प्रेसमडतील (उसाची घट्ट मळी) पिकासाठी अन्नद्रव्ये घटक
प्रेसमड (उसाची घट्ट मळी) मध्ये
पिकासाठी आवश्यक अन्नद्रव्ये किती प्रमाणात असतात?♥प्रगतशील शेतकरी♥
♥जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर आवश्यक असला तरी शेणखत, कंपोस्ट खते दुर्मिळ होऊ लागली आहेत.
♥यावर पर्यायी उपाय म्हणून ऊस साखर कारखान्यांतून उपलब्ध होणाऱ्या उपपदार्थांपैकी घट्ट मळी म्हणजेच प्रेसमड केकचा वापर शेतीत फायद्याचा ठरू शकतो.
♥कारखान्यात साखर तयार होताना
स्पेंटवॉश (पातळी मळी),
बगॅस व प्रेसमड (घट्ट मळी) इ. उपपदार्थ तयार होतात.
♥एक टन (1000 किलो)उसापासून साधारण
110 ते 120 किलो साखर,
40 किलो स्पेंटवॉश (मळी),
30 ते 40 किलो प्रेसमड केक व
300 किलो बगॅसचे उत्पादन होते.
♥या उपपदार्थांपैकी प्रेसमड केकचा उपयोग सेंद्रिय खत व भूसुधारक म्हणून चांगला होऊ शकतो.
♥साखर कारखान्यात रस शुद्ध करण्यासाठी गाळल्यानंतर अशुद्ध पदार्थांचा जो चोथा राहतो, त्यास प्रेसमड किंवा फिल्टर केक म्हणतात.
♥कारखान्यात गाळ केलेल्या उसाच्या तीन टक्के प्रेसमड मिळते. म्हणजेच 100 टन उसाचे गाळप केले तर त्यापासून तीन टन प्रेसमड मिळते.
♥प्रेसमडचे रासायनिक पृथक्करण केले असता त्यामध्ये साधारणपणे
1.5 ते 1.7 टक्के नत्र,
2.4 ते 2.6 टक्के स्फुरद,
1.0 ते 1.4 टक्के पालाश आणि
2 ते 2.3 टक्के गंधक ही पोषण अन्नद्रव्ये आढळतात.
♥प्रेसमडमध्ये गंधकाचे प्रमाण 2 ते 2.3 टक्के असल्याने चोपण जमीन सुधारण्यास प्रेसमडचा उपयोग होतो.
संकलित!
Comments
Post a Comment