मोगरा लागवड नियोजन असे कराल

मोगरा लागवड नियोजन असे करा♥प्रगतशील शेतकरी♥

♥मोगर्‍याच्या झाडाचे आयुष्य १०-१२ वर्ष असते.
झाड एकदा लावले नियमित उत्पन्न मिळते. मोगऱ्याच्या फुलांचा उपयोग भारतात हार, तुरे, गुच्छ, गजरे, वेण्या व देवपूजेत सर्वत्र विस्तृत प्रमाणावर होतो.

हवामान – कोरडे, मध्यम तापमान अशा हवेत फुलांचा चांगला दर्जा मिळतो. कोरडे हवामान , कमी प्रमाणात थंडी व भरपूर सूर्यप्रकाश याला चांगले मानवतात व फुलांचा उत्तम बहार येतो.
♥जमीन –

मोगरा लागवडीसाठी हलकी ते मध्यम, पाण्याचा निचरा होणारी, 60 सें.मी. खोलीची आणि 6.5 ते सात सामू असलेली जमीन निवडावी.

पाण्याचा निचरा होणारी असावी. अशा कोणत्याही जमिनीत पिक घेता येते. जमीन खोल खणून किंवा नांगरून मऊ व भुसभुशीत करतात

♥लागवडीचा हंगाम -

जून महिन्यात लागवड करावी.

पावसाळा – जुलै- ऑगस्ट , हिवाळा- सप्टेंबर- ऑक्टोबर ,उन्हाळयात लागवड करु नये
पूर्व मशागत : जमीन सपाट करुन घ्यावी आडवी+ उभी नागरट करून घ्यावी. गवत गोळा करून घ्यावे.

♥हे बहुवार्षिक पीक आहे, त्यामुळे जमिनीची चांगली नांगरट करावी.
लागवडीसाठी हलक्‍या ते मध्यम जमिनीत 1.20 मीटर x 1.20 मीटर अंतरावर 60 सें.मी x 60 सें.मी. x 60 सें.मी. आकाराचे खड्डे खणावेत.
यापेक्षा कमी अंतर ठेवल्यास रोग- किडींचा प्रादुर्भाव होऊ शकतो.

♥गुंडुमलई या जातीसाठी लागवडीचे अंतर जास्त ठेवावे.
५ फुट अंतरावर सरी पाडावी सरी ४५ से.मी. ( दीड फुट) खोल करावी.

लागवडीसाठी खड्डे खणल्यानंतर ते शेणखत, पोयटा माती, अर्धा किलो सिंगल सुपर फॉस्फेट यांच्या मिश्रणाने भरावेत.
५ फुटावर एक पाटी शेणखत भरखत म्हणून वापरावे.

♥लागवड- (५ गुंठे क्षेत्रासाठी )

५ बाय ५ फुट लागवडी साठी २०० रोपे लागतील.
कलम पिशवी व्यवस्थीत ब्लेडने कापून घ्यावी.
मात्र रोपाची माती फुटणार नाही याची काळजी घ्यावी.
रोप लागवडी नंतर रोप भोवतीची माती हाताने व्यवस्थीत दाबून घ्यावी.

♥पाणी-
                                    
जमिनीच्या प्रकारानुसार पाणी द्यावे.
सरासरी पावसाळा मध्ये पाणी देण्याची गरज भासत नाही , हिवाळ्यात दहा ते पंधरा दिवसातून एकदा , ऊन्हाळ्यात आठ दिवसातून एकदा पाणी द्यावे बहार चालु असताना पाण्याचा ताण पडू देऊ नये.

♥खते-

रासायनिक खतांना हे पिक चागले प्रतिसाद देते.

भरखत  

खताची मात्रा पहिली  ६ महिने नंतर ५ गुंठे साठी

खताची मात्रा दुसरी : १२ महिने नंतर ५ गुंठे साठी

लागवडीचे वेळी प्रत्येक झाडाला   २ ते २.५ किलो चांगले कुजलले शेणखत खड्डा भरताना दयावे     

साधारणपणे १२  किलो दाणेदार ( १९: १९: १९%  नत्र : पालाश : स्फुरद  )  प्रति झाड ६० ग्राम खत झाडा भोवती गोलाकार द्यावे. खत मातीआड होणे गरजेचे आहे.

