरावर करावी. 10 x 10 फूट अंतरावर लागवड केली तर 435 झाडे बसतात.

♥वरिल अंतर ठेवून पेरु फळबाग उत्पादन आणि गुणवत्तेमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा होते.

♥ पेरु फळबाग एकरी 18 ते 20 टनांपर्यंत उत्पादन मिळते.

♥ पेरु प्रतीमध्ये चांगली सुधारणा होते.

♥पेरु फळबागा सघन पद्धतीने लागवड केल्यामुळे
ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करून पिकाला गरजेनुसार पाणी देता येते.
त्यामुळे जमिनीमध्ये सतत वाफसा राहून उत्पादन
आणि
गुणप्रतीमध्ये वाढ होते.

♥मिडो ऑर्चर्ड पद्धतीने कृषी विज्ञान केंद्राच्या फार्मवर उत्पादन घेतले असता बिगर हंगामी उत्पादन मिळणे शक्‍य झाले आहे.
मिडो ऑर्चर्ड पद्धतीने 1 मीटर x 1 मीटर किंवा 1 मीटर x 2 मीटर अंतरावर लागवड करतात.
♥ मिडो ऑर्चर्ड पद्धतीत ज्याठिकाणी जास्त थंड हवामान आणि उष्णता यामुळे झाडांची वाढ मर्यादित होते.

♥ 7.5 फूट अंतरावरील लागवड जास्त उपयुक्त का?

महाराष्ट्र राज्यातील पेरू उत्पादन क्षेत्रामध्ये 1 किंवा 2 मीटर अंतरावर लागवड केल्यानंतर वर्षातून 2 ते 3 छाटणी कराव्यात लागतात.

विशेषतः भारी जमीन आणि वर्षभर पोषक वातावरणामुळे पेरूची वाढ वर्षभर सुरू असते. त्यासाठी छाटणी जास्त करावी लागते.
त्यासाठी मजुरांची जास्त गरज भासते.

मजुरांचा अभाव किंवा छाटणीचा होणारा जास्त खर्च याचा विचार करता आपल्याकडे 7.5 x 7.5 फूट अंतरावरील लागवड जास्त उपयुक्त दिसून आलेली आहे.

♥पेरु फळबागात छाटणी कधी व कश्याप्रकारे करावी?

पेरु फळबागात मे महिन्यात एकदाच चांगली छाटणी केली तर पेरूचे चांगले उत्पादन मिळते.

पेरु झाडाची मे महिन्यात छाटणी करताना जाड फांद्या ठेवून बाकीच्या सर्व बारीक काड्या छाटाव्यात.

झाडाच्या मुख्य खोडापासून आलेल्या चार ते पाच उपयुक्त फांद्या आणि
त्यानंतर आलेल्या लहान फांद्या अशाप्रकारे झाडांना आकार देण्यात येतो.

पेरु झाडाला पालवी आल्यानंतर
सुरवातीला फुले हे
पेरु झाडाच्या जाड फांद्या आणि खोडावर येतात.

या फळांचा आकार, वजन आणि गुणवत्ता चांगली असते.
फळांची गोडी इतर लागवड पद्धतीपेक्षा चांगली असते.
झाडाला भरपूर फूट येऊन पानांची संख्या चांगली मिळते.
नंतरचा बहर हा नवीन आलेल्या शेंड्यांना येतो.

झाडांची उंची जास्तीत जास्त 6 ते 7 फूट असल्यामुळे
छाटणी,
फवारणी आणि
फळांच्या काढणी खर्चात बचत होते.

♥पेरु फळबागात शेडा काढण्याचे फायदे?

पेरूच्या झाडांची जास्त वाढ होत असेल,
तर सप्टेंबर-ऑक्‍टोबर महिन्यांत वाढणार शेंडा हाताच्या साहाय्याने एकदाच काढला, तर पुढची वाढ थांबते.
त्यामुळे फांदीवर फुलांची संख्या वाढते.
पेरूची सर्व फळे जाड फांदी व खोडावर येत असल्यामुळे त्यांचा आकार आणि प्रतही चांगली मिळते. तसेच पेरूची काढणी करणेही सोपे जाते.

