सापळा मित्र वनस्पति

शेतीत ‍‌‌‌‌‍‍‌‍‌‍‌‌‌सापळा मित्र वनस्पती‍‌‌‌‌‍‍‌‍‌‍‌ आवश्यक♥प्रगतशील शेतकरी ग्रुप♥
(शेतात पिक कोणतेही असो, खालीलपैकी वनस्पति त्या पिकास होणार्या संभावित नुकसान कमी करतात..अश्या सापळा मित्र वनस्पति आपल्या शेतीत जरूर समाविष्टीत करा)

‍‌‌‌‌‍‍‌‍‌‍‌♥ झेंडू : - मावा, रसशोषक किडी हाकलतो, निमॅटोड्स ( सुत्रकृमी ) नष्ट करतो . काकडीवर्गीय, टोमॅटो, कांदा, डाळींब व द्राक्षसारख्या फळपिकात खोडाजवळ लावावेत. मुळातुन अल्फाटेर्थिनिल स्त्राव सुटतो.नुकसानकारक किडिंना हाकलून लावतो.

‍‌‌‌‌‍‍‌‍‌‍‌♥ सोप : - फुलावर पेरोपजिवी किडी आकर्षित होतात, पानांना छिद्र पाडणाऱ्या अळीचा नायनाट परोपजिवींद्वारे होतो, सभोवती व मध्ये लावावीत.

‍‌‌‌‌‍‍‌‍‌‍‌‌‌♥ मोहरी : - अनेक पिकांवरील किर्डiना आकर्षित करणारे महत्वाचे सापळापिक. गहू, हरभऱ्यात जरूर लावावा, अनेक परोपजिवी किडींनाही आकर्षित करते.आच्छादनात मिरचीत घ्यावी.

‍‌‌‌‌‍‍‌‍‌‍‌♥ गाजर : - गाजराची फुले मोठया प्रमाणात मधमाश्या, परोपजिवी व् भक्षक किडींना आकर्षित करतात.

‍‌‌‌‌‍‍‌‍‌‍‌‌‌♥ मका : - मक्यावर परोपजिवी व भक्षक किडी निवास करतात.

‍‌‌‌‌‍‍‌‍‌‍‌‌‌♥ तुर : - बहुवर्षीय तुरीवर परोपजिवी व भक्षक किडी टिकून राहतात.

‍‌‌‌‌‍‍‌‍‌‍‌‌‌♥ लेट्युस : - रोगनाशक आहे, हे फ्युजेरियम रोगापासून पिकांचा बचाव करते, पिकांना मरीपासुन वाचवते. पाने कुजतांना जमिनीत त्यातील औषधी द्रव्ये मिसळून फ्युजेरियमचा नाश होतो.

‍‌‌‌‌‍‍‌‍‌‍‌♥ बाजरा : - फुलावर ट्रायकोग्रामा पोसुन अळ्यांचा विनाश होतो, पक्षी बसतात व अळ्यांसारखी किडी खातात‌.

संकलित!

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!