जिवामृत असे तयार कराल
जिवामृत असे तयार कराल♥प्रगतशील शेतकरी ग्रुप ♥
♥"" जिवामृत "" जिवामृत बनवण्यासाठी एक प्लास्टिक ची टाकी
किंवा
सिमेंट टाकी सावलीत ठेवावी,
टाकी गोल असावी,
त्यात २००लिटर पाणी घ्यावे,
व
♥त्यात देशी गाईचे ताजे शेण १० किलो
+
♥५ते१० लिटर गोमुत्र
+
♥१ किलो काळा गुळ
किंवा
२ते४ लिटर ऊसाचा रस
किंवा
ऊसाचे१० किलो बारीक तुकडे
किंवा
देशी गोड ज्वारीच्या धाटाचे१० किलो तुकडे
किंवा
१ लिटर पक्व नारळाचे पाणी
किंवा
१ किलो गोड फळांचा गर(चिकु, केळी, पपई,पेरु, आंबे, किन्नो)
+
♥१ते२ किलो कडधान्याचे बेसन(चवळी, चना, मुग, उडीद, हरबरा)
+
♥शेताच्या बांधावरील
किंवा
जंगलातील
किंवा
ज्या पिकास द्यायचे त्या पिकाच्या मुळ्यावरील माती यात घ्यावयाचे..
♥आधी२०० लिटर पाणी टाका.
♥सुरवातीला त्या पाण्यामध्ये हाताच्या बोटाने शेण कुसकरुन फोडुन कालवुन पाण्यात मिसळा.
♥नंतर गोमुत्र टाकाव गोड पदार्थ टाका.
♥एका दुसर्या भांड्यात पाणी घेवुन त्यात बेसन टाकावे
व हाताने मिसळुन एकजीव करावे
व नंतर ते२०० लिटर पाण्यात टाकावे व सोबत मुठभर माती टाकावी.
♥नंतर काठीने घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने ते द्रावण चांगले ढवळावे.
♥नंतर त्यावर ज्युटचे बारदान(पोते) झाकुन ठेवावे.
♥हे जीवामृत द्रावण सावलीमध २ते ३ दिवस किण्वन क्रियेसाठी ठेवावे.
♥त्यावर थेट सुर्यप्रकाश पडु देवु नये.
♥रोज सकाळ संध्याकाळ काडीने दोन मिनटासाठी ढवळावे.
सछिद्र बारदानाच्या छिद्रातुन जीवामृत तयार होतांना उत्सर्जित झालेला अमोनिया, कार्बन मोनो आक्साईड, कर्बाम्लवायु व मिथेन हे वायु वातावरणात निघून जातात.४८ ते७२ तास किण्वन क्रिया चालल्यानंतर पुढे सात दिवसांपर्यंत सिंचनाच्या पाण्यासोबत त्याचा उपयोग करता येतो.७ दिवसानंतर त्याचा उपयोग करु नये जमीनीवर फेकुन द्यावे.
संकलित!
Comments
Post a Comment