मार्गशीर्ष महिन्याचे महत्व Important of Margashirsha month

###( मार्गशीर्ष महिन्याचे महत्व्)###

मार्गशीर्ष महीना हा विष्णूच्या आवडता महिना आहे. ह्या महिन्यात विष्णुचि जी जी पूजा पाठ केलि जाते त्याचे अगणित पूण्य मिळते.ह्या महिन्यात लक्ष्मी पूजां करून त्या देवीजवल तिचा प्रिय म्हणजे विष्णूच्या नाम मुखात राहु दे व् त्या देवाची सावली सतत माझ्यावर राहु दे हे मागावे. विष्णु चे राम कृष्ण अवतार आहेत. ह्या पैकी कोणत्याही देवाची पूजा ही विष्णुला मिलते. ह्या महिन्यात रामरक्षा स्तोत्र, विष्णुसहस्त्र नामावली, भागवत ग्रंथ,भगवतगीता वाचावि. हयाने विष्णु भगवान प्रसन्न होवून मनातल्या इच्छा पूर्ण होतात. ह्या महिन्यात जास्तीजास्त नामस्मरनाकडे ध्यान द्यावे. नामाने त्या देवाची शक्ति आपल्या घरात वास करते. तुम्ही कोणत्याही देवाची पूजा करा ती पूजा विष्णुलाच मिलते. कारण देव हां एकच असून प्रत्येक देव हे विष्णुचि रुपे आहेत.म्हणजे सोने हे एकच आहेत पण त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे दागिने बनविले जातात पण मूळ सोने प्रत्येकात एक आहे. म्हणून ह्या महिन्यात लक्ष्मीपूजन,चपाशष्टि,दत्तजयंती,गीताजयंति हे सण असतात.ह्या महिन्यात खोटे बोलने, इतरांची निंदानालस्ती करने, मनात द्वेष तीटकारा करने टाळावे. त्यामुळे आपली जेवड़ी पूजा पाठ आहे ती फळाला येत नाही. जास्तीत जास्त मौन राहन्याचा प्रयज्ञ करावा. त्याने मानसिक शांती मिलते. 'ॐ नमो भगवते वासुदेवाय' ह्या मंत्राचा जप करावा. ह्या मंत्रात इतके सामर्थ्य असते की मनातली वासना वाइट विचार निघुन जातात.त्यामुळे माणसाच्या हातून वाइट कर्म होत नाही. भगवतगीता वाचताना त्या श्लोकाची एक एक शक्ति माणसाला नवसंजीवनि देते. त्यामुळे त्याच्या मनात नेहमी इतरांविषयी आदर राहून वाइट वृत्ति होत नाही. पण हे सर्व करत असतांना आपले मन स्वच्छ ठेवावे. देवाचे नाम घेतांना फक्त नामाचा विचार करावा बाकी संसाराची चिंता करावी पण फक्त तितक्यापुरता. बाकी आपला वेळ देवाच्या स्मरणात घालवावा. कारण ह्या महिन्याची पूजा पाठ मनुष्याला सुख शान्ति समाधान देवून मनातील वासना घालविते.तीच शक्ति माणसाला जगन्याचे धैर्य व् बळ देते.कारण ह्या महिन्याची वैशिष्टच तशी आहेत. ह्या माहिन्यात मन स्वच्छ ठेवलात व् नुसते नामस्मरण केले तरी त्याची पुण्याई मोठी आहे. सगळ्या महिन्यातला सर्वश्रेष्ठ महीना आहे. मार्ग म्हणजे जीवनाला वेगळा आकार देवुन् मनातली वासना दूर करने व् शीर्ष म्हणजे मन व् आत्मा नितल स्वच्छ झाल्यामुळे ती देवाला अर्पन करने म्हणजे मार्गशीर्ष.म्हणून मन तन आत्म्याने त्या देवाची एकनिष्टे ने पूजा करा. कोणालाही काया वाचा मनाने दुखवु नका. गरीबांना पैशांची मदत न करता वस्त्र अन्नाचि मदत करा. मानसात देव पाहणे हीच खरी विष्णुपूजा आहे. कारण प्रत्येक आत्म्यात तोच विष्णु वास करतो. त्या विष्णुमुळे आपले शरीर हां जीवंत आहे हे विसरु नका. म्हणून पूजा पाठाबरोबर मानुसकिचाहि धर्म पाळा नक्कीच ती पूजा विष्णुला मिळेल.कारण मानसातच खरा ईश्वर आहे.

Comments

  1. If I forget to do the first Thursday of the month (28 - November 19), please advise me on whether I should fast or not, and what I should do for it.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!