आपण पाहुणे आहात मालक नव्हे
आपण पाहुणे आहात मालक नव्हे
अकस्मात डिस्नेची सगळी जादू ओसरलीय. पॅरिसचा सगळा शृंगार विस्कटलाय. न्यूयॉर्कचा दिमाख उतरलाय. चीनची अभेद्य भिंत पूर्ववत नाही राहिली. जल, थल आणि नरसंहाराने भरलेला मानवाचा इतिहास स्तब्ध झालाय.
चुंबने, आलिंगने जणू संहारक शस्त्रे बनली आहेत आणि आईवडिलांना, मित्रांना, प्रेयसीला, प्रियकराला अगदी कोणालाही न भेटणे हीच प्रेमाची परीक्षा होऊन बसली आहे.
अचानक आपल्याला कळून चुकलंय की सत्ता, संपत्ती, सौंदर्य आणि उपभोग या गोष्टी कुचकामी आहेत. जगण्यासाठी ओंजळीत मावेल एवढंच अन्न, तेवढंच पाणी आणि प्राणवायू पुरेसे आहेत.
त्याचवेळी माणूस वगळता उर्वरीत विश्वाचा गाडा मात्र पूर्ववत सुरळीत चालू आहे. त्याचे सौंदर्य अबाधित आहे. त्याने बंदिस्त केलंय ते फक्त माणसांना. मला वाटतं निसर्गाने यातून आपल्याला एक संदेश दिलाय -
" ही पृथ्वी, जल, वायू आणि आकाश तुम्ही नसला तरी सुखात असतात. तुमच्यावाचून काही अडत नाही त्यांचं . आता परताल ना तेव्हा एक गोष्ट ध्यानात ठेवा.
*तुम्हीआपण आपल्याच विश्वात गाढ झोपलो होतो आणि आता आपल्याला जाग आलीये तेव्हा एका वेगळ्याच विश्वात आहोत.
अकस्मात डिस्नेची सगळी जादू ओसरलीय. पॅरिसचा सगळा शृंगार विस्कटलाय. न्यूयॉर्कचा दिमाख उतरलाय. चीनची अभेद्य भिंत पूर्ववत नाही राहिली. जल, थल आणि नरसंहाराने भरलेला मानवाचा इतिहास स्तब्ध झालाय.
चुंबने, आलिंगने जणू संहारक शस्त्रे बनली आहेत आणि आईवडिलांना, मित्रांना, प्रेयसीला, प्रियकराला अगदी कोणालाही न भेटणे हीच प्रेमाची परीक्षा होऊन बसली आहे.
अचानक आपल्याला कळून चुकलंय की सत्ता, संपत्ती, सौंदर्य आणि उपभोग या गोष्टी कुचकामी आहेत. जगण्यासाठी ओंजळीत मावेल एवढंच अन्न, तेवढंच पाणी आणि प्राणवायू पुरेसे आहेत.
त्याचवेळी माणूस वगळता उर्वरीत विश्वाचा गाडा मात्र पूर्ववत सुरळीत चालू आहे. त्याचे सौंदर्य अबाधित आहे. त्याने बंदिस्त केलंय ते फक्त माणसांना. मला वाटतं निसर्गाने यातून आपल्याला एक संदेश दिलाय -
" ही पृथ्वी, जल, वायू आणि आकाश तुम्ही नसला तरी सुखात असतात. तुमच्यावाचून काही अडत नाही त्यांचं . आता परताल ना तेव्हा एक गोष्ट ध्यानात ठेवा.
*तुम्ही पाहुणे आहात मालक नव्हे.*
Comments
Post a Comment