One GB माणुसकी आम्हाला महिनाभर पुरते

अप्रतिम कविता

1GB माणुसकी
आम्हाला महिनाभर पुरते....💛

गुड़ मॉर्निग, गुड़ नाईट
सर्व काही होते....💛

वाढदिवसाच्या शुभेच्छा ही
त्यातून देता येतात
वाटतील तेवढे पुष्पगुच्छ ही
पाठवता येतात....💐

अभिनंदन, स्वागत,
सर्व काही करता येते
श्रद्धांजलि द्यायला
मौन ही धरता येते....😷

सर्व कसे अगदी
ऑनलाइन चालते
1GB माणुसकी
आम्हाला महिनाभर पुरते....💛

फेसबूक, whatsapp
आणि काय काय राव
चॅटींग मधली मजा
तुम्हाला कुठे ठाव....??❤

विनोद, मस्ती,
असो कि जयंती, पुण्यतिथी
पोस्टचा वर्षाव होतो
साऱ्यांच्या माथी....❤

शाळेत नसेल शिकवित
एवढे ज्ञान मिळते
1GB माणुसकी
आम्हाला महिनाभर पुरते....❤

तसे भेटून बोलणे
होत नाही आता फारसे
तुम्ही ऑनलाइन या ना
बोलू मग खुपसे....💛

गेलात जवळून तर
नमस्कार ही करु नका
ऑनलाइन मात्र
हाय हॅलो विसरू नका....👋✌

थोडीशी virtual दुनियाच
आता हवी-हवीशी वाटते
1GB माणुसकी
आम्हाला महिनाभर पुरते....❤

ऑनलाइन जग झाले
याची नाही खंत
माणुसकी आटत चालली
हे मना सलतं....💛

भावनेचा ओलावा
कोरडा झाला फ़क्त
समुहात राहुनही
एकटं एकटं वाटतं....💛

नुसत्या शब्दांनी
ह्रदय कुठे हलते
1GB माणुसकी
आम्हाला महिनाभर पुरते....!!❤
🙏

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!