हरभरा ( मध्यम ते भारी जमीन ) अपेक्षित उत्पादन मिळविण्याचे तंत्र

हरभरा ( मध्यम ते भारी जमीन )
अपेक्षित उत्पादन मिळविण्याचे तंत्र♥प्रगतशील शेतकरी♥

♥शेतकरी मित्रांनो,
वर्षानुवर्ष आपण शेती करतो पण कधी शेतीचे ठोस समिकरणे जाणली नाहित..
प्रात्यक्षिकावर आधारित समिकरण जे वाढवु शकते आपले उत्पादन!

♥आवश्यक सामग्री
1. माती परिक्षण रिपोर्ट>>>जमिनीतील उपलब्ध नत्र,स्फुरद,पालाश (किलो/हेक्टर)
     जाणुन घेऊन खालील गणित करण्याकरिता
2. आपण ठरवा किती अपेक्षित उत्पादन (क्विंटल/हेक्टर ) आपणास हवे!
     उदाहरणार्थ 10/15/20/25/30/35 क्विंटल/हेक्टर
     (पिकाच्या कमाल उत्पन्नक्षमतानुसार!)
3. गणित करण्याकरिता लागणारी आवश्यक सामग्री उदाहरण.पेन,कागद,कॅल्कुलेटर ई.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
वरिल आवश्यक सामग्री आली असेल तर
खालील गणित करावे व
खतामधुन द्यावयाचे (किलो/हेक्टर) नत्र, स्फुरद व पालाशची आकडेवारी काढा
व त्याप्रमाणे खताचे नियोजन करावे..
(प्रगतशील शेतकरी ग्रुप, भूषण खैरनार 09422895411)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
♥ हरभरा पिकासाठी ( मध्यम ते भारी जमीन )
खतामधुन द्यावयाचे नत्राचे समिकरण असे कराल...

(5.25 X अपेक्षित उत्पादन क्विंटल/हेक्टर )

- (वजा)

(0.46 X जमिनीतील उपलब्ध नत्र किलो/हेक्टर)

= (बरोबर)

खतामधुन द्यावयाचे नत्र(किलो/हेक्टर) 

~~~~~~~~~~~
♥ हरभरा पिकासाठी ( मध्यम ते भारी जमीन )
खतामधुन द्यावयाचे स्फुरद आॅक्साईड समिकरण असे कराल...

(3.87 X अपेक्षित उत्पादन क्विंटल/हेक्टर )

- (वजा)

(2.77 X जमिनीतील उपलब्ध स्फुरद  किलो/हेक्टर)

= (बरोबर)

खतामधुन द्यावयाचे स्फुरद आॅक्साईड (किलो/हेक्टर) 

~~~~~~~~~~~
♥ हरभरा पिकासाठी ( मध्यम ते भारी जमीन )
खतामधुन द्यावयाचे पालाश आॅक्साईड समिकरण असे कराल...

(1.29 X अपेक्षित उत्पादन क्विंटल/हेक्टर )

- (वजा)

(0.04 X जमिनीतील उपलब्ध पालाश  किलो/हेक्टर)

= (बरोबर)

खतामधुन द्यावयाचे पालाश आॅक्साईड (किलो/हेक्टर) 

~~~~~~~~~~~~
(^वरिल समिकरण प्रात्यक्षिकावर आधारित आहे, पिकाच्या वाढीसाठी लागणारे ईतर घटकांचा उत्पादनवर परिणाम निश्चितच होतो. वरिल शिफारस स्व-जबाबदारिवर वापरावी!)

संकलित!

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!