♥पेरु बागेत खत व्यवस्थापण
पाणी देण्याअगोदर शिफारशीत मात्रेमध्ये

आंतरमशागतीसाठी पॉवर टिलरचा वापर केल्यामुळे आंतरमशागतीच्या खर्चातही बचत होते.
झाडांच्या जुन्या मुळ्या तुटून नवीन पांढरी मुळे येण्यासाठी शेत भुसभुशीत ठेवावे.

चांगल्या प्रतीचे शेणखत पेरु बागेत सर्वत्र मातीत मिसळेल या पद्धतीने द्यावे.

माती परिक्षण करुन रासायनिक खते मात्रा
आणि
सूक्ष्म अन्नद्रव्ये मात्रा
झाडाच्या खोडाभोवती रिंग करून द्यावेत.

♥पेरु बाग पाणी नियोजन
पाऊस, पेरु आणि पाणी नियोजन व पेरु झाडाच्या वाढीशी संबंध?

जून महिन्यात पाऊस पडल्यानंतर किंवा गरजेप्रमाणे पाणी दिल्यानंतर
पेरु झाडांना फूट येण्यास सुरवात होते.

पाण्याची उपलब्धता असेल तर
लवकर छाटणी करूनही
हंगामापूर्वी फळे बाजारपेठेत पाठविता येतात.

♥पेरु फळ काढणी साधारण कधी होते?

पेरूच्या पहिल्या फळांची काढणी
सप्टेंबर-ऑक्‍टोबरमध्ये होते.

तर दुसरी फळे फेब्रुवारी-मार्च

किंबहुना त्यानंतरही मिळतात.

पेरु फळांना चांगला बाजारभाव मिळतो.
पेरु फळांच्या उत्पादनानुसार झाडांना दोनदा चाळणी करावी.

♥पारंपरिकरित्या पेरू लागवडीमधील अडचणी काय?

♥पेरु झाडाची छाटणीचा अभाव!
पेरु फळांच्या काढणीनंतर छाटणी केली जात नाही.
आज अनेक पेरु बागांमध्ये छाटणी न केल्यामुळे दाटी झालेली आहे.
त्यामुळे सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोचत नाही.
त्यामुळे जमिनी लवकर वाफसा स्थितीत येत नाही.

♥पेरुतील 20x20 फूट अंतरावर लागवड केल्यानंतर चार ते पाच वर्षांनंतर उत्पादनास सुरवात होते.

♥शेणखत, सेंद्रिय खत व रासायनिक खताचा असमतोल!

पेरु झाडांना शेणखत किंवा सेंद्रिय खतांचा वापर कमी करून रासायनिक खतांचा वापर जास्त प्रमाणात केला जातो.
त्यामुळे जमिनीतील सामू-क्षारांचे प्रमाण वाढते व पांढरी मुळे जास्त वाढत नाहीत.
परिणामी, फळांचा आकार वाढत नाही आणि फळे लवकर पक्व होऊन गळतात.

♥अयोग्य पाणी पद्धत!

पारंपरिक पाणी व्यवस्थापन पद्धतीमध्ये
झाडाभोवती आळे तयार करून
जास्त प्रमाणात पाणी दिले जाते.

पाणी देण्याच्या दोन पाळ्यांमधील अंतरही कमी असते.

त्यामुळे बागेमध्ये ओलावा आणि आर्द्रता वाढल्यामुळे फळमाशीचे प्रमाण वाढते.

बागेमध्ये सूत्रकृमीचे प्रमाण वाढत आहे.
तसेच फळमाशी, शेंडेअळीचे प्रमाण वाढून झाडांची मर वाढते.

पेरु उत्पादनात घट येत असताना मिळालेल्या पेरु फळांची गुणवत्ता कमी होत आहे.

♥बागेत गळालेली फळे उचलली जात नसल्यामुळे फळमाशीचे प्रमाण वाढते.

♥पेरु झाडांचा छाटणीच्या अभावे आकार आणि उंची वाढल्यामुळे फळे काढणेही अवघड जाते.
झाडांचा आकार मोठा असल्यामुळे छाटणी करणे अवघड असल्यामुळे मजुरी जास्त लागते. त्यामुळे अनेक बागांची छाटणी होत नाही.
तसेच पेरु पीक संरक्षण करण्यासाठी फवारणी करणेही शक्‍य होत नाही.

संकलित!

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!