नृसिंह सरस्वती जन्मोत्सव Nrusih Saraswati Birth Ceremony

नृसिंह सरस्वती जन्मोत्सव 
नरसिंहसरस्वती (इ. स. १३७८-१४५८) - वऱ्हाडातील लाड कारंजे हे त्यांचे जन्मगाव. त्यांना दत्तात्रयाचे दुसरे अवतार आणि श्रीवल्लभांचे उत्तरावतार मानतात. गुरुचरित्रात त्यांचे चरित्र वर्णन केलेले आहे. त्यांचे मूळ नाव शालग्राम देव माधव काळे. परंतु त्यांना नरहरी नावानेच ओळखले जाई. वयाच्या सात वर्षांपर्यंत ते बोलत नसत. मांजीबंधनाच्या वेळी ते आई अंबाभवानीकडे वेदवाणीचा उच्चार करून भिक्षा मागितली. त्यानंतर ते बोलू लागले. वयाच्या आठव्या वषीर् माता-पित्यांचा आशीर्वाद घेऊन ते बदिरीकेदारला गेले. वाटेत काशी मुक्कामी त्यांची गाठ कृष्णसरस्वती या वृद्ध संन्याशाशी पडली. कृष्णसरस्वतींनी नरहरीला मठपरंपरेप्रमाणे संन्यासदीक्षा दिली. उत्तरेत शिक्षण पूर्ण केल्यावर ते दक्षिणेस प्रथम कारंजे येथे आले. माता-पित्यांना भेटले. त्यानंतर ते त्र्यंबकेश्वर, नाशिक, परळी वैजनाथ, औदुंबर, अमरापूर या गावी राहिले. अमरापूर हे गांव कृष्णा-पंचगंगा संगमावर आहे. तेथे नरसिंह सरस्वती बारा वषेर् राहिले. त्यांच्या या गावच्या प्रदीर्घ निवासामुळेच या गावाला नरसोबाची वाडी हे नाव प्राप्त झाले. त्यानंतर गाणगापुरी ते चौवीस वषेर् राहिले. त्या वेळी बेदरचा बादशहा अल्लाउद्दीन (दुसरा) याने त्यांची पूजा केली. आपल्या शिष्यांसह ते श्रीशैलाकडे निघाले. त्या ठिकाणी पाताळगंगेत त्यांनी आपला देह विसजिर्त केला.
महाराष्ट्रातील दत्तसंप्रदायाचा प्रारंभ श्रीनरसिंहसरस्वतींच्या अवतार चरित्रातून झाला असे मानले जाते. नरसिंहसरस्वतींनी शिव, विष्णू, देवी, गणेश आणि नृसिंह यांच्या उपासनेचा उपदेश केला. त्यांच्यामुळेच महाराष्ट्रात दत्तोपासना लोकप्रिय झाली. त्यांच्या निवासामुळे औदुंबर, नरसोबाची वाडी, गाणगापूर ही गावे दत्तसांप्रदायिकांची तीर्थक्षेत्रे बनली.

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!