ड्रॅगन फ्रूट लागवड नियोजन तंत्र
ड्रॅगन फ्रूट लागवड नियोजन तंत्र♥प्रगतशील शेतकरी♥ (टीप- संबंधित लेख हा भारतातील कृषी विद्यापीठे वा संशोधन संस्थांच्या शिफारसींवर आधारलेला नाही. तर आशियाई देशांत उदा. श्रीलंका, मलेशिया आदी देशांत ड्रॅगनफ्रूटची ज्या पद्धतीने लागवड होते त्यातील माहितीवर आधारलेला दिशादर्शक लेख आहे.) ♥ड्रॅगन फ्रूट पिकाची ठळक वैशिष्ट्ये - किमान पाणी देणे आवश्यक - किमान देखभालही गरजेची - भारतीय हवामान पोषक - 2 ते 3 वर्षांत आर्थिक गुंतवणूकीचा परतावा होऊ शकतो. - "कंटिंग्ज' पासून लागवड केली जाते. - स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी ♥ड्रॅगन फ्रूट मूळ मेक्सिको देशातील ड्रॅगनफ्रूट या फळपिकाची लागवड पूर्व आशिया खंड, दक्षिण आशिया, दक्षिणपूर्व आशियाई देश आदी ठिकाणी केली जाते. कंबोडिया, थायलंड, तैवान, मलेशिया, व्हिएतनाम, श्रीलंका, फिलिपिन्स, इंडोनेशिया आदी देशांत या फळपिकाची लागवड होते. हवाई बेटे, इस्राईल, उत्तर ऑस्ट्रेलिया, दक्षिण चीन, सायप्रस आदी ठिकाणीही त्याची लागवड आढळून येते. ♥आशियाई देशांतील ड्रॅगन फ्रूट लागवड तंत्र ड्रॅगन फ्रूट हे भारतीय शेतकऱ्यांसाठी आश्वासक फळपीक होऊ शकत