चाळीशीतला हुरूप (emotional comedy)
चाळीशीतला हुरूप,
!! भ्रमणध्वनीची घंटा
खणखणली!!
अज्ञात क्रमांक पाहून त्याने नाक मुरडतच विचारले "कोण "?
समोरचा मंजुळ आवाज विचारत होता," राजू का ? "
आवाज एकदम ओळखीचा वाटला मग त्याने विचारले "हो आपण?"
" मी मिताली," आवाजातून ओळख जाणवली, खात्रीसाठी त्याने पुन्हा विचारले "मिताली "?
"हो ,मी मिताली बोलतेय".
दिवाणखान्यातून तो गच्चीत आला , हळूच स्वयंपाकघरात डोकावलं, बायको पोळ्या लाटण्यात मग्न होती.छातीची धडधड आता वाढली होती , श्वासही थोडा अडखळला, तोंडातून शब्द फुटेल कि नाही असं वाटू लागलं ,
नकळत तो भूतकाळात गेला. जिच्यासाठी आपण जीव ओवाळून टाकायचो, तरीही ती ढुंकूनही आपल्याकडे पहायची नाही त्या मितालीला आज आपली गरज लागावी, आठवण यावी या कल्पनेनेच तो सुखावला. आता काय बोलाव हे कळताच नव्हता, पण तिचा आवाज ऐकून तो परत भानावर आला," काय कुठे आहेस ? "खूप वर्षात भेट नाही,फोन नाही, अमितने नंबर दिला म्हणून फोन करतेय." तिचा आवाज ऐकतच रहाव असं त्याला वाटत होत.
आता मात्र तिने अजून एक बॉंब टाकला," भेटायचा होतं तुला कधी वेळ आहे ?"
त्याला क्षणभर वाटल म्हणावं"तुझ्यासाठी कधीपण" पण मनाला आवर घालत तो म्हणाला रविवारी . तिने पुन्हा विचारले कुठे भेटूयात तुझ्या घरी कि माझ्याकडे येतोस ? आता त्याल स्वर्ग दोन बोटेच उरला होता.अजून हुरूप आला "एखाद्या तटस्थ ठिकणी भेटूयात का ? " ते ही कुठे हि ----ती मग त्याने शहरातील एका मोठ्या शानदार हॉटेलच नाव सुचवलं.भेटीचं ठिकाण आणि वेळ निश्चित झाली . आता पुढचे चार दिवस त्याला युगापेक्षाही मोठे वाटू लागले. अचानक एक मोदी जाकेट घेवून तो घरी आला. एक दिवस सलून मध्ये जावून फेशिअल मसाज थोड्या भुर्या झालेल्या केसांना रंग, असं सगळा सेट अप बदलला. नवऱ्यातील बदल पाहून, बायकोने विचारले, तर रविवारी फार महत्वाची मिटिंग आहे असं सांगून वेळ मारून नेली.ती भोळी होती तिला गैर काहीच नाही वाटलं . नाकासमोर आयुष्य जगणाऱ्या जोडीदाराला आतून होणाऱ्या गुद्गुद्गुल्या तिला जाणवली नाहीत.हजारो रुपये बूट, गॉगल यावर खर्च होत होता,पण तिच्या भेटीपुढे पर्वा नव्हती.रविवार उजाडला, सकाळपासून सॉरी एकदम खुशीत होती. पाच वाजले. taxi दारात येवून उभी राहिली.बायकोने शुभेच्छा दिल्या, मुलालाही बाबा कोणत्या तरी कामगिरीवर चाललय असं वाटून नमस्कार केला. गाडी हॉटेलच्या दारात थांबली ती हातात गुलाब घेवून त्याची प्रतीक्षा करत होती,तिच्याकडे पाहून हरखून गेला. आत जावून बसले, महागड्या डिश ऑर्डर केल्या गेल्या, बिल पण साहेबांनी डेबिट कार्डने भरलं,सगळा कस छान पार पडलं, बँक शिल्ल्कीचा फज्जा उडाला होता पण हा आनंद परत मिळणार नव्हता समुद्रकाठी जावून बसण्याचा तिचा प्रस्ताव ऐकून हा तर खुलूनच गेला, नाकारण्याचा प्रश्नच नव्हता.थोडा वेळ वाळूत बसल्यावर तिने पर्स मधून काही कागद काढले आणि यावर सही करशील का ? असं लडिवाळपाने विचारले
विमा policy चे कागद पाहून तो थबकला. ती म्हणाली बाकीची सर्व माहिती आपण बोलत असताना मी नोट केलीय, फॉर्म मी नंतर भरेन तू फक्त सही कर.
सही झाली आणि हप्ते सुरु झाले.दर हप्त्याला आठवणी ताजा होत राहिल्या.
😝😝😝😝😝😝
Comments
Post a Comment