Shri Swami Samarth ... श्री स्वामी समर्थ

Shri Swami Samarth ... श्री स्वामी समर्थ 




श्री स्वामी समर्थ || स्वामी समर्थ, अर्थात अक्कलकोट स्वामी हे इ.स.च्या १९व्या शतकात होऊन गेलेले, महाराष्ट्रातील अक्कलकोट येथील एक गुरू होते. ते दत्तसंप्रदायातील एक प्रमुख संत आणि श्रीपादवल्लभ व नृसिंहसरस्वती यांच्या नंतरचे दत्तात्रेयाचे चौथे अवतार मानले जातात.[१]विद्यमान आंध्रप्रदेशातल्या श्री शैल्यम क्षेत्राजवळील कर्दळीवनातून ते प्रकट झाले, अशी मान्यता प्रचलित आहे. त्यांनी तेथून आसेतुहिमाचल भ्रमण केले. इ.स. १८५६-इ.स. १८५७ च्या सुमारास स्वामी समर्थ अक्कलकोटास आले. ते मंगळवेढ्याहून पहिल्यांदा जेव्हा अक्कलकोट नगरीत प्रवेशले, तेव्हा त्यांनी गावातील खंडोबा मंदिरात मुक्काम केला. इ.स. 1857 सालाच्या सुमारास महाराष्ट्रात जेव्हा मोठा दुष्काळ पडला होता, तेव्हा क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी आले होते, त्या वेळी त्यांनी फडक्यांना "सध्या लढायची वेळ नाही" असा सल्ला दिल्याचे सांगितले जाते.इ.स.१४५७च्या सुमारास श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज ह्यांनी गाणगापुरास निर्गुण पादुका स्थापन केल्या. व त्यानंतर शैल यात्रेचे साधून ते कर्दळी वनात अदृश्य झाले. ह्या कर्दळी वनात सुमारे ३०० वर्ष महाराजांनी कठोर तपश्चर्या केली असे म्हणतात. ह्या काळात मुंग्यांनी त्यांच्यावर वारूळ तयार केले. ३०० वर्षांनंतर एके दिवशी उद्धव नावाचा लाकूडतोडया त्याच कर्दळी वनात लाकडे तोडीत असताना त्याच्या हातून कुऱ्हाड निसटली व ती वारुळावर पडली. कुऱ्हाड वारुळावर पडताच त्यातून रक्ताची धार उडाली व क्षणातच दिव्य प्रकाश पडून उद्धवासमोर एक आजानुबाहू तेजस्वी मूर्ती प्रगट झाली. तेच अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज असे त्यांचे भक्त मानतात.आपल्या हातून ह्या महापुरुषाला जखम झाली ह्या विचाराने उद्धवाला दुःख झाले व भय वाटू लागले. पण भक्तांसाठी माताच असलेल्या महाराजांनी उद्धवाला अभय व आशीर्वाद देऊन गंगातीरावर प्रयाण केले. गंगातीरावर भ्रमण करता करता ते कोलकत्यास गेले व तेथे त्यांनी महाकाली मातेचे दर्शन घेतले. नंतर काशी प्रयाग असे भ्रमण करीत ते उत्तरेकडून दक्षिणेस आले. श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे त्यांनी शेगावचे श्री गजानन महाराज व शिर्डीचे श्री साई महाराज ह्यांना दीक्षा दिली. त्यानंतर स्वामी पंढरपूर , मोहळ असे भ्रमण करीत सोलापुरास आले. त्यानंतर मंगळवेढे नामक गावास स्वामींनी काही काळ वास्तव्य केले व तिथल्या भक्तांना विविध स्तरावर मार्गदर्शन केले. भेटेल त्याला आपल्या लीलेने आगळया वेगळया पद्धतींनी दुःखमुक्त करून कार्यरत केले.इसवी सन १८५६मध्ये स्वामी महाराजांनी अक्कलकोट गावात प्रवेश केला व तेथे पुढची बावीस वर्षे वास्तव्य केले. त्यांच्या अक्कलकोट येथे राहण्यामुळे अक्कलकोट हे गाव सर्व विश्वाला देदीप्यमान असे तीर्थक्षेत्र समजले जाऊ लागले. येथे राहून स्वामी समर्थांनी जगातील अनेक मान्यवरांना मार्गदर्शन केले. आणि इसवी सन १८७८मध्ये1 आपला अवतार संपवला. परंतु प्रत्यक्षात स्वामी महाराज आज देखील भक्तांच्या पाठीशी सतत राहून त्यांना मार्गदर्शन करून कार्यरत करीत आहेत व अनंतकाळ पर्यंत करीत राहतील, अशी त्यांच्यावर श्रद्धा असणाऱ्यांची समजूत आहे.श्री स्वामी समर्थ हे श्री दत्त महाराजांचा पूर्ण ब्रह्मस्वरूप तिसरा अवतार समजले जातात. भक्तांनी त्यांना ज्या दृष्टीने पाहिले त्या स्वरूपात त्यांनी दर्शन दिले आहे. कोणाला श्री विठूमाऊलीच्या रूपात त्यांचे दर्शन घडले तर कुणाला श्री भगवान विष्णूच्या स्वरूपात तर कुणाला भगवती देवीच्या रूपात. महाराजांनी भक्तांच्या कल्याणासाठी अनेक लीला दाखविल्या.अनन्यभावाने भक्ती करणाऱ्या भक्तांच्या सदैव पाठीशी राहून त्यांचा योगक्षेम चालविण्यासोबतच ’भिऊ नकोस..मी तुझ्या पाठीशी आहे’ असे अभिवचन स्वामी समर्थ महाराजांनी त्यांना दिले.





Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!