Gypsum benefits to farming... जिप्सम चे फायदे

जिप्सम म्हणजे काय ?  What is Gypsum?

जिप्सम म्हणजे काय ?♥प्रगतशील शेतकरी ग्रुप♥

♥जिप्सम म्हणजे कॅल्शियम सल्फेट. 

♥हे एक चांगले प्रकारचे भूसुधारक आहे. 

♥चोपण जमिनीची सुधारणा त्याचप्रमाणे पिकांच्या वाढीसाठी जिप्सम चांगला उपयोगी पडतो. 

♥जिप्सम वर्षातून एकदा २०० ते ३०० किलो/एकरी जमिनीत टाकावा त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते. 

♥चोपण जमीन सुधारित जमिनीत रुपांतरीत होते.

जिप्समचे फायदे काय? ♥प्रगतशील शेतकरी ग्रुप♥

♥जिप्सम जमिनीची सुपीकता वाढवते. 

♥जमीन भुसभुशीत होते.

♥जमिनीची रचना बदलण्यास मदत होते. 

♥क्षारपड जमिनीतील सोडियम क्षारांचे कण जिप्सम मुळे सुटे होतात. 
त्यामूळे ते बाहेर फेकले जाऊन जमीन सुधारते. 

♥बियाण्याची उगवण चांगली होते.

♥पाण्याबाहेर येणारे क्षार जिप्सम मुळे कमी होतात.
♥जमिनीची धूप कमी होते.

♥पाण्याचा निचरा होऊन जमीन पाणथळ होत नाही.
♥जमिनीतल्या कॅल्शियम-माग्न्येशियामचे प्रमाण सुधारते.

♥सेंद्रिय पदार्थ लवकर कुजतात.
♥जिप्सम मुळे पिकाची अन्नद्रव्य शोषण क्षमता वाढते.
♥जिप्सम मुळे फळांची गुणवत्ता सुधारते.

♥भुईमुग, कलिंगड, टोमाटो, बटाटा या पिकांची गुणवत्ता सुधारते हे प्रयोगाअंती सिद्ध झाले आहे.
♥जिप्सम मुळे पिकांना गंधक मिळतो. तो पिकांना आवश्यक असतो.
♥जिप्सम मुळे पिकांची बाह्य कक्षा सुधारते आणि अन्नद्रव्ये जास्त शोषली जातात.
♥जमिनीत वाढणाऱ्या कंद पिकांसाठी जिप्सम फायदेशीर आहे. त्यामुळे माती कंद पिकला चिटकत नाही.
♥जमिनीतील हुमणीचे नियंत्रण होते.
♥जिप्सम मुळे पिक वातावरणातील जास्त तापमान सहन करू शकतात.

♥अशा प्रकारे जिप्समचे विविध फायदे आहेत.

संकलित!

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!