लसूण तण नियंत्रण असे कराल

लसूण तण नियंत्रण असे कराल♥प्रगतशील शेतकरी♥

♥लागवडीपुर्वी लसूण तण नियंत्रण असे कराल*
(प्रगतशील शेतकरी ग्रुप, भूषण खैरनार 09422895411)

तणनाशकाचे तांत्रिक नांव
पॅराक्वेट

उत्पादक कंपनी किंवा व्यापारी नांव~ ग्रामोक्झोन

केव्हा वापरावे ~ तण १ ते ६ इंचाचे असतांना वापरावे.

तणसोबत उगवुन आलेले किंवा पुर्नलागवड केलेले रोप देखिल मरुन जाते, त्यामुळे लागवड करण्यापुर्वी वापरावे.
दुपारच्या उन्हात फवारणी केलेली जास्त फायदेशिर ठरते.

♥ लागवडीपुर्वी लसूण तण नियंत्रण असे कराल*
(प्रगतशील शेतकरी ग्रुप, भूषण खैरनार 09422895411)

तणनाशकाचे तांत्रिक नांव ~ ग्लायफोसेट

उत्पादक कंपनी किंवा व्यापारी नांव~ ग्लायसेल, राउंडअप

केव्हा वापरावे ~ तणाच्या उंचीवर बहुतांशी नियंत्रण अवलंबुन असते.
पिक पेरणी (पुर्नलागवड नव्हे) च्या तिन दिवस आधी पर्यंत वापर केलेला चालतो.
--------------------------------------------------------------------------------------------
♥पिक लागवडी नंतर लसूण तण नियंत्रण असे कराल*
(प्रगतशील शेतकरी ग्रुप, भूषण खैरनार 09422895411)

तणनाशकाचे तांत्रिक नांव ~ ऑक्झिफ्लोरफेन

उत्पादक कंपनी किंवा व्यापारी नांव~ गोल

पिक पुर्नलागवडीनंतर वापरता येते.

♥ पिक लागवडी नंतर लसूण तण नियंत्रण असे कराल*
(प्रगतशील शेतकरी ग्रुप, भूषण खैरनार 09422895411)

तणनाशकाचे तांत्रिक नांव ~ फ्ल्युझिपोफ – पी- ब्युटील

उत्पादक कंपनी किंवा व्यापारी नांव~ व्हिप सुपर

केव्हा वापरावे ~ तण उगवणीनंतर वापरावयाचे तणनाशक
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

♥लसूण लागवडीनंतर १२-१५ दिवसात उगवण होते.

सुरुवातीच्या काळात रोपांती वाढ हळू असते.

याउलट तणांचे बी लवकर रुजते व त्याची वाढ जोरात होते.

वाफ्यात वरुन शेणखत घातले असेल आणि त्यात तणांचे बी जास्त असेल तर लागवडीनंतर पहिल्याच आठवड्यात वाफे गवताने भरलेले दिसतात.

खुरपणी त्वरित केली नाही तर बरेच नुकसान होते.

गवताचे रोप बारीक असल्यामुळे खुरपणी लवकर उरकत नाही.

अशावेळी रासायनिक तणनाशकाचा वापर उपयुक्त ठरतो.

♥तणनाशके अनेक प्रकारची असतात.

काही तणनाशके उगवण्यापूर्वी मारावयाची असतात, तर काही उगवून आल्यानंतर मारावयाची असतात.

काही फक्त एकदल व बारीक पानाच्या गवतावर परिणाम करतात तर काही द्विदल व मोठ्या पानाच्या गवतावर मारक ठरतात.

काही तणनाशके पिकांना अपाय न करता केवळ तणांचा बंदोबस्त करतात.

तर काही पिकांनापण अपाय करतात.

त्यामुळे कोणते तणनाशक केव्हा व किती प्रमाणात वापरावयाचे व कसे वापरावयाचे याची योग्य माहीती असणे आवश्यक आहे.

त्यासाठी तज्ञांचा सल्ला घ्यावा.

♥लसणामध्ये तणांचे बी रुजून येण्यापूर्वी मारावयाचे तणनाशक उदा. गोल, स्टॉम्प किंवा बासालिन वापरावे लागते.

पाकळ्यांची लागवड झाल्यानंतर कोरड्या वाफ्यात, पाटात आणि वरंब्यावर तणनाशक फवारावे.

त्यासाठी १५ मि.लि. गोल किंवा बासालिन १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

तणनाशक फवारणीसाठी एक विशिष्ट प्रकारचा नोझल मिळतो. त्याचा वापर करावा. लागवडीसोबत तणनाशकाचा वापर केल्यामुळे जवळजवळ ३० ते ४० दिवस लव्हाळा किंवा हरळीव्यतिरिक्त कोणतेही गवत उगवत नाही.

त्यानंतर वा-याने किंवा पाण्यासोबत गवताचे बी येऊन गवत उगवते.

अशावेळी एक हलकी खुरपणी करणे आवश्यक असते.

तसेच खरपणीमुळे जमिनीचा वरचा भाग मोकळा होतो व हवा खेळती राहते. मुळांची व झाडांची वाढ चांगली होते.

लव्हाळा व हरळीकिरता ग्लायसेल नावाचे तणनाशक वापरले जाते.

त्यामुळे लसूणदेखील मारला जातो. तेव्हा अशा तणनाशकांचा वापर लसूण किंवा कांदापिकात कधीही करू नये.

लव्हाळा व हरळीचा बंदोबस्त पूर्वमशागतीनेच होऊ शकतो.

खोल नांगरण करुन हरळीच्या काशा किंवा लव्हाळ्याच्या गाठी वेचणे हाच पर्याय दोन्ही गवतासाठी प्रभावी ठरतो.

♥(*वरिल शिफारस वारकर्त्याने स्वजबाबदारीवर वापरावे!)

संकलित!

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!