नैसर्गिक पणे राहा...माणूसकीने वागा...

आता खरच निसर्गालाच माणूस नकोसा झाला अस वाटतय.
कारण,आपल्याला घरात बसवून निसर्ग स्वतःला दुरूस्त करून घेत आहे.
सगळीकडे नद्या स्वच्छ होत आहेत.
हवा शुद्ध वहात आहे.
पक्षांचा कलकलकलाट,गाई वासरांचे हंबरणे ऐकु येत आहे.
कुठे मंदिरातील घंटा आता वाजत नाही.
मस्जीद मधील अजाण नाही.
चर्च मधिल सामुहिक प्रार्थना नाही.
कुठलेही धार्मिक कार्यक्रम नाही.
कुणाला आता मंगळ  नाही.
कुणाला आता शनिचीसाडेसाती नाही.
स्मशानात कुठलेही विधी नाही.
पिंडदान नाही.
कावळ्याला आपल्या त्या पिंडाची अपेक्षा नाही.
आता कालसर्पाची पुजा बंद आहे.
नवग्रहाची शांती बंद आहे..
आता कोणी शुभ मुहूर्त पहात नाही..

तरी सगळ कस शांततेत सुरू आहे.
पृथ्वी आनऺदात आहे ,निसर्ग बहरतो आहे ,म्हणुन तर....
निसर्ग हसतो आहे आता आपल्यावर व आपल्या भोंदूगिरीवर... कारण त्याला तुमच्या वरील कोणत्याही गोष्टीची अजिबात आवश्यकता नाही,कारण वरील कोणतीही गोष्ट त्याने बनवली नाही...
तो आता एकच म्हणतो...मला जवळ करा.... नैसर्गिक पणे राहा...
माणूसकीने वागा...
बघा जमतय का...

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!