बोर लागवड नियोजन असे कराल

बोर लागवड नियोजन असे कराल♥प्रगतशील शेतकरी♥

♥बोर जमीन -

हलकी ते मध्यम

♥बोर जाती -

उमराण चमेली, कडाका, चुहारा, मेहरूण

♥बोर लागवड अंतर -

6 बाय 6 मीटर

♥बोर खते -

शेणखत 50 किलो प्रती झाडास छाटणीनंतर द्यावं.

250 ग्रॅम नत्र,
250 ग्रॅम स्फूरद आणि
50 ग्रॅम पालाश प्रती झाड प्रती वर्ष.

नत्र दोन हफ्त्यांतून विभागून द्यावं.

♥बोरांची छाटणी
बोरांची छाटणी60 सें.मी.पर्यंत मुख्य खोड ठेवून ही छाटणी एप्रिल आणि मे महिन्यात करावी. खुंटावरील फूट वेळोवेळी छाटावी.

♥बोर कीड नियंत्रण

बोरीवरील फळं पोखरणाऱ्या अळीच्या बंदोबस्तासाठी
फेनव्हलरेट 20 ई.सी. 5 मि.ली.
किंवा
कार्बारील 50 टक्के 20 ग्रॅम,

तर पानं कुरतडणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी
कार्बारील 20 ग्रॅम या कीटकनाशकाची फवारणी 10 लिटर पाण्याच्या प्रमाणानं करावी.

♥बोर रोग नियंत्रण

भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी
गंधकाची धुरळणी
किंवा
पाण्यात मिसळणाऱ्या गंधकाची 20 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

♥बोर फळगळ टाळण्यासाठी...

फळगळतीचं प्रमाण कमी करण्यासाठी बागेत मधमाश्यांच्या पेट्या ठेवाव्यात.

♥बोर उत्पादन -

75 ते 125 किलो प्रती झाड

संकलित!

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!