सोंग
#सोंग_
*तो* घरातला कर्ता पुरुष शांत विचारात मग्न बसलेला .
मुळ म्हणजे मध्यम वर्गीय घरातला
बायको : अहो... घरातलं तेल संपलय जरा घेऊन या!
तो : हो आणतो.
(कस सांगू हिला मोजकच कर ,😕 घरात खाणारी तोंड , वाढत्या वयात आलेली पोरं त्यांना खाऊ नका म्हणून सांगू तरी कस? वय झालेले आई वडील त्यांना ही लागताच की निदान औषध घेण्यापूर्वी तरी..
धंदा बंद पडलाय. हवं तेवढं सगळ्या रोजच्या कमाई चा साठा संपलाय , खिशातले शेवटचे ५०० रुपये.. उद्या पर्यंत संपणार.. मग? घेऊ का सोंग पैश्याचं? की भिकेचं?)
नको !
नगर शेवकाच्या कार्यकर्त्यांनी पाहिलं तर शिवभोजनाची थाळ घेतांना तर उगाच चर्चेचा विषय ...
लोक : अरे काय कमी आहे त्याला, एेवढ मोठं घरदार , तरी हा ईकडे येऊन गरिबांची थाळी खातो
तो: कस सांगू यांना पोट भरायला घरादाराची वीट नाही, तर अन्न लागतं म्हणून .
पण पैशाचा आव तरी कसा आणू ..?
हो घरात मात्र पोरांचा वेळ जावा म्हणून सारिपाटाचा डाव मांडतो डाव जिंकला की पुन्हा घरात येऊन थांबतो .
मग मुलगा म्हणतो
मुलगा : बाबा अहो तुमच्या सगळ्याच सोंगट्या घरात गेल्या , तुम्ही जिंकलात . आता तुम्ही घर बांधणार.
माझ्या मात्र तोंडावर स्मित हसू आणि डोक्यात विचारांचा असुर असतो.
कस सांगू याला आता जरी बँकेचे हप्ते भरायचे नसले तरी lockdown open जाहिर झाल्या नंतर बांधलेल्या घराचे हप्ते मात्र भरावे लागणार .🙂
बायको रोज म्हणते .
अहो आज काय नवीन बनवू?
मी मात्र म्हणतो तिच्या समाधानासाठी, तुला हव ते कर.
कारण मलाही ठाऊक असतं ती आजही डाळीची आमटीच करणार म्हणून , कारण ती तरी काय करणार? घरातला किराणा संपलाय म्हणून. हा..पण ती मात्र मला समजून घेणार.☺️
आता मात्र हळू हळू माझी करमणूक ही नाहीशी होणार
कारण डिश TV चा pack महिना भरातचं संपणार.
आणि मग एकाच वेळी 2 ते 3 महिन्यांचं light bill, दुधवाल्याचं bill पेपरवाला अशी सगळी बिलं उरावर बसणार , आणि मग सगळे एकदम उरावर बसले की मग मला पुन्हा प्रश्न पडणार!
मी सोंग घेऊ का ?
पण .. नेमकं कसलं भिकेचं की पैश्याचं ? 🤔
जगणंच बेकार ..😞😠
आयुष्यात ना माणसाने एकतर खूप श्रीमंत असावं किंवा मग direct भिकारीच .
कारण *मध्यम वर्गीयांना न पैश्याचा आव आणता येत , न भिकेचं सोंग*
नेहमी मात्र आमचेच निघतात ते म्हणजे वाभाडे.
मग ते राजकारणात असो, युद्धात असो का मग महामारीत!
वाभाडे फक्त आमचेच निघतात.
(सदर post ही सध्याच्या
परिस्थितीत आजूबाजूला घडणाऱ्या घटनांमुळे लिहावीशी वाटली. )
Comments
Post a Comment