साधारणपणे २५  किलो   दाणेदार ( १०: २६: २६%  नत्र : पालाश : स्फुरद  )   प्रति झाड १२० ग्राम
+
५. ००  किलो मॅग्नेशियम सल्फेट प्रति झाड २५ ग्राम द्यावे.
त्यामुळे बहार नियमित रहाण्यास मदत होते.
फुटवा चांगला येतो

♥लागवडी नंतरची निगा :

♡आंतर मशागत

सुरवातीच्या काळात लागवडी खालील क्षेत्रामधे तण येऊ देऊ नयेत लगेच काढून टाकावे. झाड मोठे झाल्यावर सावलीमुळे तण कमी येतात.
जमीन कुदळी ने भुसभुसीत करावी त्यामुळे जमिनीची मशागत होते.

♡भर देणे

सहा महिन्यानंतर झाडाला मातीची भर द्यावी.
भर देण्याआधी प्रत्येक झाडास अर्धा किलो शेणखत / गाडूळखत खतांचा पहिला डोस घालावे व नंतर मातीची भर द्यावी.
ह्या वेळीस सरी मधील झाडे वरंब्यावर येतील व झाडाच्या एका बाजूने पाणी देता येईल

♥छाटणी
                                    
५ ते ६ महिन्यानंतर गरजे नुसार झाडाची छाटणी करावी.
त्यामध्ये मुख्यत: एखादी फुले नसलेली, कोवळी फांदी लांब वाढत असेल अशा फांदी ची छाटणी झाडाच्या उंचीनुसार करावी.
छत्री सारखा गोल आकार येईल या प्रमाणे छाटणी करावी.
त्यामुळे फुटवा जास्त येऊन उत्पन्नास सुरवात होते.

♥एक वर्ष नंतर दर तीन महिनांनी बहार कायम राहण्यासाठी हलकी छाटणी करावी .
दोन वर्षानंतर नोव्हेंबर - डिसेंबर महिन्यात खरड छाटणी करावी

♥फुलाची काढणी

उत्पादन सुरु होण्याचा काळ –६- ७ महिने, फुले दररोज सकाळी लवकर कळी अवस्थेत काढावीत.

सूर्योदय नंतर कळी फुलते उशिरा काढलेली फुले फुलतात व त्यातील सुगंध कमी होतो.

♥उत्पादन: तपशील माहिती

♡क्षेत्र 

५ गुंठे

♡मोगरा झाडांची संख्या

२०० झाडे

♡सरासरी उत्पन्न प्रति दिवस

०.७५० ते १.00 किलो

♡एकूण उत्पादन ( वर्षाचे )

२०० ते २७० किलो

♡सरासरी दर प्रति किलो

१६० रु

♡एकत्रित उत्पन्न / वर्ष
३२,००० ते ४३,००० रु

    
♥रोग व कीड नियंत्रण :

♥कीड नियंत्रण

♡फुलकिडे, तुडतुडे, मावा, कोळी,
रोगर (डायमिथोयट)१५ मिली. + १० लीटर  पाणी किंवा इमिडॅक्लोप्रिड  3 मिली  प्रति 10 लि पाणी किंवा
अॅक्टरा (थायोमिथेलझाम) 5 ग्रॅम प्रति 10लि पाणी 

♡पांढरी माशी

प्राइड ५ ग्राम+ १० लीटर पाणी

♡पाने खाणारी अळी

मॅलेथीआॅन / १५ मिली. + १० लीटर पाणी किंवा
एकालक्स (क्विनालफाॅस) 10 मिली + १० लीटर पाणी

♥रोग नियंत्रण

♡भुरी , करपा

बावीस्टिन
( कार्बेनडाझिम १०ग्रॅम + १० लीटर पाणी
किंवा
एम ४५ मॅकोन्झेब १५ ग्रम + १० लीटर पाणी )

♥अधिक माहितीसाठी राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, गणेशखिंड, जि. पुणे (020 - 25693750) येथे संपर्क साधावा.

संकलित!

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!