जय किसान.. Jai Kisan
जय किसान.. 👳👳👳👳👳 "कापसाला 10000 रुपये,💭💭💭💭💭 कांदयाला 5000, ऊसाला 4000 रुपये दर मिळालाच पाहिजे" होय, आमच्या मुलांनाही मल्टीप्लेक्समध्ये जाऊन चित्रपट पाहावेसे वाटतात ....! पाण्यासारखे पेट्रोल/डीझेल उधळणाऱ्या एसयूव्ही कार बाईक उडवाव्या वाटतात..! त्यांनाही डॉक्टर, इंजिनिअर व्हावेसे वाटते. उच्चभ्रू राहणीमानाचे माजोरी दर्शन घडवणाऱ्या प्रत्येक शहरी गोष्टीचे त्यांनाही आकर्षण आहे. अशी स्वप्ने पाहणे गुन्हा आहे काय ? टाटा, अंबानी यांच्या उद्योगांनी देशाची अर्थव्यवस्था खरेदी करता येईल इतकी संपत्ती कमवावी आणि आमची दहा पंधरा एकराची शेतजमीनही हिसकावून घ्यावी आणि एमआयडीसी च्या यमाने तृप्तीचा ढेकर द्यावा. आमची अंत:करणे जळत नाहीत का ? बाईक , कार, बस, रिक्षा तर सोडाच साधे पायी चालत शाळेला जावे असे रस्तेही आमच्या लेकरा बाळांना मिळत नाहीत. आमच्या अडलेल्या लेकीसुनांची खड्ड्यातच सुटका होते याचा अपमान आम्हाला वाटत नाही नसेल का? जरा सर्दी खोकला झाला की सुपर स्पेशालिटीत दाखल होणाराना महागडी औषधे कधी कडू लागत नाहीत....! मात्र ऊस कडू लागतो. पेट्रोल/डीझेल कितीही महागल