उत्पादनवाढीसाठी तंत्र
उत्पादनवाढीसाठी
आधुनिक शेती करत असताना पूर्वीचे काही अनुभव बरोबर घेऊन चालल्यास आजदेखील त्याचा उपयोग नक्कीच होईल, यात काही शंका नाही.
आज मानव ज्याप्रमाणे बदलत चालला आहे, त्यापेक्षा कितीतरी पटीत निसर्ग बदलला आहे. या बदलांवर मात करण्यासाठी आज प्रत्येक शेतकरीबांधव नाना प्रकारे प्रयत्न करून नफ्याच्या शेतीचे स्वप्न बघतो आहे, पण बऱ्याच वेळा असे होत नाही.
याचे कारण पूर्णतः आधुनिकीकरणावर दिलेला भर हे होय. असे करून चालणार नाही.
यात बदल करून शेतीसाठी लागणाऱ्या जैविक घटकांच्या कार्यशैलीची जाणीव करून घेऊन त्यांचा पीक उत्पादनात उपयोग केला जावा.
यापासून पिकास करावा लागणारा खर्च कमी होऊन नफ्यात वाढ होईल.
तेल्यामुक्त डाळिंब उत्पादन घेण्यासाठी खालील संसाधने व जैविक घटक आपल्याकडे असायला हवीत :
>देशी गाय असावी.
>गांडूळ खत युनिट तयार करावे.
>व्हर्मिवॉश युनिट तयार करावे.
>गोमूत्र साठवणूक टाकी असावी.
>जीवामृत तयार करण्यासाठी टाकी असावी.
>वेगवेगळे आर्क तयार करण्यासाठी १०० ते २०० लिटर पाणी बसेल या मापाची ५ प्लास्टिक टिपे असावीत.
>मधमाश्यांच्या पेट्या लावाव्यात.
>स्वच्छ पाणीपुरवठा करावा.
>जैविक बुरशींचा अभ्यास.
>प्रकाश सापळ्यांचा वापर करावा.
>कामगंध सापळे वापरावेत.
>वेगवेगळ्या रंगाचे चिकट सापळे वापरावेत.
>कीडनियंत्रणासाठी कीट्कभुंगे (बिटल्स) वापर करावा.
>शेतात वापरली जाणारी खते व औषधे साठवण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी सुरक्षित थंड जागेची उपलब्धता.
>औषधांच्या नियमावलीसंबंधी माहिती असावी.
>माती परीक्षणानुसार सुपीकतेचा अभ्यास करूनच सुधारित वाणांची निवड करावी.
>सेंद्रिय आच्छादनाचा वापर करावा.
>ज्या क्षेत्राची निर्यातीसाठी निवड केलेली आहे, त्यावर निर्यातक्षम शेती दर्शविणारा फलक (नकाशा) लावावा.
>पिकास ठरवून दिलेल्या मात्रेतच खतांचा वापर करावा.
>दुसऱ्याच्या शेतामधील पाणी आपल्या शेतात आल्यास पाण्याद्वारे आपल्या शेतात केमिकलचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते.
>वापरण्यात येणारे पाणी देखील शुद्ध आहे कि नाही? याची चाचणी करूनच पाण्याचा वापर करावा.
>शेणखताचा वापर करावयाचा झाल्यास त्यात कुठल्याही केमिकलचे अंश आहेत कि नाही? याची खात्री करावी.
>गोठ्यामध्ये जनावरे व गोठा स्वच्छ करण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या केमिकलचा वापर करू नये.
>वापरण्यात येणारी सैंद्रिय, जैविक उत्पादने व इतर क्षेत्रासाठी वापरावयाची औषधे वेगळी ठेवावीत.
>गटारीच्या पाण्याचा वापर कोणत्याही परिस्थितीत करू नये.
>छोट्या छोट्या जलसाठ्यास जाऊन मिळणाऱ्या नाल्यांना औद्योगिक वसाहतीचे केमिकलयुक्त पाणी सोडले जाते व ते पाणी कॅनॉलच्या माध्यमातून शेतीसाठी पुरवले जाते, याचा फटका निर्यातक्षम क्षेत्रावर होतानाचे निर्दशनास आलेले आहे.
>फवारणी करताना पंप स्वच्छ आहे कि नाही, याची खात्री करून घ्यावी.
>सैंद्रिय खते वापरताना १००% सैंद्रिय आहेत कि नाही, याची खात्री करूनच वापरावीत. शक्यतो गांडूळ खताचा वापर करावा.
>शेताच्या कडेला मित्रकिडी आकर्षित होतील अशी छोटी मोठी झाडे लावावीत.
>बागेत सापळा पिकलागवड करावी.
>मुळकुज या रोगनियंत्रणाकरिता ठिबक सिंचनाद्वारे जैविक बुरशीनाशके सोडावीत.
>वापरण्यात येणारा काडीकचरा कुजवून कंपोस्ट करून वापरावा.
>कीडनियंत्रणासाठी शक्यतो जीवमृत, निंबोळी अर्क, दशपर्णी अर्काच्या वापरावर भर द्यावा.
>तयार मालावर विक्रीव्यवस्थापन योग्य पद्धतीने करावे.
उत्पादनवाढीसाठी खालील तंत्राचा वापर करा :
>रस रस शोषणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव होताच कीडनियोजन करा.
>पिकास शुद्ध पाणीपुरवठा होण्यास प्रथम प्राधान्य द्या.
>अतिपाण्याचा वापर टाळा.
>शेतातील पिकाचे अवशेष शेतातच गाडा.
>शून्य मशागत तंत्राचा वापर करा.
>शेतात गांडूळ खत, शेणखत, कंपोष्ट खतांचा वापर करा व शेतात मोठ्या संख्येने गांडुळांचे संगोपन करा.
>शेणखतांचा वापर करताना हुमनीची लागण झालेल्या खतांचा वापर टाळा.
>व्हर्मिवॉश, जीवामृत व जिवाणू खताच्या वापरावर भर द्या.
>सैंद्रिय मल्वीन्ग वापर सातत्याने करा.
>पशुसंवर्धनाच्यादृष्टीने योग्य वाटचाल करा.
>फुलपाखरे व मधमाशी यांच्या मदतीने परागीभवनाचे काम योग्य दिशेने कसे चालेल याकडे लक्ष द्या.
>पिकांचे सुयोग्य नियोजन करा.
>छोट्या छोट्या किटकांचे नियंत्रण मिळवण्याकरिता वेगवेगळ्या रंगाच्या सापळ्यांचा उपयोग करा.
>तणनियंत्रण करतेवेळी तणनाशकाचे अंश पिकावर पडणार नाही, याची काळजी घ्यावी.
>बागेच्या ओळीतील उभ्या किंवा आडव्या अँगलला पिवळ्या रंगाच्या साहाय्याने क्रमवार नंबर द्यावेत.
संकलित!
Comments
Post a Comment