माव्यामुळे चिकटा येतो म्हणून मावाचे जिवनक्रम,माव्यापासून होणारे नुकसान व नियंत्रण असे कराल
माव्यामुळे चिकटा येतो म्हणून मावाचे जिवनक्रम,माव्यापासून होणारे नुकसान व नियंत्रण असे कराल♥प्रगतशील शेतकरी ग्रुप ♥
♥माव्याचा जीवनक्रमाविषयी
मावा हा किटक लहान (१ ते २ मिमी ),
मऊ शरीर असलेले पिवळसर,
हिरवट, तपकिरी किंवा काळसर हिरवट रंगाचे असून झाडाच्या कोवळ्या भागावर आढळतो, ह्या किडीच्या पोटाच्या वरील भागावर दोन सुक्ष्म नलिका असून त्याद्वारे ही कीड चिकट,
गोड द्रव बाहेर टाकते.
हा द्रव खाण्यासाठी मुंग्या रोपावर आढळतात.
ह्या मुंग्याच्या पाठीवर माव्याची पिले बसून ती एका झाडावरून दुसर्या झाडावर जातात. ही कीड अंडी घालीत नाही.
तिचे प्रजनन संयोगाविना होत असते.
माद्या बिन पंखाच्या, आकाराने मोठ्या, फिक्कट रंगाच्या असतात.
एक मादी दररोज ८ ते २२ पिलांना जन्म देते.
पिले चार वेळा कात टाकून प्रौढावस्थेत जातात.
किडीची वाढ ७ ते ९ दिवसात पुर्ण होऊन प्रौढ मावा २ ते ३ आठवडे जगतो.
वर्षभरात १२ ते १४ पिढ्या उपजतात.
♥माव्यापासून होणारे नुकसान
मावा हा कोवळ्या पानाच्या खालच्या बाजूला समूहाने राहून रस शोषतो.
परिणामी झाडे कमजोर होऊन पाने मुरडतात.
पानांचा रंग फिक्कट पडतो.
माव्याचा प्रादुर्भाव अधिक झाल्यास झाडे कापल्यासारखी दिसतात.
यामध्ये जुन्या झाडांपेक्षा कोवळ्या झाडांचे नुकसान अधिक होते.
पावसामुळे मावा धुवून खाली जमिनीवर पडतो व मरतो.
खडकाळ, हलक्या जमिनीत किंवा भारी चिकण जमिनीत कापसाच्या मुळ्या शिरत नाहीत. अशा झाडांवर मावा किडीचा प्रादुर्भाव अधिक जाणवतो.
माव्यामुळे कापसावर चिकटा येतो.
♥माव्याचे नियंत्रण
मावा किडीचे नैसर्गिक शत्रू :
लेडीबर्ग बिटल (ढाल किडा किंवा कॉक्सीनेलीड किटक ) हे किटक मावा कीड खावून आपली भूक भागवितात.
तसेच क्रायसोपा व सिरकीड माशी (हॉपर फ्लाय ) मावा किटक खातात.
चाल्सीड नावाचे परजीवी किटक मावा किडीची संख्या वाढू देत नाही.
♥थंडीचे प्रमाण वाढु लागताच पिकाची वेळोवेळी पाहणी करावी.
♥पाहणी करतांना खालील पानांच्या मागील बाजुचे निरीक्षण करावे व
♥माव्याचा प्रादुर्भाव आढळून येताच
400 मिली मिथील डेमॅटॉन 25 टक्के प्रवाही
किंवा
500 मिली डायमेथोएट 30 टक्के प्रवाही
किंवा
150 ग्रॅम थायामेथेक्झाम 25 टक्के दाणेदार
किंवा
140 मिली इमीडॅक्लोप्रिड 17.8 टक्के प्रवाही यापैकी एका किटकनाशकाची प्रति हेक्टरी मात्रे नुसार 500 लि. पाण्यात मिसळून फवारणी करावी .
संकलित!
Comments
Post a Comment